अडोबी- शेवटचा दिवस


आज १५ मे २००९,  अडोबी (Adobe) सपोर्ट चा शेवटाच दिवस. ऑफीसमध्ये जाऊच नये अस वाटत होत, पण जाव लागणारच होत. बोरीवलीला पिकमध्ये १२ जण अडोबीचेच. सगळयांचे चेहरे पडले होते. मी पण गपचुप शेवटच्या सीटवर जाउन बसलो होतो. क्लाइंट ने इतका तडकाफडकी निर्णय घेतला होता की कोणाला सावरायला वेळच नाही मिळाला. रिसेशनमुळे आणि ओबामाच्या पॉलिसीमुळे अडोबीने मुंबई सपोर्ट कांट्रॅक्ट काढून घेतला.

१२ फेब्रुवारी २००७ ला अडोबी जॉइन केलं होत, नाइट शिफ्ट, रात्री उशिरा होणार जेवण, मग गाडीत डुलक्या काढत घरी पोचायच आणि झोपून जायच. मस्त शनिवार-रविवार सुट्टी. एक फिक्स शिफ्ट, क्लाइंट पण मस्त. पहिल्यांदाच मुंबईकडे त्यानी सपोर्ट आउटसोर्स्ड केला होता. लॉंच झाल तेव्हा पासून ह्या कंपनीशी एक नात जूळलं होत, पण जेव्हा ही गोष्ट एक महिन्यापुर्वी कळली होती की क्लाइंटने बॅक्कआउट केलंय प्रॉजेक्टवरुन, तेव्हा खूप राग आला होता. पण नंतर लक्षात आल, की बिडिंग प्रोसेसमध्ये आमच्या कंपनीने हाइ बीड प्लेस केली आणि त्याना जर आम्ही देत असलेला सपोर्ट कमी पैशात मिळत असेल तर का नाही घेणार ते?

सगळा विचारसत्र गाडीत गाणी ऐकत, तोंडावर एक प्लास्टिक स्माइल देत चालू होत. एव्हाना गाडी ऑफीसच्या गेट जवळ आली, मी उतरलो आणि सेक्यूरिटी गार्डला हाथ दाखवून आत शिरलो. फ्लोर वर आलो. माझ लॉगिन सगळ्यांच्या आधीच २ तास असायच. क्लाइंट रिक्वेस्ट होती. मी ६:३० ची शिफ्ट करायचो आणि बाकी सगळे ८:३० ला यायचे. त्यामुळे फ्लोर वर फक्त मी होतो माझ्या क्यू मधून. व्होईसची मंडळी कॉल्स घेत होती, मी बघत होतो कुठला एसॅकलेशन आलंय का ते. जास्त काम नव्हत, कारण अडोबीने सगळ्या केसेस आणि कॉल्स नोएडामधील  एका कंपनीकडे वळवलले होते. तरी थोड काम होत, ते करत होतो. जुने फोटो बघत होतो.

मन नव्हत, तरी कस्टमर्सचे प्रॉब्लेम अटेंड करत होतो. ८:३० वाजले सगळे आले, मग सगळ्याना एक एक करून रूम मध्ये बोलावून फाइनल इंटरव्यू सुरू केले, एफन्एफचे (फुल्ल अँड फाइनल). फ्लोरवर बाकी कोणीच काम करत नव्हते, मीच आपला कोपर्‍यात शेवटच्या पॉड वर कस्टमर्सना मदत करत होतो. सगळे मला म्हणाले छोड शॉन झी (Shaun Z.) बहोत काम किया, मरने दे वो कस्टमर्स आणि सगळे एकत्र जेवायला जाऊ म्हणून खाली उतरले. मी बसूनच होतो फ्लोरवर काम करत. आमचा टीम मॅनेजरपण म्हणाला जा रे काही खाउन ये, पण कसा सांगू आतून किती रडत होतो मी. मी एमोशोनली खूप गुंतून गेलो होतो सगळ्यात. ज्या मित्रांसोबत ईस्टरच्या मासला गेलो, ईद मध्ये काही दिवस रोजे ठेवले, गणपतीला मिळून पूजा आणि आरती केली. ज्यांच्यासाठी दिवाळीला माझ्या घरून एक-एक डबा बेसनचे लाडू, चिवडा, चकली असे घेऊन जायचो, मग सगळे हल्लाबोल करायचे त्यावर. सगळ सगळ कस आठवत होत. डेस्कच्या बाजूने केतकी गेली की उगाच तिची छेड काढ, मग तिची समजूत काढणे, मग तिला चॉकलेट देणे. सगळ्या फ्लोरवर कोणाला मदत लागली की दुरून ओरडायचे सुहास बिज़ी है क्या? देख ना ये इश्यू, दिमाग खराब कर रहा है यार ये कस्टमर.

