आधीच सांगतोय मला मुंबईकर आणि पुणेकर असा काही वाद घालायचा नाही, त्यामुळे उग्गाच असा गैरसमज करून घेऊ नये पोस्टच्या शीर्षकावरून. ते शीर्षक फक्त एकाच कारणामुळे, मुंबईकरांची मेजॉरिटी होती ह्या छोटेखानी भेटीला.
पेठे काका यानी मागील वर्षी आयोजित पुणे बलॉगर्स मेळाव्याला इच्छा असून पण मला हजर नाही राहता आला याची खंत खूप दिवसापासून होतीच. त्यांना मुंबई बलॉगर मेळाव्यालापण नाही येता आल, काही घरगुती कारणास्तव त्यामुळे आमची ही भेट पण हुकली. याच वर्षी जून दरम्यान अनुजाताई आणि तन्वीताई भारत भेटीस येणार असा कळल होत. तन्वीताई नाशिकला गेली होती घरी, कारण ईशानच्या मुंजीचा कार्यक्रम होता आणि अनुजाताई पुण्यात होती. मग पेठेकाका आणि अनुजाताईने सूत्र हलवली आणि २० जूनला पुण्यात भेटायाच असा ठरल. मला आणि सगळ्यांना तस कळवल गेल. मी लगेच होकार दिला कारण शनिवार आणि रविवार सुट्टीचाच म्हटला मी येतोय काही झाला तरी.
इथेच माझी गोची झाली का काय विचारताय? १९ जून हा माझा वाढदिवस..हॅपी वाला (ही गोची नाही बर:)) पण ह्या वर्षी शनिवारी आल्याने मला मुद्दाम सुट्टी मागायला लागणार नव्हती आणि ऑफीसचे फटके चुकणार होते. त्यामुळे मी खुश होतो. पण हा कार्यक्रम ठरल्यावर मला जाणवला २० जूनला सकाळी निघालो की उशीरच होणार म्हणून आदल्यादिवशी निघाव लागणार आणि बाकी सगळे पण तयार होते. माझी गोची घरून परवानगी काढणे हीच होती, कारण मला त्यानी नाही म्हणून सांगितला नसत पण… असो. मग त्याच आठवड्यात तब्येत ठीक नसल्याने मी दोन दिवस सुट्टीपण टाकली होती. गुरुवार ते रविवार मोठा विकांत होता, त्यामुळे आईला सांगून वाढदिवस साजरा करायाच बेत शुक्रवारीच केला आणि फक्कड जेवण केला आईने पण पुरणपोळी शनिवारीच होणार असा आदेश तिने दिल्यावर माझी थोडी नाराजी झाली 😦 शेवटी, शनिवार दुपारपर्यंत सगळी धावपळ करत गरम गरम पुरण (फक्त पुरण, पोळी नाही) खाउन. आमचा तिकीट काढल बोरीवलीला, मग देवेन आणि मी बसमध्ये बसलो, ट्रॅफिक आणि इतर पिकउपमुळे बसला उशीर झाला होता. आकाचा दीड तास पुतळा झाला होता वाट बघून वाशीला 😉
बसवाल्याला घाई नव्हतीच हे एव्हाना आम्हा तिघांनाही कळून चुकल होत, त्यामुळे डुलक्या घेत, वैतागात बसमध्ये बसून होतो, बस खूपच उशिरा वाकडला पोचली आणि थोडी चुकामूक होत सगळे वाकडफाट्याला भेटलो. मी आणि देवेनने पहिल्यांदा कर्वेनगरला जायच ठरवल आणि पेठेकाका, ताईची भेट घेऊन मागे फिरायाच ठरवला सचिनच्या घरी जेवायला आणि आम्हाला नेण्याची-आणण्याची जबाबदारी सागरवर पडली. आम्ही तिघेही शहरात टिबल सीट बाइकवर फिरत होतो (स्वदेस सारखा डिक्टो..), कर्वेनगर खूपच लांब होत. आम्ही रस्ता शोधत शोधत फिरत होतो. शेवटी आम्हाला नक्की पत्ता मिळाला आणि आम्ही शेवटच्या सिग्नलला आलो आणि तिथेच आम्हा तिघांच्या कर्माने पोलिसांनी अडवल, बाइकची चाबी काढून घेऊन दंड भरायला सांगितला १२०० रुपये (यात लाइसेन्स, नंबरप्लेट आणि टिबल सीट हे सगळा बंडल्ड पॅकेज होता) चुक तर होतीच पण काय कराव, मग विनवणी करून (मांडवली करून) २५० रुपये देऊन निघालो. बघतो तर ज्या हॉटेलमध्ये जायच होत ते उजवीकडे होत आणि आम्ही सरळ गेलो आणि पकडले गेलो…:( असो. अनुजाताई, पेठेकाका आणि गौरी तिथे वाट बघतच होते. मस्त पावभाजी खाउन रविवारचा प्लान ठरवला आणि शनिवारवाड्याला भेटायाच असा ठरल. पेठेकाका जाम उत्साही होते, सगळी नोंद त्यानी तिथल्या टिशू पेपरवर लिहून सगळयांचे अड्डे (पुण्यातले) टिपून घेतले.

