आपली न्याय “व्यवस्था”


आताच दिवाबत्ती करून, टीवीवर न्यूज़ हेडलाइन्स बघितल्या..एवढे महिने ज्याच्या बद्दल कोणी चकार शब्द न काढणारे मीडीया हेडलाइन्स याच्या नावाने भरभरून बातम्या देत आहेत..काय म्हणता? कोणाबद्दल बोलतोय मी..आठवा की २६/११. आठवलं नं? अजमल कसाब? मागे लिहलं होत ह्यावर, लिहावसं वाटत पण नाही..पण 😦 कसाब आहे अजुन तो भारताच्या आदरातिथ्याचा उपभोग घेत..मस्त बिर्यानी ओपत..मराठी शिकत..न्यायालयात नाटक करत हा भडवा अजुन जिवंत आहे (सॉरी, जर ह्याला शिवी नाही देता आली तर मी याचा उल्लेख ग्रेट कसाब करेन पण ते चालेल का तुम्हाला?…खरच ग्रेट माणूस आहे हा, एवढा क्रूर कृत्य करून हा जिवंत आहे वर ग्रेट टूअर ऑफ इंडिया करतोय ते पण आपल्याच पैशाने..मग तो ग्रेट नाही का?)

दीड वर्ष झालं, उद्या (३ मे) म्हणे ह्याला शिक्षा सुनावणार आहे…दीड वर्ष ह्या केसचा निकाल द्यायला, ते पण असा फास्ट ट्रॅक कोर्ट जे फक्त त्या २६/११ च्या खटल्यासाठी नेमलेलं…तरी दीड वर्ष..५० हजाराच आरोपपत्र..एक सरकारी वकील आणि २-३-४ त्याचे वकील… मग निकाल लागेपर्यंत, याला स्पेशल सेल मध्ये ठेवलं, रोज खाऊ, पियू घातलं, आठवड्यातून मेडिकल टेस्ट, पोलीस बंदोबस्त, सगळे पुरावे परत परत सदर करणे कोर्टात, त्या दहशतवादीचे मुडदे जपून ठेवणे, वकिलांची सुरक्षा, ह्यूमन राइट्सची धडपड, आणि मीडीयाचा एअर टीरपी. हे भारताच्या न्याय व्यवस्थेचे काढलेले धिंडवडे आहेत जगभर हे कस नाही कळत ह्याना? कसली छाती ठोकून सांगता आम्ही दोषीवर कारवाई केली अरे थूssss  तुमच्या या कारवाईवर..

शहिद झालेल्या लोकांची किती हाय लागेल ह्या न्यायदेवतेला आणि ह्या शंढ सरकारला ते माहीत नाही ह्याना. मला खात्री आहे उद्या त्याला फाशी होईल..होईल ना? की जन्मठेप? की परत अपील करणार हा? [ही कसली खात्री :(]

पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला माहीत आहे ना ह्याला जिवंत पकडून काही माहिती मिळाली नाही..द्यायचा की उडवून का जिवंत पकडून आपली नाचक्की करून घेतलीत? त्या २६/११ ते २८/११ पर्यंत मुंबईला ह्यानी हाइजॅक केल होत..विसरलात? प्रत्येक मुंबईवासी त्या दडपणाखाली, भीतीखाली होता माहीत आहे ना? उद्या जरी त्याला फाशी झाली तरी तो अल्लाचे आभारच मानेल, दीड वर्ष जिवंत राहिला ते पण राजा सारखा…

खरच हा कसाब जगाला आणि आपण??…काळजी नसावी कधीतरी मरु की आपण एखाद्या हल्ल्यात..व्हा तयार. मी रोजच असतो, तुम्हीपण व्हा….

12 thoughts on “आपली न्याय “व्यवस्था”

  1. sachin

    सुहास खर तर सरकार त्याला कधीही मारू शकताय.पण अस करण बरोबर ठरणार नाही. कारण २६/११ बद्दल चा तोच एकमेव जिवंत पुरावा आहे ज्यामुळे आपण जगापुढे सिद्ध करू शकतो कि पाकिस्तानी काय आहेत म्हणून. आणि बाकी त्याच्याकडून सरकार ला त्याचे लागेबांधे समजलेच असतील.

    बाकी आज उद्या त्याला सरकार कठोर शिक्षा हि देणारच.

    1. कसला पुरावा सचिन? पाकिस्तान ने तर कधीच नाकारला त्याला, मग हलू हलू कौकाशी करू सांगितला..काय झाला? आपण त्याना काही विचारला की ते सांगतात पुरावे अपुरे आहेत आम्हाला चौकशी करू द्यात आणि आपण ती मान्य करूच शकत नाही..सो फाइनली जे आहे तसाच राहत..

  2. मनोहर

    टीआरपी वाढविण्यासाठी गुन्हेगाराना संरक्षण देणार्या मिडियावर विश्र्वास ठेवणे बरोबर नाही.

  3. त्याला फाशीची शिक्षा होणार रे पण त्याचा अर्थ की तो आयुष्यभर असाच ऐशोआरामात जगणार आणि नैसर्गिक मृत्यू येऊन मरणार. आपण आहोतच त्याला पोसायला, टॅक्स कशाला भरतो आपण?

  4. आपले गृहमंत्री मागे एकदा म्हणाले होते…”I am Proud that even Kasab is getting a Fair Trial”…त्यानंतर मी बोलणं बंद केलं…

    1. छान, आपलेच गृहमंत्री..ऐसे बडे देश मैं छोटी छोटी बाते होती रेहती है…लाजा नाहीत ह्याना 😦

  5. त्याला फाशीची शिक्षा होणार हे नक्की आणि त्याला नैसर्गिक मृत्यू येऊन तो म्हणणार हे त्याहूनही नक्की. गुरूला पण फाशीची शिक्षाच झाली आहे. पण final outcome काय?? तो मजेत आहे.. तसंच कसाबचं पण होणार.

    @विद्याधर, अगदी सहमत. माझ्या ‘चीदुभाउ आणि नन्ना’ च्या पोस्ट मध्ये गृहमंत्र्यांच्या त्या वाक्याच्या बातमीची लिंक पण आहे.

    1. बघ ना, मग काय फायदा ह्या सो कॉल्ड “फेअर ट्रायल”चा? सोडा त्याला मोकळा..पाठवणी करून द्या बोटीतूनच 😦 😦

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.