चला एका सुखी घरात डोकावूया…
एक प्रशस्त घर एकदम राजवाडा शोभावा अस..अंगणात ५-६ महागड्या गाड्या, एक मोठ्ठ तुळशी वृंदावन मग मागे बॅकग्राउंड स्कोर चालू होतो..एक सुंदर दिसणारी अभिनेत्री किलोभर दागिने घालून दरवाजा उघडते आणि आपल्याला त्या घरातली लोकांची ओळख करून देते..कमीत कमी २०-२२ लोक असतील नाही..अरे जास्त असो. ती लोक एवढी जास्त का आहेत त्याच कारण पुढे कळेलच. तर मग कुठे होतो हा ओळख परेड. घरातील सदस्यांचा एक फ्लो चार्ट काढला तर सगळ्यात वर एक प्रेमळ आजी-आजोबा. मग त्यांची ३ मुल आणि २ मुली, मग त्यांच्या बायका आणि नवरे, मग त्यांची पोर २-३, मग त्या पोरांमधील एकाच लग्न झालेला आणि एक लग्नाळू. मग घरात एक भरवश्याचा नोकर..हुश्श लक्षात ठेवा कोणाचे काय होते ते. (आजी-आजोबा कमीत कमी १२० वर्षाचे तरी असावेत..हा फक्त अंदाज आहे)
चला मग पुढे, हे घर शहरातील नावाजलेला बिजनेस टायकुन अमाप पैसा. अतिशय गुण्या-गोविंदाने नांदत असतात. एवढी गोड नाती संबंध एवढे गोड असतात की डायबेटिस व्हायचा (निदान मला तरी) तर ह्या घरच्या बरोबर उलट परिस्थिती असते एका कुटुंबात घर बेताचच..अतिशय संस्कारी, आई-बाबांचा आदेश म्हणजे काळ्या दगडाची रेघ..त्या घरातील मुलीच श्रीमंताच्या घरातील मुलावर प्रेम बसत आणि मोठ्या घरतल्या एका मुलीच त्या गरीब घरातील मुलावर प्रेम बसत..मग थोडे नकार-ना-ना करत मग ते लग्नाला तयार होतात..काही दिवस सगळा ठीक चालत. मग श्रीमंताच्या घरात भांडण होता दोन भावांमध्ये (कारण मरु द्या हो…कितीही समजूतदार असले तरी तोडायला छोटी कारण पूरतात) मग घराची वाटणी, बिजनेसचे वाटे, मग वेगळा राहणा, मग त्यांची हालअपेष्टा, अड्जेस्टमेंट (सॅड बॅकग्राउंड स्कोर सकट..लक्षात ठेवा बॅकग्राउंड स्कोर शिवाय एकही दृष्य चित्रित केला जात नाही.)..मग आता ते वेगळे झाले, पण मग मुलांमुळे ते परत एकत्र येतात मग त्याच जोरदार सेलेब्रेशन..हम साथ साथ है वळा एमोशनल सीन, गाणी..मग अचानक कोणी विलन येतो(हे पात्र असल्याशिवाय मज्जा कशी येईल), सांगतो की आजोबांच्या मुलाचा म्हणजे हल्लीच लग्न झालेल्या मुलांचे सासरे यांच बाहेर काही लफड होत कॉलेजच्या दिवसात आणि तो त्यांचा मुलगा आहे आणि मला माझा वाटा द्या अशी मागणी करतो (अरे देवा…असा मी नाही घरातले लोक म्हणतात). मग परत सॅडी सॅडी वातावरण, आजोबांच्या मुलाला हार्ट अटॅक, मग धावपळ, एक एकाच्या चेहर्यावर शॉकिंग असा भाव, एक अँगल वरुन, बाजूने, डाव्या बाजूने उजव्या बाजूने, वरुन, खालून, ब्लॅक न व्हाईट (आरर्र्र किती ते रिपीटेशन एकाच सीनचा..). मग देवाच्या प्रार्थना, देव प्रसन्न होतो, बाबा ठीक होतात मग त्या विलन मुलाला ते अक्सेप्ट करतात, तो पण घराचा एक सदस्य बनून जातो..मग सगळा कस ठीक होत…हम साथ साथ है..मग गणपती, करवा चौथ, गरबा, दिवाळी, होळी असे सण साजरे करतात की विचारू नका….मग एक दिवस अचानक कथेतील महत्त्वाच्या पात्रचा मृत्य होतो (शॉकिंग ना..:() मग त्याचे सगळे विधी दाखवा..सगळा भारत देशाला रडवा त्याच्या अकस्मीत निधनाने….त्याला जिवंत करा परत नाही तर तुमची कहाणी इथेच बंद पाडू, अशी धमकी मिळते डाइरेक्टरला..मग काय जनता बोली तो बोली…परत चेहरा बदलून त्या पात्राची एंट्री..(फ्लॅश बॅक असतो पण आता मला टाइप करायाच कंटाळा आलाय..तुम्ही काय ते समजून घ्या) सगळा कसा परत सुखात..हम साथ साथ है…मग कहाणी २० साल बाद अशी धक्का मारतात..पण त्यात नवीन पात्रच येतात फार फार तर आजोबाना स्वर्गवासी दाखवतात….पण आजी अजुन जिवंत आहे {वय मोजा वर १२० होत ना? त्यात टाका की अजुन २०;-)} मग परत भांडण, सण, मृत्यू, जन्म, हॉस्पिटल, पार्ट्या, काही महा एपिसोड चालू…..बस्सससस्स अजुन मला लिहण शक्य नाही 😉

वर जे वर्णन केला ते दोन सीरियल्सच (एक हिंदी एक मराठी), आता दोन दिवस ऑफीसमधून सिक लीव घेऊन घरी बसलोय आणि अश्या भयानक सीरियल्स बघितल्या की सांगू नका…कलर्स, झी टीवी, स्टार प्लस, ई टीवी, सहारा वन अश्या चॅनेल्सवर चालू असलेल्या मालिकांमधून स्त्रियांवर होणारे अत्याचार नव्याने दिसू लागलेत मला (ही अतिशयोक्ती नाही, पण वास्तव जरी असला तरी मालिकांमधील त्यांची मांडणी मला आवडली नाही मला हेच सांगायाच आहे).
