रिसेशन..महागाई..लग्नसराई


आजकल फ्लोरवर एजेंट्स लॉगिन वाढवल्यामुळे जास्त वर्कलोड येत नाही, त्यामुळे सगळे आम्ही पाच-सहाजण मॉनिटरकडे पाठ करून गप्पा करण्यात गुंग झालो होतो..पर्फॉर्मेन्स डेटा, अपरैजल् गप्पा चालू होत्या. मागच्यावेळी आमच्या कंपनीची हालत चांगली नाही (असा कारण देऊन चांगली असताना, नॅस्डॅकचे अपडेट्स मिळत असतात मला..) म्हणून नावापुरता पगार वाढवून मिळाला होता..म्हटला आता परत असा झाला तर सोडून द्यावी नोकरी. शोधू दुसरा जॉब.

पण ते इतक सोप्प नाही हे माहीत आहे असो. हल्लीच आमच्या कंपनीचा सगळ्यांत मोठा क्लाइंट एचपी (HP) ने तब्बल २४०-२६० लॉगिन्स कमी केले ते पण दोन दिवसात. किती अनिश्चितता आहे हल्ली जॉब मध्ये. त्या दिवशी मला लगेच अडोबीच्या दिवसाची आठवण झाली. अडोबी बंद होतय हे कळल्यावर फ्लोरवर अक्षरक्ष रडारड झाली. अडोबीमध्ये एजेंट्स होते ४५०. आता ह्या घडीला एचपीमध्ये ८००-८४० जण आहेत. ज्यादिवशी हा प्रकार झाला त्यावेळी कंपनीच्या गेट बाहेर खूप निदर्शन झाली, पोलीस आले, आमच्या यूस ऑफीसमधून एचआर हेड सुद्धा मुंबईत येऊन गेला. खूप भीती वाटली होती ते बघून..म्हटला असा आपल्यासोबत… नको नको ती कल्पना 😦

हे असे प्रकार यूसमध्ये मागीलवर्षी झाले होते त्याला रिसेशन असा म्हटला गेला आणि भारतीय अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार भारताला ह्याचा कमी फटका बसेल काळजी नसावी. पण जे व्हयायच ते झालाच. ओबमाच्या नवीन पॉलिसीनुसार आउटसौरसिंग करणा महाग झाला, त्याच्या फारसा परिणाम नाही दिसला कारण त्याना बिजनेस आउटसोर्स करून एवढा फायदा होत होता की ती वेळ पण निभावून गेली. तरी खूप परदेशी क्लाइंट्स सॉफ्टवेर, बीपोओ, कन्स्ट्रक्षन मधील सोडून गेले ह्याची माहिती त्यानाच आहे जे बेरोजगार झाले. एकीकडे भारतात सॉफ्टवेरच्या दादा कंपनीम्हणून गणल्या जाणार्‍या कंपन्या कर्मचारी कपात आणि त्याहून जास्त पगार कपात करू लागले, कारण भारतात सॉफ्टवेरमध्ये काम करणार्‍याला तगड मानधन दिल जात हे आपण जाणतोच म्हणून कॉमर्स शिकलेले स्टूडेंट्ससुद्धा छोटा-मोठा कोर्स करून सॉफ्टवेर डेवेलपर म्हणून काम करू लागले. हे असा अनबॅलेन्स्ड झाला की एकीकडे भरभरून पैसा आणि एकीकडे एकेक दिवस काढायची मारामार.

रिसेशन..महागाई..लग्नसराई

मी स्वत: खूप वाईट दिवस बघितले आहेत त्यामुळे खरच खूप भीती वाटते, की आपण ह्या शर्यतीत किती खुजे आहोत, कोणीही केव्हाही दुधातील माशी काढावी तसे फेकू शकता आपल्याला. एवढी अनिश्चितता आली आहे सध्या माझ्या मनात की घाबरून घाबरून काम करतो. बीपोओवाले काही झाले तरी सगळ्यांच्या दृष्टीने कमी दर्जाचे काम करणारे लोक हे मला पदोपदी जाणवला कधी घरून, कधी माझ्या जिवलग मित्रांकडूनसुद्धा पण असो..कॉस्ट ऑफ लीविंग एवढी जास्त वाढली आहे आज काल की भीती वाटणारच.  भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल मी जास्त काही बोलू ईच्छित नाही, पण वाढलेली महागाई कोणापासून लपून राहिलेली नाही. जगातील संपूर्ण अर्थव्यवस्थेत अमेरिकेचा वाटा २७ टक्के आणि यूरोपिय देशांचा २३ टक्के. भारतीय अर्थव्यवस्था ह्यांच्यावर अवलंबुन आहे हे कोणी शेबंड पोर ही सांगेल. अमेरिका सध्या स्थिरावतेय असा सांगितला जात पण तिथे काम करणार्‍या मित्र मंडळीशी बोलण होतच ईमेलने, तेव्हा खरी परिस्थिती कळते. तिथे लोकांचे हाल हाल आहेत. युरोपमधील ग्रीस, स्पेन तर अतिशय वाईट अवस्थेत आहेत सध्या. दरोडे, निदर्शने, सरकारी इमारतींवर हमले तिथे चालूच आहे गेले कित्येक दिवस. आमचे क्लाइंट असे सांगत असतात की यू पीपल आर लकी इन देअर इंडिया, वी आर एक्सपीरियेन्सिंग लॉट्स ऑफ प्रेशर हियर. डोण्ट नो व्हेन दे गोना किक अवर ASS…आता ह्या बोलण्यावर मी हसू का रडू अस झाला होत..