सगळ सगळ त्या पॉडवर बसून आठवत होत. २ वाजले सगळे आपआपला नंबर, ईमेल आइडी देऊ लागले. माझ्याकडे शेवटचा कस्टमर आला, त्याचा प्रॉब्लेम लगेच रिसॉल्व केला, त्याने खुश होऊन अश्याच गप्पा सुरू केल्या..की बाबा “यू आर सो प्रोफेशनल्स इन दिस सपोर्ट, आइ लव्ड इट, होप टू सी यू अगेन म्हणून जाउ लागला, मीच त्याला समोरून म्हणालो नो सर दिस इंटरॅक्षन विल बी द लास्ट, दिस ईज़ माय लास्ट डे विथ अडोबी…तो म्हणाला व्हॉट? व्हेयर आर यू मूविंग?..मी काहीच नाही बोललो….”

मला खूप रडावसं वाटत होत त्याक्षणी. निघायची वेळ होत होती माझी. ३ वाजले होते. सगळ्यांना भेटायाचं होत मला जायच्या आधी. मग मायक्रोसॉफ्ट, सायबेस, एचपी मध्ये जाऊन, मग अडोबीच्या फ्लोरकडे वळलो. सगळ्याना गळाभेट देताना अश्रू थोपवत होतो मी. केतकी ने मला पिंग करून बाय म्हटलं, तस मी तिला भेटायला जाणार तेव्हा ती माझ्याकडे आली आणि हाथ मिळवून निघून गेली तिचे पाणावलेले डोळे बघून मलापण अचानक भरून आलं आणि मी वॉशरूम मध्ये गेलो. तोंडावर पाणी मारलं आणि बाहेर आलो. सगळे आज लॉग आउट नंतर थांबणार होते, मी पण हो सांगितलं होत, पण मला वाटत नव्हत मला ते शक्य होईल म्हणून मी नाही थांबणार सांगून सगळ्यांना भेटून निघालो. सगळे बघत राहीले माझ्याकडे मला काय झालं आणि मी आपला पाठ फिरवून डोळे पुसत बाहेर पडलो फ्लॉर वरुन…

त्या दिवशी ह्याच वेळी मी तो फ्लोर सोडून निघून आलो होतो. मी खूप ईमोशनल झालो होतो, कदाचित पहिला जॉब सुटायची, ईतकी नाती तुटायाची भीती म्हणा….शॉन त्या दिवशी खूप खूप रडला, पण ती नाती आजतागायत टिकून आहेत भक्कम.. 🙂

चला माझा शेवटचा ट्रान्सपोर्ट सुटतोय अडोबीचा ४ वाजले…..घाई करायला हवी….टाटा

 

(एक आठवण आजच्या दिवसाची, अशीच  )

– सुझे

22 thoughts on “अडोबी- शेवटचा दिवस

  1. खरंय सुहास.. कधी कधी professional relations ही personal relations पेक्षा जवळची वाटतात आणि साईट बदलताना खूप त्रास होतो. मीही गेलोय यातून. समजू शकतो मी..

  2. sagar

    खूप सही लिहल आहेस सुहास…सर्व डोळ्यासमोर उभ राहील…नाती अजून आहेत न…मग त्यात सर्व आल…

  3. Avinash Nikam

    Jari me kantalun Steam cha job sodala asala tari mala shevatchya divashi khup vait vatal(Aaj hi aaplya batch la khup miss karato re) pan kay karanar changala Job hatat hota ani kela BYE BYE stream la.

    Aso kharach chaan post aahe.

    Ani thodi frequecy vathav re POST likhinyachi(Mala mahit aahe tu kasa ani kiti busy asatos, !tarihi!), me darroz office la aalya aalya check karato tuza blog.

