स्वप्नात रंगलो मी..


खूप दिवस झाले काही तरी लिहेन लिहेन म्हणून काही दिवासापूर्वी ही पोस्ट लिहायला घेतली होती, पण काय लिहु कसा लिहु ह्या विचारात ही पोस्ट ड्राफ्टमध्येच पडून होती. म्हटला काय लिहाव ह्यावर..आता तुम्ही म्हणाल माझी गाडी आज “स्वप्ना”वर कुठे घसरली…हो ना? 🙂 गेले काही दिवस आमचा मठ स्वप्नाच्या दुनियेत आहेत आधी “अल“च स्वप्न आणि मग साक्षात देवाच..मग ही पोस्ट टाकायची म्हणून ठरवल आणि आज पोस्टतोय तुमच्यासमोर…

स्वप्न- आपल्या मेंदूद्वारे चित्रित आणि दिग्दर्शित, मनाच्या भावनिक गुंतागुंत असलेल्या पटकथेतून साकारलेल आणि यशस्वीपणे निर्मिती केलेल असा नाट्य….जे आपण डोळे बंद असताना भरभरून बघतो..काही जण रोज काही जण कधी कधी…स्वप्न जे कधी खुप भयानक तर कधी अती रोमॅंटिक, कधी भुताच तर कधी देवाच, कधी प्रेमाच कधी मरणाच, कधी आपल्या जवळच्या माणसांच तर कधी तोंडसुद्धा न बघितलेल्या लोकांच, कधी पूर्ण सलग कधी तुटक, कधी आवडणार कधी न आवडणार..अनेक प्रकार आहेत ह्याचे..ह्या पृथ्वीतलावर असा एकही मनुष्यप्राणी नसेल ज्याला स्वप्न पडत नसेल….

असच वाटला लिहुन काढू आपली स्वप्न म्हणून मी मला पडलेली चांगली, वाईट लक्षात राहिलेली स्वप्न जीमेलच्या ड्राफ्टसेक्षनला सेव्ह करून ठेवायची सवय आहे मला गेली दोन-तीन वर्ष. कधी कधी काही स्वप्न जिवलग मित्रांबरोबर गप्पा मारताना बाहेर पडली किवा स्वप्न खरी घडली..हो बरोबर वाचलात तुम्ही. काही स्वप्नातील प्रसंग प्रत्यक्षात घडतानाचा अनुभव ही मला खुप वेळा आलाय. घाबरू नका मी काही मला देवाने दृष्टांत दिला स्वप्नात आणि म्हणून ते तसा घडत असा अजिबात नाही, अनुभव सांगतोय…असे म्हणतात पहाटे-दिवसा पडलेली स्वप्न खरी होतात, असा झाला तर माझा प्रत्येक स्वप्न खर व्हायला हव की, सकाळीच तर झोपतो मी 🙂 स्वप्न आपल्याच मनाचा खेळ, आपणच त्याचे सर्वेसर्वा स्त्रोत. दिवसभरात (माझ्यासाठी रात्रभरात) आपल्या आजुबाजूला घडलेले प्रसंग, काही विशिष्ठ व्यक्ती, त्यांच्या हालचाली, काही संवाद, काही बातम्या आपल्या मेंदूच्या एका कोपर्‍यात निद्रस्थ अवस्थेत जमा होतात आणि जेव्हा आपण निद्रस्थ होतो तेव्हा आपला मन आणि मेंदू ह्या गोष्टींवर चर्चा करतात. तीच चर्चा आपल्याला झोपल्यावर दिसते 🙂 🙂

मला तर खूपच विचित्र विचित्र स्वप्न पडतात..जी लक्षात रहातात मी त्याच्या संदर्भ लावायचा प्रयत्‍न करतो..अगदी नुकतच पडलेल स्वप्न म्हणजे परवाच “मला फोन येतो मोबाइलवर ऑफीसमधून पिक अप ला गाडी आली आहे खाली गेट जवळ ये..मी उतरतो, इडिकाचा दरवाजा उघडून आत बसतो आणि बघतो तर काय ती गाडी एक चालत फिरत ऑफीस होत..निळ्या पिवळ्या रंगाचे कंप्यूटर (अजिबात आवडला नाही कलर पण असो :))..माझ्या डेस्कवर माझ्या नावाची पाटी, मॅक पीसी, मस्त हेडफोन्स, लाउड म्यूज़िक आणि आमची टीम मॅनेजर (खर तर आमच्या प्रोसेसमध्ये कोणी मुलगी टीम मॅनेजर नाही ;-)) कदाचित, त्या राकट टीम मॅनेजर पेक्षा अशी समंजस मुलगी माझ्या मनाला भावाली असेल [आता ती समंजस कशी ठरली म्हणून विचारू नका :p] असो आमच ते ऑफीस फिरत फिरत सगळ्याना घरून पिक करत शहरभर फिरत होत. ट्रॅफिक नाही, जास्त काम नाही, कोणी बोलायला नाही.. मस्त मज्जानी लाइफ होती. मी डेस्कवर मस्त डोक ठेवून झोपणर इतक्यात डेस्कवरचा फोन वाजला आणि माझ्या उशी जवळ ठेवलेला फोन मी उचलला आणि कानाला लावला 😦