भारतात इन्फ्लेशन रेट कमी असल्याच सांगतात. कोणी मला सांगेल का हा दर कसा कॅल्क्युलेट करतात?? तिथे रेट कमी होतोय असा सांगतात आणि इथे महागाई वाढत जातेय.. एक पॉइण्ट कमी झाला की त्याची ब्रेकिंग न्यूज़ करतात. पण एका मूठभर साखरेसाठी भांडण करणारी भावंड मी बघितली आहेत ऑफीसमध्ये. मुलांची ठरलेली लग्न मोडली गेली..मुलींना चोईस असतो नकार द्यायचा की बाबा ह्याचा पगार कमी, ह्याची कंपनी फालतू, ह्याची नोकरी काही टिकत नाही जास्त, हा मला पोसू शकणार नाही..पण ज्याच्यावर ही वेळ येते त्याने काय कराव? (हे घडलाय माझ्या मित्राबरोबर). घरचा कर्तापुरूष स्वत:च्या कुटुंबीयाना निदान पॉलिसीचे पैसे मिळावे म्हणून जीव देतोय, घर गहाण ठेवतोय , कर्ज काढतोय, चोर्‍यापण करतोय..असे कित्येक प्रकार ऐकिवत आहेत. कसा होणार आहे पुढे आपला? सगळेच काही जास्त पैसा कमावू शकत नाही ह्या महागाईत जगायला. म्हणजे गरीब लोकांनी मरणे हाच उपाय आहे  का? तुम्ही म्हणाल खूप निगेटीव विचार करतोय (एक व्यक्ती तर आहेच जी नक्कीच ह्याला हो म्हणेल असो..), पण खरच इच्छाशक्ति संपत आलीय. मग तुम्ही काही म्हणा मला.

इम्रान त्याचदिवशी विचारात होता, अब २६ साल का हो गया तु, अभी शादी करले तो तेरे बच्चे तुझे संभालनेके लायक होंगे जब तू रिटायर होगा. कुछ चिजे टाइम से हो तो अच्छी होती है. मी त्याला म्हटला होता बाबा इथे अशी परिस्थिती आहे कशाला अजुन एक जीव रखडायला आणू आयुष्यात? तर तो म्हणाला अरे बाप का हाथ है तेरे सर पे ना अभी, जो रिस्क लेनी है लेले, वक्त बदल जाएगा, उपरवाले पर भरोसा रख. मी म्हणालो त्याला जेव्हा मला वाटेल मी समर्थ आहे हे करायला तर करेन नाही कधीच करणार नाही लग्न…

ह्यावर त्याने मला फक्त वेड्यात काढला बस 😦

17 thoughts on “रिसेशन..महागाई..लग्नसराई

 1. महागाईचा दर आणि महागाई…ह्याचा अर्थाअर्थी संबंध नाही.
  कसं ते पाहा….
  आज समजा १० रुपयांना एक वस्तू मिळतेय आणि महागाईचा दर आहे १०%….
  म्हणजे १० रुपयांवर १ रुपया वाढेल…इतपत महागाई.
  आता हाच दर जर १०% वरून ८% वर आला तर?
  तरीही १० रूपयांवर ८०पैसे वाढणारच आहेत…
  म्हणजे मूळ १० रुपयांच्या किमतीत घट होणार नाही…
  तर तिच्यात वाढू शकेल अशा किंमतीत(म्हणजे इथे महागाईत)कमी जास्त बदल होईल.
  त्यामुळे वस्तु स्वस्त होणार नाही तर ती कमी दराने वाढेल इतकेच…
  हं. जर हा महागाईचा दर ०% च्या खाली जाऊ लागला तरच मूळ किंमतीत घट होऊन महागाई कमी होईल.

  1. अस हाय काय..
   मग इनफ्लेशन रेट कमी झाला तर नाचतात का हे लोक? त्याने काही फायदा होत नाही ना?