मग आमच्या हट्टामुळे आम्ही परत पिंपळे गुरव ह्या सचिनच्या घरी जायचा निर्णय घेतला. आधीच पोलिसांच्या कारवाईला सामोरे गेलो असल्याने प्रत्येक चौकात, प्रत्येक सिग्नलला आमची नजर फक्त पोलिसाना शोधत होती. नेमक त्याच दिवशी पोलिसांच पेट्रोलिंग पण सुरू होत रस्त्यावर. आम्ही बापडे प्रत्येक सिग्नलला उतरून सिग्नल एकानेच गाडीवरुन आणि दोघांनी पायी असे पार केले. अशी दहशत होती पोलिसांची की, रंगवलेली झाडेपण पोलीस समजू लागलो. सागरने, खूप धावपळ केली त्या रात्री, रस्ते शोधले, पूर्ण पुणे फिरवल. शेवटी कसेबसे पोचलो सचिनकडे रात्री २ ला. खूप भूक लागली होती पण रात्री १० लाच पुण्यातील सगळी दुकान, हॉटेल्स बंद झाली होती (ह्या वेळी मला माझे मुंबईतले अड्डे आठवू लागले. मुंबईत तुम्हाला कधीही हव तेव्हा सगळा खायला मिळत…जियो मुंबई) त्यामुळे भुकेमुळे आणि जागरणाच्या सवयीमुळे मला जास्त झोप लागलीच नाही. मस्त टेरेसवर जाउन मी फेर्या घालत होतो. सकाळी सगळे आवरून आधी नाश्ता करायची ही मागणी आका आणि मी उचलून धरली आणि तोवर पोटाला आधार म्हणून बिस्किट खाल्ले. पिंपळे गुरव येथून एसटी पकडून शनिवारवाड्याला पोचलो आणि उतरल्या बरोबर समोरच्या हाटेलात हल्लाबोल केला. पोहे, उपिठ, इडली आणि चहा घेतला. मग पेठेकाका ज्या स्टॉपला उभे होते तिथे पोचलो. सगळे जमे पर्यंत थोडा उशीरच झाला होता त्यामुळे आम्ही पुढची बस येईपर्यंत शनिवारवाडा बघितला. तिथे अपेक्षेप्रमाणे खूप बाजीराव आणि मस्तानी देखील होते. आम्ही दहा मिनिटात बाहेर आलो आणि शेंह्गडला जाणारी बस पकडली (शेंह्गड = सिंहगड. स्थानिक लोकांचा उच्चार) बस मधल्या धक्के देत रंगलेल्या गप्पा मस्त रंगल्या होत्या..बस मधून उतरून तन्वीताईची वाट बघत आम्ही एका फार्म हाउस वर थांबलो. तन्वीताई आली पूर्ण कुटुंबासकट मग तिथे आवरा फेम अभिजीत वैद्यपण आला.. मग आकाच्या सांगण्यानुसार थोड्यावेळाने फार्महाउसचा बेत रद्द करून सगळे गडाच्या दिशेने निघालो.
आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या जीपने वर जायच ठरवला. एका जीपमध्ये कमीतकमी १६ लोक गडावर आणावे असा हुकुम साक्षात श्रींनी दिल्यागत सगळी दादागिरी तिथे चालली होती, पण पर्याय नव्हता आणि आम्हाला मुंबईला परत फिरायाच होत लवकर म्हणून तो पर्याय सोडू शकत नव्हतो. मी आजवर सिंहगड कधीच बघितला नव्हता आणि बघायची तशी इच्छापण झाली नाही कारण तो गड एक प्रेक्षणीय स्थळ बनल आहे पुण्यातल. आज बघायची वेळ चालून आली पण किल्ला बघणारा, अनुभवणारा मी निराश झालो होतो. गडावर जायच्या रस्त्याला मरणाच ट्रॅफिक, कोणी कुठेही रस्त्यात गाडी पार्क करतोय, फोटो काढतोय, चाळे करतोय हे बघून अस्वस्थ झालो. हजारो लोक (दुकली-दुकलीच्या जोड्या जास्त..), निरनिराळे स्टॉल्स, भरपूर गाड्या, बीयरच्या बाटल्या बघून खूप उदास झालो. सरकारी सिमेंटची पायवाट खूप टोचात होती पायाला, त्यामुळे मी गडावर नाही तर बागेत किवा पिकनिक स्पॉटला फिरतोय असा राहून राहून वाटत होत 😦 हे एवढा सोडला तर बाकी कंपनी मस्तच होती. सगळे मस्त आनंदी, फोटो काढून ह्या आठवणी कॅमरामध्ये क्लिकसरशी बंद करून घेत होते.
गडावर मस्त भजी, ताक, केक, उकडलेल्या शेंगा, कैरी आणि वाफळलेला चहा घेत आम्ही परतीचा मार्ग धरला. सिंहगड हळू हळू धूक्यात हरवत जात होता जसजसे आम्ही खाली उतरायला लागलो. चालत, मस्त ओरडत, गाणी म्हणत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो. आम्हाला मुंबईकडे निघायच होत (देवेन किती लांब राहतो ना रे विभि :..)
मग अनुजाताई, तन्वीताई, पेठेकाका, अमित, ईशान, गौरी ह्यांचा निरोप घेत आम्ही मुंबईच्या वाटेला प्रवास सुरू केला..सगळ्यांमधील अंतर रस्ते, शहरे यानी दूर होत होता पण मनाने सगळे खुपच जवळ आले होते. सचिन आणि सागरला खूप धावपळ करावी लागली आमच्यामुळे पण त्यानी हसत हसत सगळी मदत केली थॅंक्स दोस्तांनो. तन्वीताई तर सारख्या प्रवासाच्या दगदगीतून वेळ काढून आम्हाला भेटायला आली आणि आम्हाला तिची भेट सहजच खूपच सुखावून गेली. अनुजाताई आणि पेठेकाका तुमच्या उत्साहाला तोड नाही आणि आका तुझ्या फोटोग्राफीच्या कौशल्याला सलाम खूप छान फोटो काढले आहेस 🙂
चला, त्याच गोड आठवणी आठवत ही पोस्ट इथेच संपवतो.
फोटोस मी > इथे < अपलोड केले आहेत
— सुझे
कालपासून फोटोची वाट पहात होतो.. बरं झालं पोस्ट केलेस आज.
हो काका, थोडा उशीर झाला ५०० एमबीचे फोटो होते..वेळ लागला
सुझे…मस्त धमाल केली आहे….२५०??? खूप दिले रे….असु दे!!!
मी आजवर सिंहगड कधीच बघितला नव्हता आणि बघायची तशी इच्छापण झाली नाही कारण तो गड एक प्रेक्षणीय स्थळ बनल आहे पुण्यातल….हे अगदी खर आहे….प्रेमवीरांना तर ***वर फटके द्यायला पाहिजे.
अरे म्हणतात ना वेळ आली की गधे को भी बाप बनाना पडता है अगदी तसच झाला बघ..घाई होती रे आम्हाला काय करणार…गडाचतर बोलुच नये, तो गड उरला नाही आता… :(:(
मस्तच.:) इतकी पळापळ सार्थकी लागली. फोटो पाहते आता.
धावपळ काही बोलुच नये, पण एक वेगळाच अनुभव होता..मज्जा आली बघ खूप
अनुजा व माझ्या एका हांकेसरशी सगळे जमा झालात व दोन दोन आनंदांबरोबर आनंदीआनंद मिळविला अजून काय हवे ? खरे तर बहूतेक सर्वच एकमेकांना प्रथमच भेटत होतो, तेव्हा पुणेकर, मुंबईकर आदि म्हणण्याला काहीच अर्थ नाही. जे जे आवर्जून आलेत त्यांनी आनंद घेतला जे नाही आलेत त्यांना कदाचित आनंदाचे अजीर्ण असेलही.
