ह्या उन्हाळ्यात ऑफीसला जायचे वांधे होते तर मग बाहेर भ्रमंती तर विसरून जाच…पण आता किती बर वाटतय सांगू..पाउस येईल आता १० दिवसात. ईमेल्स धाडण चालू झाले, हे असा असा शेड्यूल आहे आताच सुट्टी टाकून ठेव नाही आलास तर बघ ह्या वेळी अश्या धमक्याही मिळायला सुरूवात झालीय..रस्ते शोधून ठेव, मॅपचे प्रिंट आउट काढून ठेव, ट्रेन एसटी चा वेळापत्रक बुकमार्क करून घे, नवीन सॅक, पाण्याची बाटली आणि थोडा ऑनलाइन रिसर्च…काय म्हणताय हे सगळ कशासाठी? अहो सगळीकडून ट्रेकचे वारे परत वाहायला सुरूवात झाली 🙂 सगळी मंडळी परत शिवाजीमहाराजांच्या ओढीने त्या काळातील सुदंर, प्रचंड गड, दुर्ग बघायला सरसावतील. सह्याद्रीच्या खडतर वाटा तुडवित, निसर्ग सौंदर्य न्याहळात, तो इतिहास आठवत, त्या इतिहासात रमायला काही क्षण घालवायला भेटी देतील..
मी तसा एकदम रेग्युलर ट्रेकर नाही, पण जेव्हा जेव्हा जायची संधी मिळते तेव्हा तेव्हा जमवायचा प्रयत्न तरी नक्कीच करतो..आता माझ्याह्या ट्रेक छंदाला दोन प्राणी कारणीभूत अनिश आणि प्रसन्न 🙂 इतिहासाचा भरपूर अभ्यास केलेले हे दोघे. ट्रेक म्हटला की तयार. मी जेवढे ट्रेक केले असतील त्यात हे दोघे होतेच (रायगड, पन्हाळा, पेठचा किल्ला, पेब फोर्ट, सारसगड, विसापूर, लोहगड, ढाक-बहिरी..) आजच खूप दिवसांनी आम्ही भेटलो. २००९ मध्ये कुठे जास्त जाताच आला नाही. मागच्यावर्षी ह्याच वेळी माझ्या जॉबचा प्रॉब्लेम होता, अनिश बंगलोरला गेला होता नोकरी निम्मित्त आणि प्रसन्नच्या वडिलांच्या प्रकृती थोडी बरी नव्हती. तेव्हापासून आजपर्यंत कुठे जाण्याचा योग आलाच नाही.. ह्या १०-१५ दिवसात प्रसन्न आणि मी ठरवल्याप्रमाणे एक पाउस पडला रे पडला की एक किल्ला गाठायचा बस्स्स हे एकच धेय्य मनात ठेवून आहोत. आताच रोहनची पोस्टसुद्धा वाचली बलॉगर्स ट्रेकिंगबद्दल त्यासाठी मी तर एका पायावर तयार आहे. मागेच देवेन आणि माझा प्लानपण ठरला होता एक ट्रेक पावसात आणि त्या प्लानला बझ्झ बझ्झपुरीतले बहुतांश मंडळी तयार सुद्धा झाली आहेत…मज्जा
कस बर वाटताय सांगू, ह्या मुंबईच्या धकाधकीच्या, प्रोफेशनल लाइफ, फ्रस्ट्रेशन पासून दूर..इतिहासाच्या सानिध्यात, तो इतिहास जगत, घामाच्या आणि पावसाच्या पाण्याने भिजलेल्या अवस्थेत त्याकाळी ही जागा कशी असेल ह्याचा विचार आणि आकलन करत, ज्यानी हे किल्ले बांधले त्याना सल्यूट करत एक एक भाग बघून पिंजून काढायचा आहे. हे किल्ले म्हणजे उभे साक्षीदार आहेत त्या अभेध्य, असामान्य, अतुलनीय, पराक्रमी कल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे. थोडक्यात सांगायचे हे एक एक गड तर माझी तीर्थक्षेत्रच, आता जसा वेळ मिळेल तसा पावसाची, उन्हाची तमा न बाळगता त्या सह्याद्रीच्या डोंगर कपारीमध्ये हा सुहास मुक्तपणे विहार करणार आहे पुढचे काही महिने आणि आता आपला ब्लॉग आहेच (जे खरडतो ते नियमीत वाचणारे पण आहेत :D) तो अनुभव तुमच्या समोर नक्की मांडेन..मी वेडा आहे किल्ले भ्रमंतीचा आणि तुम्हाला ते पटेल पण 🙂
||जय शिवाजी||
—————————————-
—————-
—