अश्या अनेक सीरियल्स आहेत मराठीच सांगतो ज्या कधीच विसरू शकत नाहीत प्रपंच. श्रियुत गंगाधर टिपरे, आभाळमाया (पहिल सत्र), दुनियादारी, ४०५ आनंदवन. बाकी मी टीवी फक्त न्यूज़, डिस्कवरी आणि स्पोर्ट्ससाठीच बघतो. तरी सुद्धा ना आना इस देश मे लाडो, चार दिवस सासुचे, ह्या गोजिरवण्या घरात, बालिका वधु, जहा मै घर घर खेली (ह्या सीरियल मध्ये म्हणे सोन्याच घर होत आणि तेच बेघर होतात कर्जापाई :D) अजुन नाव पण आठवत नाही..भापो ना? बस.. 🙂
ह्या सीरियल्स मध्ये काही स्पेशल, धक्कादायक होणार असेल तर त्याची वर्तमान पत्रात पहिल्या पानावर जाहिरातपण येते, यावरून तुम्ही त्यांची प्रसिद्धी ओळखू शकता. 🙂 पण सरते शेवटी विचार करतो आपण त्याला ईडियट बॉक्स म्हणतो पण त्याच्या समोर बसलेले आपण काय आहोत मग? आपण बघण सोडू तेव्हाच अश्या व्यर्थहीन सीरियल्स तेव्हाच बंद होतील, त्याना छान प्रतिसाद मिळतोय मग ते का बंद करतील?
तळटीपा –
१. वर झालेला अती कॅंसाचा वापर फक्त हेरंबमुळे 😉
२. वाढदिवसाला अशी पोस्ट टाकणार नव्हतो, पण एक सीरियल बघितली आणि लिहायला घेतला.
३. तसा विषय पण नव्हता जे सुचला ते लिहल, त्यामुळे त्या एकाच सीरियलला दोष देऊ नका 🙂
सर्व प्रथम वा दी हा हा शू
आता पोस्ट विषयी
जाम पीडतात रे ही लोक
आतातर कुठल्याही रियालिटि शो मध्ये सुद्धा येतात.काही दिवसपूर्वी एक नाव वाचल होत सिरियलच
“गुंगी(मुलीच नाव आठवत नाही {पण कोणतही नाव चालेल})की बोलती कहाणी” की असच काय ते जाम हसलो होतो तेंव्हा मी.अरे काय नाव आहे का हे …
हा सिरियलपायी घरात दोन टिवी घ्यावे लागले होते काही वर्षापूर्वी.
🙂 असो कहाणी घर घर की 😦
%$$%$ की बोलती कहाणी…छान. आपल्याकडे असा मसाला जाम विकला जातो याची खात्री पटली रे सागरा काय करू 🙂
शुभेच्छांसाठी थॅंक्स रे, भेटूच काही तासात
हा हा .. भार्री…. काय रे हे आणि?? २ दिवस सुट्टी घेतलीस आणि सिरियल्स बघितल्यास? लय वंगाळ.. जाउदे तुझा वादि आहे म्हणून निषेध करत नाही..
हे वाचून मला माझ्या “मी सिरियल्स बघितल्या नाही, बघत नाही, बघणार नाही” या तत्वाचा पुन्हा एकदा अभिमान वाटला 😉 ..
बाकी आपण सगळे मिळून लवकरच कंसाचा पुनर्जन्म करणार 😉 ..
असो.. वादिहाहाशु !!!! जीवेत शरदः शतम् … मस्त मजा कर..