फोटोंमुळे ही एक कायमची आठवणीची ठेव झाली आहे.
ते तर आहेच पेठेकाका, त्यासाठीच तर आम्ही आलो की तिथे..खूप खूप धन्यवाद तुम्ही हा प्लान यशस्वी केल्याबद्दल. खूप फ्रेश वाटला सगळ्याना भेटून..
मस्त मजा आली तिथे… तूला, सचिनला, देवेन, आका आणि भारतला दुसर्यांदा भेटून खुप बरं वाटलं.
काका, अनुजाताई, तन्वी, अमित, इशान, गौरी, विभि, आणि अभिजीतला पहिल्यांदाच भेटलो, पण कुणीही अनोळखी नाही वाटले..
अनोळखी? आप आपण एकाच घरचे सदस्य आहोत याचा विसर पडू देऊ नको 🙂
गडावर जाऊन सुभेदारांच्या वीरगळीचे (समाधी) दर्शन आपण घेतले नाहीत ???खरे का ते??? काय काय पाहिलेत गडावर???
अरे रोहन खूप धावपळ होती आणि गडावर काहीच दिसत नव्हत धुक्यामुळे 😦
अगदी सही लिहिलेस. अजूनही काय कायमची लक्षात राहील हि ट्रीप म्हणजे छोटासा ट्रेक. मस्कत ला परत जाताना ह्याच आठवणी घेऊन जायच्या आहेत. भेटणे महत्वाचे होते. तुम्हा सगळ्यांची नावे माहिती होती पण भेटून आज ब्लॉगर्स झाले म्हणून इतका छान मित्र परिवार लाभला हे हि भाग्य अनुभवण्यास मिळाले. तुम्ही सर्व मला व तन्वी ला भेटण्यास आवर्जून आलात ह्याचे हि कौतुक आहेच. काका नि पुढाकार घेतला व हे सर्व जुळून आले. असेच दृढ नाते वृद्धिंगत व्हावे हीच इच्छा. अधिक क्लिष्ट शब्द लिहून प्रतिक्रिया अवघड करीत नाही. सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा कौतुक.
हो ग तायडे, खूप धम्माल, मस्ती, मज्जा, धावपळ. कधी न विसरता येणार्या आठवणी फार मोलाच्या आहेत
Pingback: ….लंगडी घालाया लागली. « दवबिंदु
आपण बहुतांशी हे सर्व एकत्र अनुभवल त्यामुळे माझीच पोस्ट वाटली ही मला…असच भेटत राहु या रे…बाकी हा हॅपीवाला बर्थडे तु कधीही विसरु शकणार नाही… 🙂
कधीच विसरता येणार नाही हे..आणि आपली नाइट सफारी एकदम भारी 🙂
सुझे, भारी धम्माल केलीत. फोटोज मस्तच रे एकदम.. एकदम फ्रेश झालो फोटोतलं धुकं बघून. !!!
थॅंक्यू हेरंब, पण सगळी कमाल आनंदची त्यानेच सगळे फोटो काढलेत
जबरी रे सुझे!
तुमचं ऍडव्हेंचर खासंच…म्हणजे मी जेव्हा दुर्गा कॅफेतली कॉफी भुरकत होतो, तेव्हा तुम्ही रस्ते हुडकत होतात तर!
मजा आहे(कुणाची नक्की?)!
मजा आली पण सर्वांना भेटून….!
हो यार काय करणार..पण धम्माल आली भेटून..परत भेटूच 🙂
तुमच्या सगळ्यान्चे अभिनन्दन.आणी सुरेश पेठे यान्चे खास अभिनन्दन. पुण्यातच ख्ठे मेळावा घ्र्तल तर मी पण येईन.
सुहास्चे अनुभव वाचून मजा आली. फोटो चान आहेत.
धन्यवाद अरुणाजी आणि ब्लॉग वर स्वागत. पेठे काका आणि अनुजा ताई होती म्हणून आम्ही हे करू शकलो. सगळ श्रेय त्यांचच आहे. अशीच भेट देत रहा ब्लॉगवर..
hiee suhas
khup chaan zala aahe post
i would like to be a part of ur blog group
नमस्कार दर्शना,
ब्लॉगवर स्वागत. नक्कीच तुम्ही ब्लॉग सुरू करू शकता. काही मदत लागली की सांगणे 🙂