इतके दिवस होणार होणार म्हणत दिवस काढणारे आम्ही आज प्रत्यक्ष त्या दासावा सभागृहात मेळाव्यासाठी जमायला घरून निघालो. नेमका ट्रेनचा मेगाब्लॉक आडवा आला, घामाच्या धारा, गर्दी, गोंधळ हे सहन करत करत मी दादरला पोचलो. मला लवकर पोचायच होतं, पण ट्रेनमुळे उशीर झाला. आदल्या दिवशी सचिनने बॅनरचा काम करून घेतलं होत, तो बॅनर घेऊन सचिन तर सगळ्यात आधी दासावाला हजर. मग सागर आला आणि कांचनताई पण. मी तिथे पोचेपर्यंत सगळी तयारी करून झाली होती.
खूप ब्लॉगर्स मंडळी तिथे हजर होती. आत शिरताच आप, साबा, भामुं, श्रीमंत, कांचन ताई, अपर्णा, आर्यन (सोनाली) गप्पा मारत उभे होते.. मग सगळ्यांच्या भेटी झाल्या. हळूहळू सगळेजण येऊ लागले. मी आणि सचिन त्यांची नाव पडताळुन त्याना बॅच देत होतो. एक उत्साह होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर. सगळ्यात आधी त्याची ओळख आम्हालाच होत होती आणि आम्ही अरे तू काय झकास लिहतोस / अरे या काका/ काकू..असा स्वागत करू लागलो.
ट्रेनचा गोंधळ असल्याने कार्यक्रम ३० मिनिटे उशिरा सुरू झाला. कांचनताईने माइकचा ताबा घेऊन छोटं प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली. मग सगळे ब्लॉगर्स एक-एक करून आपली थोडक्यात ओळख करून देऊ लागले. मला तर काही शब्दच फुटत नव्हते (ऑफीसच्या ट्रेनिंगरूममध्ये ६-७ तास ट्रेनिंग देणारा मी, माइक पकडून स्वत:ची ओळख करताना तत..पप होत होत..असो) सगळ्यांच्या ओळखी झाल्या, एक एक नावाबरोबर आमच्या चर्चा वाढु लागल्या, काय लिहतो रे हा मस्त, एकदम डोकेबाज माणूस, अरे हा काय तो, त्याचा ब्लॉग वाचतो की मी..मग कुठला ब्लॉग, कसले विषय अश्या चर्चा रंगात गेल्या.
आता खादाड नगरीचे श्रीमंत, पंतप्रधान, सेनापती आणि सुभेदार जिथे जमतील तिथे खादाडी नसेल? शक्यच नाही…हा हा हा..मस्त गरमागरम बटाटेवडे आणि कटलेट..आहाहहा. घाबरू नका, ज्यांना जमलं नाही यायला त्यांच्या वाटणीचं पण खाल्लं बर आम्ही 🙂 :)..जोक्स अपार्ट…अशी मंडळी होती ज्यांना मला भेटायाचच होत, पण काही कारणामुळे त्याना जमला नाही 😦 …पण त्यांच मन आणि सदिच्छा आमच्या सोबत आहेत याची जाणीव होत होतीच..हेरंब, अल ने तर न राहवून फोन पण केले आणि सगळ्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या….
कार्यक्रम मस्त पार पडला, ज्याना काही अडचणी होत्या ब्लॉगबद्दल त्याना कांचन, आणि उपस्थित मान्यवर मंडळी ह्यानी मिळून सोडवल्या…
हा आनंद सोहळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल कांचनताईचे विशेष अभिनंदन..अगदी लग्नसराईत करतात तशी धावपळ करीत होती ती..तसेच रोहन आणि महेन्द्रकाकाना खूप खुप धन्यवाद…आणि शेवटी माझ्या सगळ्या बिन भिंतीच्या घरातल्या सदस्यानो तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला भेटायला आलात आभार…असाच लोभ असावा 🙂 🙂
मी काही फोटोस इथे अपलोड केले आहेत…तुम्ही ते डाउनलोड करू शकता…
सुहास, मस्तच. जाम धम्माल केलीत यार तुम्ही लोकांनी.. आणि अर्थात मेहनतही खूप केलीत हा आनंद सोहळा यशस्वी होण्यासाठी. 🙂
भेटायची इच्छा होतीच पण….
म्हणून तर दुधाची तहान फोनच्या ताकावर भागवून घेतली 🙂
सगळ श्रेय कांचनला…
आणि ह्या वेळी मिस केलस पुढच्यावेळी जर आला नाहीस ना तर बघ, गाठ माझ्याशी आहे 🙂 ही धमकी आहे बर..Keep in mind…;-)
खुप बर वाटल सर्वाना भेटुन….. 🙂
मज्जा आली, पुढल्यावेळी वेळ ठेव आपण रात्री खादाडी करायला जाउ मुंबईची 🙂
Pingback: Tweets that mention आनंद सोहळा, दासावा मुंबई ९ मे २०१० « मन उधाण वार्याचे… -- Topsy.com
सुहास छान लिहिलंस. तुझा छोटेखानी वृत्तांत आवडला.
धन्यवाद, देवा 🙂
खुप बर वाटल सर्वाना भेटुन…..