एक लक्षातील स्वप्न माझ म्हणजे. आमच अमरावतीच आजोबांच भलमोठे घर, मी आणि घरचे सुट्टीत तिथे गेलोय. मला रात्री तहान लागली, म्हणून मी किचनच्या दिशेने निघालो. घरच्या मागल्या अंगाणात असलेल्या विहिरीच्या बाजूला पाण्याचे मोठे माठ होते, मी त्यातून पेलाभर पाणी काढल आणि आकाशातल चांदण बघत पाणी संपवून ग्लास ठेवणार तर समोरच्या अंगाणाच्या भिंतीवर एक आकृती चालताना दिसली. मांजर नव्हती ती, मला वाटला कुत्रा असेल म्हणून मी त्याला हट..हट असा केला. त्या चार पावलाच्या आकृतीने एकदम मोर्चा माझ्याकडे वळवला, मंद प्रकाशात त्याचे डोळे लुकलुकले आणि मी हातातला पेला तसाच खाली टाकून घरात घुसलो. दार लावल..ती आकृती म्हणजे एक वाघ होता.. (आता कळली असेल माझी अवस्था…) मी घरात सगळ्याना सावध करणार तर बघतो घरात कोणीच नाही..मी सगळ्या रूम्स बघितल्या….माझी हवा अजुन टाइट..मी सगळी दार बंद आहेत की नाही बघून एका रूम मध्ये लाकडाची मजबून फळी घेऊन पलंगाखाली लपलो. घामघूम झालो होतो..खूप वेळ झाला होता काही हालचाल नाही म्हटल चला संकट टळल, पण तरी मी तिथेच दबा धरून बसायच ठरवला काही वेळ..घड्याळ बघायला मी हळूच मान बाहेर काढली, जसा मी बाहेर डोकावलो तसाच तो वाघ त्या पलंगावर बसून माझ्याकडे डोकावत होता..बोंब 🙂 इथेच हे स्वप्न तुटल.. त्याचे ते चमकणारे दात माझ्या आजही लक्षात आहेत. मला हे स्वप्न तीनवेळा पडला मोजून…मग काही दिवसानी आप्पाजी आणि आजी मामाकडे निघून गेले असा कळल आणि तिथेच त्यांच देहावसन झाल…आणि ते घर कायमच बंद झाल आमच्या सगळ्यांसाठी कारण तिथे कोणीच राहणार नव्हत..माझ्या स्वप्नातील ती शेवटची भेट होती त्या घराला 😦 😦

मग का कोण जाणे मला खूप मरणाची स्वप्न पडू लागली ती पण माझ्याच..कधी शिर्डीला रस्त्यात आक्सिडेंटमध्ये, कधी पाण्यात बुडून, कधी नको बस झाला ते प्रकार..पण त्या शिर्डीच्या स्वप्नाचा अनुभव मला आला मागल्यावर्षी १८ नवेंबरला, मागल्यावर्षी शिर्डी वारी एकदाच झाली म्हणून वर्ष अखेरीस बाबांच दर्शन घेऊ म्हणून मी आणि माझा मित्र नितीन त्याची इडिका घेऊन एका ओळखीच्या ड्राइवरला घेऊन दर्शन करायला निघालो….रस्त्यात तीनदा टायर पंक्चर झाले, म्हटला काय पनवती आहे म्हणून (माझ्या मनात थोडी धाकधुक होतीच) शिर्डीला पोचलो दर्शन मस्त झाला. पण परत येताना नाशिक हाइवेला स्पीड मध्ये असतानाच गाडीचा टायर फुटला आणि आमची गाडी डिवाइडरला जाउन आपटली..आमच नशीब मागून गाडी नव्हती येत आणि आम्हाला कोणाला काही लागला नाही जास्त, मग तिथल्या एका गावकर्‍याने सांगितल, तुम्ही भुताच्यावाडीतून जात होता तुमच नशीब म्हणून तुम्ही वाचलात नाही तर… त्याने आम्हाला हातानेच खांद्यावरच्या तिरडीचा इशारा करून दाखवला..त्याला म्हटल जा बाबा तू, आम्ही ठीक आहोत..मनातच त्या साईचे आभार मानले आणि घरी परतलो…आणि नित्यनेमाने त्या वाटेवरून त्या शिर्डी दरबाराला भेट देऊ लागलो…त्या दिवसानंतर पडलेली मरणाची स्वप्न हसून उडवून लावली…