    1. हो रे ग्रोथ होते तर थांबू नयेच…तू घेतलेला निर्णय एकदम बरोबर आहे…
      फ्रीक्वेन्सी वाढव म्हणतोस… विषयच नाही लिहायला..सुचव की एखादा 🙂

  4. शुक्रवारीच दोन जणांना निरोप दिलाय आम्ही.. जड होतेच… पण प्रोफेशनल रिलेशन मध्ये जीवाभावाचा मित्र मिळाला तर प्रोफेशन बदलल्यावर देखील नाती तुटत नाहीत.. तेच पर्सनल रिलेशन्स मध्ये दूर गेल्यानंतर नाती तुटू शकतात…

  5. भलताच भावूक दिसतोस तू सुहास. केवळ २ वर्षांच्या नोकरीत इतका गुंतलास!
    मी तर ३१ वर्षांनंतर नोकरी सोडली(सेवानिवृत्ती घेतली) तेव्हा तर माझे किती तरी जीवाभावाचे मित्र झाले होते…पण त्यांना सोडतांना वाईट वाटलं तरी ते अपरिहार्य आहे हे जाणून फारसे काही दडपण नाही आले…आपण इतकं गुंतून राहिलो एखाद्या ठिकाणी तर जगणं कठीण हॊऊन जाईल…तेव्हा काळजी घे.
    नवा डाव नवा विटी-दांडू…हेच लक्षात ठेव….
    आयुष्यात लोक येतात-जातात, काही संबंध टिकतात,काही तुटतात…हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे..तो स्वीकारायचा आणि पुढे चालत राहायचे…
    जीवन गाणे गातच राहावे,झाले गेले[झेले नाही ;)]विसरून जावे,पुढे पुढे चालावे!!!

    1. हो रे देवा, खूपच काय करू. गुंतून जातो एकदम, तोच एक वीक पॉइण्ट आहे आपला 😦

      जीवन गाणे गातच राहावे,झाले गेले विसरून जावे,पुढे पुढे चालावे..अगदी खर..झेले नाही 🙂 हे हे हे

  6. मला तरी अजून असा अनुभव आलेला नाही. पण खूपच सेन्सिटीव्ह दिसतोय तू. एकाच कंपनीत नुसतं डिपार्टमेंट जरी बदललं तरी अनिझी होतं.. इथे तर सगळ्ंच बदलणार. नविन प्रोजेक्ट मिळेलच .. त्यासाठी सिनेमा.

    1. हो काका, सगळा जग बदलणार ते पण एका फटक्यात खूप तुटलो होतो आतून..पण आता सावरलोय

  7. खूप इमोशनल आहेस तू सुहास. हल्ली अशी माणसं विरळाच. एखादी गोष्ट सुटताना खूप त्रास होतो आणि इमोशनल लोकांना तर भलताच. त्यातून तुझं दोन वर्षांचं नातं. पण चालायचंच. रिलॅक्स. तुला पुढच्या सगळ्यासाठी शुभेच्छा! 🙂

  8. अनिकेत

    हम्म.. काही वर्षांपुर्वी आमच्या कंपनीमधुन पण एकदम २१ लोकं काढले होते, त्यातील काही अत्यंत जिवाभावाचे होते. त्यांना निरोप देताना काय वाटलं ते माझं मला माहीत. त्यांच्याकडे त्या क्षणी दुसरी नोकरी नसुनही ते खंबीर होते आणि मी मात्र रडवेला झालो होतो.

    म्हणतात, ’Don’t love your company, love the work you are doing’, पण अजुन तरी जमलं नाहीये मित्रा 😦

    भविष्यासाठी शुभेच्छा

  9. सुहास नाती कशी जुळतात ते कळतच नाही. जोडलेली नाती हि सख्या नात्यापेक्षाही अधिक भक्कम पणे टिकतात. तू जिथे जाशील तिथे अशीच नाती जोडशील हे मात्र नक्की. नात्यांची हि गुंफण मला आवडली.

    1. धन्यु तायडे,
      मी प्रयत्‍न करतोच नाती जपायाचा आणि कधी न तुटू देण्याचा निदान माझ्याकडून तरी नाही…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.