   1. The inflation published in media is wholesale inflation. Retail inflation is at least 20-30% more than that. Also, this (irrelevant) inflation is measured for a basket of commodities which is quite funny. You can trust on RBI, Ministry of Finance and Ministry of Statistics in rightly calculating the actual number.
    Above that, the inflation percentage increase in price wrt price level in same moth last year. This gives no clue of price fluctuations relative to beginning (calender or financial) of this year.
    The best way is to look at the inflation index with base year in some past (say 2000). This will give a clear idea how many times prices are more today. suppose the index is 340, then inflation is 34% (annual straight) or 14% compounded for all these years. Your take home salary+benefits must increase by this 14% over last year base so that you maintain lifestyle provided your expenses dont increase.

    1. It should be easy read now:
     The inflation published in media is wholesale inflation. Retail inflation which matters to us is at least 20-30% more than that. Also, this (irrelevant) inflation is measured with respect to a basket of commodities that which hardly find place in our routine life. You can barely trust on RBI, Ministry of Finance and Ministry of Statistics in rightly implementing the whole methodology of calculating the actual inflation number.
     Above that, the inflation (in percentage increase) is increase wrt price level in same moth last year. This gives no clue of price fluctuations relative to levels at beginning (calender or financial) of this year.
     The best way is to look at the inflation index with base year in some past (say 2000 with base index 100). This will give a clear idea how many times prices are more today. suppose the index is 340, then inflation is 34% (annual straight) or 14% compounded for all these years. Your take home salary+benefits must increase by this 14% over last year base so that you maintain lifestyle provided your expenses dont increase

 2. मनोहर

  भारत-चीन यानी आपल्याकडचे डॉलर्स-युरो यावेळी विकायला न काढल्याने कोणता हाहाकार टळला याची आपणास क्ल्पना आलेली नाही असे दिसते!

  1. कदाचित नसेल मनोहरजी..जरा स्पष्ट सांगाल का?
   मी पडलो साधा मध्यमवर्गीय मुलगा, जर माझ काही चुकाला असेल तर नक्की सांगा. माझ्याच माहितीत भर…

 3. सागर

  काय प्रतिक्रिया द्यावी काही काळात नाहीये रे….
  मला कधी नोकरी मिळेल?कशी मिळेल?हे असे प्रश्न सध्या डोक्याचा पार भुगा करतायत रे….

  1. अरे सगळा ठीक होईल अशी आशा करूया..काळजी नको करुस.
   आता माझ्यावर जबाबदारी वाढत जातेय म्हणून मला काळजी वाटतेय की मी त्या निभावून घेऊ शकेन की नाही बस बाकी काही नाही…

 4. परिस्थिती खरंच गंभीर आहे. काय बोलावे हेच सुचत नाही. पण इतकं नैराश्य पण असणे बरोबर नाही. पुर्वी एक म्हण होती, “जिसने चोंच दिया है, वो दाना भी देंगा”
  खरं सांगायचं तर बोलणं सोपं आहे , पण स्वतःवर वेळ आली की कळते. बरेचदा आत्महत्या करणे, हे कुटूंबाला पैसे मिळवुन द्यायचा उपाय करणारे लोकं असतात 😦 😦

  1. हो महेन्द्रजी, नैराश्य आल असा नाही म्हणणार मी पण एक अशी वेळ असते जी आपण फक्त विचारात जरी आणली तर आपण सुन्न होऊन जातो तशी माझी अवस्था झाली होती हो 😦

 5. रिसेशन मधुन यु.एस. सावरते न सावरते तोच युरोपला झटका आला..कठिण आहे बुवा…महागाईच तर काही विचारुच नको..मागे एक पोस्ट टाकली होती माहागाईवर….

  1. हो रे काय बोलू सांग ना आता ह्यावर..माझा मेंदू बधिर झाला होता काही क्षण 😦

  1. हो रे आप अगदी खर बोलले ते, पणा आपल मन माहीत आहे ना कसा आहे? सगळा ठिकच होईल अशी अपेक्षा

 6. अरे मी मागेच टाकली होती प्रतिक्रिया. आली नाही वाटतं.

  मी च्यामारिकेत आलो तेच रिसेशन सुरु होताना. खूप वाट लागली होती इकडे. कित्येक जणांचा लेऑफ होऊन त्यांना भारतात परत जावं लागलं ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. खरंच भयंकर परिस्थिती होती इथे गेल्या वर्षी. पण आता जरा ठीक आहे. पण तोवर दुबई, युरोप सगळ्यांनी नंबर लावलेत. सगळं स्थिर स्थावर व्हायला अजून २ वर्षं तरी लागतील कदाचित 😦

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.