आपल मन खूप घाबरट असत..आपल्या मनातील भय, किवा अश्या गोष्टी ज्या आपल्याला घडाव्याश्या वाटतात प्रत्यक्षात त्याच दाखवत..मग त्यात काही वेगळे विषय, मुद्दे आणि प्राणी 🙂 घुसत जातात…आशा आहे तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचत असाल..हो ना? की पकलात? जरी असाल तरी सांगा मला प्रतिक्रियेमधून…आणि हो प्रतिक्रिया देताना तुमच एखाद स्वप्न सांगा ना मला….प्लीज़ बघा जमत असेल तर लिहा…चला आता मी आटोपत घेतो..

अच्छा..

– सुझे

23 thoughts on “स्वप्नात रंगलो मी..

 1. Pingback: Tweets that mention स्वप्नात रंगलो मी.. « मन उधाण वार्‍याचे… -- Topsy.com

 2. सहीच !! वाघाचं स्वप्न वाचून तर मीही घाबरलो क्षणभर. 🙂 आणि मरणाच्या स्वप्नांनी घाबरण्याची गरज नाही. मी असं ऐकलंय की मरणाची स्वप्नं पडली तर आयुष्य वाढतं उलट 🙂

  मला दोनच स्वप्न पडतात नेहमी.

  १. भरपूर वेगवेगळे नाग, साप असे काय काय दिसतात. बास पुढे काही नाही.
  २. मी रस्त्यावर पडलेलं नाणं उचलतो, तेवढ्यात दुसरं नाणं दिसतं म्हणून ते ही उचलतो… असं होता होता भरपूर नाणी दिसायला लागतात एकेक करत .. आणि मी एके करत ती उचलत जातो. (तात्पर्य : आमच्या नशिबी फक्त चिल्लरच आहे 😉 )

  1. नाव नको रे काढू त्या वाघाच..अजूनही त्याचा तो चेहरा आठवतो..:D
   बाकी तुझ स्वप्न म्हणशील तर साप का बर? आणि दुसर स्वप्न सांगत तुझ्या वाटेत पैसा येत राहील रे..चिल्लर एक निंमित सांगायाच ते 🙂

  2. @ हेरंब
   दुसर्‍या स्वप्नाचं तात्पर्य: तुझ्या नशीबात अमाप पैसा येणार आहे. तेव्हा आजपासून तू माझा बेस्ट फ्रेंड… 😀

   @ सुहास,
   वाघाचं स्वप्न मस्त होतं… 🙂

   1. हेरंब बघ तुझ्या नशीबात अमाप पैसा येणार आहे आणि तू म्हणतोस फक्त चिल्लर 🙂

    संकेत, वाघाच्या स्वप्नाची आठवण नको रे बाबा..भीती वाटते 😉

 3. मला स्वप्नात नाही तर प्रत्यक्षात दिसला होता बिबट्या. एक पोस्ट मराठीत त्यावर लिहेन.
  पण स्वप्नांचं म्हणशील तर रोज कीमान २-३ स्वप्नांची मालीकाच असते. तू म्हणालास तसं बर्‍याच वेळी मलाही असं जाणवतं की एखदा प्रसंग घडताना त्याआधी मी तो कधीतरी स्वप्नात पाहीला आहे म्हणून.