हो मी तर तुमच्याबद्दल खूप ऐकून होतो, भेटायाचा योग काल आला…:)
सुहास, लगेच सोहळ्याचे वर्णन केलेस…. खूप खूप धन्यू रे. मस्त मजा आलीये ते दिसतेयं अगदी. सहीच. हा सोहळा बहारदार होण्यासाठी सगळ्यांनी घेतलेल्या श्रमाचे सार्थक झाले. मी खूप मिस केले तुम्हा सगळ्यांना. बेटर लक नेक्स्ट टाईम.
हो ग श्रीताई, खूप खूप खूप मिस केला मी तुम्हा सगळ्याना..पुढल्यावेळीस चुकवू नका प्लीज़..
🙂
:-))))))
🙂 🙂
मज्जा आली..खूप मस्त वाटला भेटून
सुहास फोटोंबद्दल आभार रे :)… खरयं आम्ही सगळ्यांनी खूप मिस केला हा मेळावा…पण आता भारतात आलो की गाठणार तुम्हाला नक्की…. 🙂
नक्की तन्वी, भेटायाच आहेच मलापण..
छान वर्णन केले आहेस.. ! 🙂
धन्यवाद आणि स्वागत ब्लॉगवर..तू आलास बर वाटल..
छान शॉर्ट एन स्वीट वर्णन….
सांगुन धापले हं तुझे फ़ोटोस… 🙂
अरे देवेन, आपलेच आहेत ते फोटो..बिंदास वापर..
आणि ही पोस्ट घाईत टाकली हेरंब, तन्वी, श्रीताई, विद्याधर आणि जे लोको येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी..
सुहास मस्त झाला कालचा कार्यक्रम. सगळ्यांना भेटुन मजा वाटली.
हो सोनाली, खूप धमाल आली पण तू लवकर गेलीस निघून 😦
छान! फोटो टाकल्याबद्दल खूप आभार.
धन्यवाद, सीताराम
सणसणीत… दणदणीत… खणखणीत…. जबरदस्त झाला कार्यक्रम… कांचनचे ख़ास आभार…
फोटोचे काम करतोय.. झाले की इकडे लिंकतो… 🙂
लवकर येऊ देत 🙂
अरे तुम्ही सगळे ऍक्टीव्हली इव्हॉल्व्ह झालात म्हणुन बरं झालं, नाहीतर शक्यच झालं नसतं..
तुम्हा सगळ्याना भेटण्याची अपार इच्छा हीच ह्या उत्साहाला कारणीभूत 🙂
सुहासजी,
एकूण तुम्ही लोकांनी मेळाव्यात धम्माल केलीत हे वाचून व पाहून खूप आनंद झाला. खरे तर मीही तिथेच होतो कुठेतरी मनाने-अदृश्य रूपाने, मला कुठले वैन पडणार होते का इथे? …वृतांत एकदम झक्कास !
पेठे साहेब तुमची भेट घ्यायची होती मला पण तुम्ही आलाच नाहीत.
धन्यवाद पेठे काका, पण सुहासजी कोण? सुहास अशी एकेरी हाक मारा मला…तुमच्या शुभेच्छा होत्याच म्हणून कार्यक्रम यशस्वी पार पडला…
सुहास खुपच आनंद झाला ह्या सोहळ्यात सहभागी होऊन.
मला पण काका..खूप खूप खूप 🙂
सुहास आता लक्षात आल की तुझ्या लेखाचे नाव व माझ्या लेखाचे नाव अनावधानाने एकच आहे.
🙂
Pingback: मराठी ब्लॉगर मेळावा: सर्व वृत्तांत एके ठिकाणी « रमलखुणा
मी पण खरच खूप miss केला हा सोहळा. पुढच्या सोहळ्याला हजेरी लावण्याचा प्रयत्न करीन.
नक्की, जीवनीका
सुहास, गडबडीमुळे खादाडी राहीली रे.. पुढल्यावेळी नक्की करुया
आनंदा, पुढल्यावेळीस जर काही कारण दिलस तर पकडून ठेवेन हा मुंबईत 🙂 🙂
बटाटेवड्याची चव जिभेवर आणि आनंदसोहळा डोळ्यासमोर अजूनही रेंगाळत आहे…. 😉
हो मग काय..मस्तच मेळावा आणि बटाटेवडे :):)
शॉर्ट ऍन्ड स्वीट वृत्तांताने पुन्हा ९ मेची आठवण ताजी झाली….(आणि वडा-कॉफ़ीची चव तोंडावर आली)…
अग तू आलीस खूप खूप बर वाटला..
नमस्कार,
आपण मराठी ब्लॉगर मेळाव्यात भेटलो होतो.
थोडा उशिर झाला सपंर्क करण्यास मात्र खरंच खुप छान वाटले त्यादिवशी भेटुन.
मी तुमचा ब्लॉगचे नाव लिहुन घेतले होते.
कृपया सपंर्कात राहावे.
नागेश देशपांडे
blogmaajha@gmail.com
blogmajha.blogspot.com
नमस्कार नागेश, ब्लॉगवर स्वागत..
खूप मस्त वाटला सगळ्याना भेटून..परत भेटूच..ब्लॉगला अशीच भेट देत रहा…
Pingback: अविस्मरणीय नाणेघाट…!! | मन उधाण वार्याचे…