अरे वीकडेज होते ना म्हणून कुठे बाहेर नाही पडलो आणि सीरियल्स बघत नाही रे मी पण त्या फक्त ऐकतो मी..त्यामुळे हा निषेध मी घेणार नाही हं 😉 असाच एक छोटा प्रयत्न केला हे हे हे…
शुभेच्छांसाठी थॅंक्स, हेरंब
“बाकी आपण सगळे मिळून लवकरच कंसाचा पुनर्जन्म करणार 😉 ”
:DDDDDDDDDDDDDDDDDDDDDDDDDDDDD
बाकी आपण सगळे मिळून लवकरच कंसाचा पुनर्जन्म करणार 😉
हेरंब कारणीभूत आहे ह्याला :p
VadhDivasachya Hardik Hardik Shubhechha…!!! Cake hava mala… 🙂
Serials baddal NO COMMENTS…!!! Baki Prapanch aani 405 Anandvan bharii hote…
Talteep – Tya navin serial che naav Gungi Kankoo Ki bolti kahani ase aahe.. (Roj roj Paper madhe add pahun pakke dokyat basaley naav)Mi pan jam hasale hote he naav aikun…. 😀
थॅंक्स ग मैथिली..केकना नक्की आपण भेटलो की आपण पेढ्याच्या बदली केक एक्सचेंज करू नक्की 🙂
तुझ्या तळटिपेला नो कॉमेंट्स 🙂 🙂
मला तर त्या सीरीयल्सचा खुप तिटकारा…त्यामुळे कधी ढुंकुनही पाहत नाही…
मला म्हणून नाइट शिफ्ट आवडते, मला आयताच चान्स मिळतो की न बघायचा 🙂
Khup chan lihilas. phakt ekach divas TV serials pahilya var tuze he vichar ahet pan barechshe lok including purush mandali tyanchya kutumbkabilya sobat ya sarva TV serials avadine baghatat
मनीषा, अगदी बरोबर.
माझे बाबासुद्धा बघतात की ह्या सीरियल्स..म्हणून तर कहानी घर घर की आहे ना ही 🙂
ब्लॉगवर स्वागत…
सुहास,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
छान झालीय तुझी “कहाणी घर घर की”
तू नमूद केलेल्या बरयाचशा सिरियल्स एथून तिथून सगळ्या सारख्याच असतात रे…. आणि स्त्रियांवर होणारया अत्याचारांवर
बरयाच अंशी भर दिला जातो. पण या सर्व सिरियल्समध्ये एक सामाईक घटक याला कारणीभूत असतो आणि तो म्हणजे “खलनायिका” (वॅम्प)
एकता कपूर ने तसा ट्रेंडच आणला होता तो आजतागायत चालू आहे. 🙂 झगमगीत साड्या घालून (म्हणजे अगदी मध्यरात्रीसुद्धा) कपाळभर बिंदी लावून, डझनभर दागिने घालून तोरयाने मिरवणारी वॅम्प तुला जवळपास सर्व मालिकांमधून दिसेल. म्हणून “कहाणी घर घर की” हे शिर्षक अगदी सार्थ आहे.
आयला हा मुद्दा राहिलाच की..अगदी बरोबर सांगितलस ह्या वॅम्पमुळे तर सीरियलच्या नायिका आणि नायक भाव खाउन जातात..
शुभेच्छांसाठी थॅंक्स 🙂
Google babachya bhartiya channels madhe Discovery, National Geo pan astil ashi aasha aahe tevha pratek aajarwar aushadh aahe itakch aapan lakshat thewayache ani te aushad ghyayache kai….:)
BTW Belated Happy Returns of D DAY
ठांकू अपर्णा 🙂
अग अपर्णा, मला तेच औषध आवडत, पण घरी, आईला नाही ना आवडत 😉
माझी आवडती Serial गोट्या.
http://www.ibollytv.com/showmovie_info.php?movie_name=Gotya
पाहुन पोस्ट कर कशी वाटली.
गोट्या – मला पण खूप आवडलेली मालिका..सगळ्या कलाकारांनी उत्कृष्ठ अभिनय केला होता..दुव्याबदद्ल धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत बाला..
हे…हे..हे..
गंमत म्हणजे ह्या विषयावर बहुतेक ब्लॉगर लिहु इच्छितात आणि मी ही त्यापैकीच..
आणि सिरीयलच्या साच्याप्रमाणेच ह्यावर लिहीण्याचाही एकच साचा बनत चाललाय…पण लिहील्याशिवाय करमत नाही..
असो मी ही लिहीन काही दिवसांनी..
हो नक्की लवकर लिह वाचायला आवडेल तुझे विचार…लिहते रहा
हीहीही… मस्त लिहिलं आहेस. मजा आली वाचताना.
हा हा विषयच असा आहे..खूप लिहायच होत पण जमला नाही … 🙂
wahh wahh..sundar re post…
late ka asena pan shubhechha aahetch tujhya barobar..
थॅंक्स माउताई आणि ब्लॉगवर स्वागत…
तुझ्या शुभेच्छा अश्याच राहू देत 🙂