 4. मला स्वप्न पडतात पण लक्षात राहत नाहीत.. लहानपणी मात्र दोन स्वप्न खुप पडायची
  एक, मला घरातल्या ट्युब लाईट्स, बल्ब्स, अतिशय अवाढव्य दिसायच्या आणि त्या माझ्यावर चाल करुन यायच्या, मी, अर्थात फक्त घाबरुन पळायचो… 😉

  दुसरं खुप वारंवार पडलंय, त्यात एका अतिशय उंचावर असणार्‍या टेकडीवरच्या मंदीरावरुन मला कोणीतरी खाली फेकुन दिले आहे.. मग काय जिवाच्या आकांताने किंकाळ्या फोडत मी हातवारे करत उठायचो…

  तुझं वाघोबाचं स्वप्न मस्तच आहे… राम गोपाल वर्माला फुंक ३ साठी द्यावं.. थोडातरी सिनेमा पाहण्यालायक होईल 😉

  1. अवाढव्य ट्युब लाईट्स, बल्ब्स सही है 🙂

   रामूला माझ स्वप्न..नको रे बाबा त्याने फुंक २ काढला ह्याच धक्क्यातून मी सावरत नाही अजुन तू कुठे त्याला फुंक ३ ची आइडिया देतोस 😀

 5. सचिन

  मला पण बरीशची विचित्र स्वप्न पडतात.
  १. तू म्हणतोयस तस बर्‍याच वेळी मलाही असं जाणवतं की एखदा प्रसंग घडताना त्याआधी मी तो कधीतरी स्वप्नात
  पाहीला आहे म्हणून

  २. स्वप्नात कोणी पाठलाग करत असेल ना तर आपण कितीही जोरात धावायचा प्रयन्त केला तरी जोरात धावता येत नाही. आपण जागच्या जागीच असतो.

  ३. काल तर स्वप्नात पूर्ण बझ्झ आला होता बराच मोठा होता बहुतेक आपल् हे स्वप्न पूर्ण होणार वाटतय.

  बाकी तुझ्या वाघाच्या स्व्प्नाबाबत आनंदशी सहमत.

  1. अरे वा..होईल बझ्झच स्वप्न नक्की पूर्ण होईल..आणि कोण पाठलाग करत होत तुझा???

 6. sahajach

  विषय चांगला आहे रे…पण माझी स्वप्न ही ईतकी भन्नाट असतात ना की लोकांना वाटेल ही चक्रम बाई आहे 🙂

  याबाबत हेरंबने लिहीलेली दोन्ही स्वप्न मलापण कॉमन (आमच्या नशिबी पण चिल्लर 😦 ), आणि त्यात भर म्हणजे मला ना आमच्या घरात दरोडेखोर/ चोर आलेत आणि मी धाडकाने त्यांना पकडते असे स्वप्न नेहेमी पडते….. 🙂

 7. मस्त आहेत स्वप्न आणि अर्थातच पोस्ट. हा विषयही सहीच. कधी, अकिरा कुरोसावाचा “ड्रीम्स” हा सिनेमा मिळाला तर जरूर पाहा. स्वप्नांना अर्थ कसे असतात आणि ते पडद्यावर कसे आणतात ह्याचं उत्तम उदाहरण आहे ते.

 8. आनंद, तुझं दुसरं स्वप्न आहे ते ब-यापैकी कॉमन आहे. माझ्या अनेक मित्रांना ते पडल्याचं मी ऐकलं आहे. त्या स्वप्नामागे एक शास्त्रीय कारण आहे असं मी ऐकलं आहे. खरंखोटं माहित नाही. ते असं.

  ते स्वप्न खूप दमलो असल्यावर अगदी अगदी गाढ झोपेत शक्यतो पडतं. आपण गाढ झोपेत असताना आपला अगदी एका लयीत संथपणे श्वासोच्छ्वास चालू असतो. कधी कधी तो एवढा संथ होतो की एखादा क्षण (may be millisecond) श्वास थांबल्यासारखा होतो. आणि तेव्हा स्वप्नात आपण खूप वरून पडतो आहोत असं दिसतं. कारण प्रत्यक्षात आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो.

  पुन्हा सांगतो, खरंखोटं मला नक्की माहित नाही/नीट आठवत नाही. माझ्या एका मित्राला माहित आहे. त्याला मेलून बघतो आज 🙂 आणि उत्तर मिळालं तर पुन्हा कमेंटतो 🙂

 9. सागर

  मस्त विषय आहे हा….मला स्वप्न पडतात पण लक्शात नाही राहात…लहानपणी पड्नार स्वप्न होत एक…त्यात दोन भीन्ती मधे मी गाड्ल्या जायचो….असो…छान झाली आहे पोस्ट….

 10. थॅंक्स सागर, असच सुचला आणि खरडल…
  दोन भीन्ती मधे मी गाड्ल्या जायचो…म्हणजे तू नक्कीच अनारकली होतास वाटत ..हा हा

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.