आठवतो काय आजचा दिवस? काय म्हणता नाही? काय हे कसा विसरू शकता तुम्ही?
एक-दीड महिनामामाच्या गावी मस्त भेट देऊन, मज्जा करून शाळेच्या पुढल्या वर्गात जाणारे आपणच.. गावाला जाउन आला की आधी धावपळ शाळेच्या शॉपिंगची – पुस्तके, वह्या, दप्तर, रेनकोट, पावसाळी बूट, गणवेश, नवीन डबा मज्जा ना एकदम…
जून महिन्याच्या १३ तारखेला सगळी छोटी मंडळी शाळेच्या गेटवर आपापली दप्तर सांभाळत, हातात रंगीबेरंगी वॉटरबॅग घेऊन, काहीसे त्रासलेले (सुट्टी संपली म्हणून) काही आनंदी आपले मित्र भेटणार म्हणून, नवीन वर्गात जायला एकदम उत्साही, नवीन बाई सरांना भेटण्यासाठी उत्सुक आणि आयुष्याच्या पुढील पायरीवर चढून वाटचाल करायला एकदम तयार . खरच तो दिवस आजही आठवतो आदल्या दिवसापर्यंत चालेलेली तयारी, बाबांनी नवीन पुस्तकाना घालून दिलेली चापचोप कवर्स, आपण फक्त स्टिकर लावायचे 😉
वॉटरबॅगवर आपला कोणी तरी आवडीचा सूपरहीरो, किवा एकदम हाय फॅंडू गेजेट वाटावी अशी..दप्तराला जास्त खण हवेत आणि आपण ते कशासाठी वापरायचे ते आणल्याबरोबर ठरवायच..नवीन पुस्तकांचा वास घेत, वर्गात गोंधळ चालू होईल. आपण पहिल्या पानावर सुबक हस्ताक्षरात नाव लिहतो भले बाकी पुढली सगळी पान डॉक्टरी लिपीत 🙂 मग एक-एक तास संपायची घंटा वाजते, छोटी मधली सुट्टी, मोठी सुट्टी मग डबे खाउन बाहेर धुम ठोकायची..मग पकडापकडी, कॅच कॅच खेळायच..
घंटा वाजली की धावत धडपडत बाकावर येऊन बसायच, एकमेकांच्या खोड्या काढायाच्या परत अभ्यासात तात्पुरत मन लावून बसायच पण सगळा लक्ष असत ते शेवटचा तास संपायची घंटा कधी वाजतेय ह्याच्याकडे आणि एकदा ती वाजली की वाजली धुम घरी ठोकायची…मज्जा ना..
किती मस्त वाटत 🙂 निदान अश्या गोष्टींसाठी तरी कधीच मोठ होऊ नये..खरय ना मित्रहो?
–सुझे 🙂
शाळा सुटली, पाटी फुटली.
शाळा सुटली, पाटी फुटली आई मला भूक लागली 🙂
सगळं सगळं आठवत …. अन खर्च अश्या गोष्टीसाठी कधीच मोठ होवू नये 🙂
हो रे, ते दिवस वेगळेच 🙂
Kharach.. agadi 13-14 June chya dhavapalichi athavan jhali…
हो ना गौरव एकदम मला पण एकदम किलबिलाट जाणवू लागला शेजारच्या शाळेत..मग लिहून काढला 🙂
ब्लॉगवर स्वागत, अशीच भेट देत रहा
अगदी… अगदी..
नविन पुस्तकांचा वास, वहीच्या पहिल्या पानावर सुबक अक्षरात आपलं नाव… एकदम जाणवले रे.. काय मस्त दिवस होते ते…
येस आप, दोज़ आर द डेज 🙂
>>बाकी पुढली सगळी पान डॉक्टरी लिपीत<<
हा हा. हे भारी होतं 🙂
अरे हो, माझ अक्षर एवढा वाईट आहे की मलाच वाचता येत नाही कधी कधी 😉
झकास सुझे!
कालपासून कसली अनामिक हूरहूर लागली होती, ते आत्ता जाणवलं! 🙂
विभि, मलापण होती रे हूरहूर ..मग अशी खरडून काढली..थॅंक्यू रे
मजा म्हणजे आपल्या शाळा सुरु व्हायचा आणि च्यामारिकेतल्या शाळा उन्हाळ्यासाठी बंद व्हायचा मोसम हाच…:)
हे हे मस्त ना 🙂
सुट्टी कितिही हवीहवीशी वाटत असली तरी हया जुनच्या महिन्यात मला नेहमीच कधी एकदा शाळा सुरु होइल असे वाटायचे….कोई लौटा दे वो प्यारे प्यारे दिन…..पोस्ट भारीच…खुप आठवणींना उजाळा देणारी…
कोई लौटा दे वो प्यारे दिन…खरच यार 😦
पावसाळा आला की मला पहिली आठवते ती शाळाच. दहावीनंतर मला फक्त एकाच गोष्टीसाठी शाळा सुटल्याचा आनंद झाला – गणित! नाहीतर शाळेतील मौजमजा कुणी विसरू शकतं काय? अजूनही मी शाळेत जात असल्याची स्वप्न पडतात मला. ते दिवस आता परत येणार नाहीत याची खंत आहे.
गणिताशी आपला वाकड आहे ते आजतागायत….सांग ना ताई मग एखाद स्वप्न आम्हालापण 🙂
हो…किती मजा यायची ना पहिल्या दिवशी…आपण आधीच ठरवलेलं असायच कि पहिल्या दिवशी आपल्या कोणत्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या
शेजारी बसायचं ते… आणि मला सगळ्यात जास्त आवडायचा तो नविन पुस्तकांचा वास…
गेले ते दिन गेले…..
हो की मज्जा ना..आणि आपण तर एकाच शाळेतले कसा विसरेन मी:)
सोनेरी दिवस…अजुन काय बोलू…
आणि माझ्या बहुतेक पोस्टमध्ये लहानपनीचे, शाळेचे संदर्भ येत राहतात..
बालपणीचा काळ सुखाचा…
खरच रे..लहानपण देगा देवा
शाळेत खरंच मजा यायची. शाळेत मी जी धमाल केली तिची सर कशालाही नाही.
हो रे संकेत..ते दिवसच वेगळे 🙂
aathvtat te shaleche divas khup maza hoti shalet