“कुंडलीका” वर दे..


सकाळी सकाळी कितीही कामाची गडबड असो पण आमच्या घरी सकाळी ८ ला टीवी हा लागतोच. आधी ई टीवी मराठी आणि मग झी मराठी. काय स्पेशल असता ह्या वेळी सकाळी? आठवा बर तुम्ही? नाही आठवत? मीच सांगतो आपल सगळ्यांच भविष्य कथन. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? तुमच्या आयुष्यात काय नवीन बदल घडेल? तुम्हाला कुठला रंग लकी आहे? तुमच्या घरच वातावरण कसा राहील? ऑफीसमध्ये बढती होईल की नाही? परदेशगमनाची संधी कधी मिळेल? सगळ्यात महत्वाच लग्नाचा योग कधी आहे? अश्या निरनिराळ्या प्रश्नांची उत्तर ह्या कार्यक्रमात दिली जातात.

खूप हसायला येत मला जेव्हा कोणी अनोळखी माणूस आपल भविष्य आपल्या जन्म कुंडलीवरुन आपल्याला सांगतो. (आता प्लीज़ म्हणू नका उद्धट आहे मेला, काय बोलायच कळत नाही मला). मी नाही आवडला की नाही आवडला सांगणारा आहे. जर असे लोक उद्धट तर मी उद्धट लोकांचा राजा ठरायला हरकत नाही…:) असो, तर मी कुठे होतो हा, भविष्य, जन्म कुंडली. माझ्या मातोश्रींच्या तोंडून भरपूर वेळा ऐकल पिताश्रींना सांगताना हे कार्यक्रम बघताना पाठवून द्या बर याची पण पत्रिका इथे, कळेल तरी काय आहे कार्टयाच्या नशिबात 🙂 मी आपला उद्धटासारखा सांगून मोकळा काही गरज नाही, जो भविष्य सांगतोय त्याचच भविष्य या कार्यक्रमामुळे आहे. त्याला त्याच काम करू देत आणि मला माझ..मग परत सगळ सुरू आईच बघितला किती शेफारला आहे हा, अश्याने याच लग्न होईल का? काय आहे त्या नोकरीत असे नेहमीचे प्रश्‍न माझ्यावर बाबांच्या आडून फेकले जातात..मग मी आपला काणाडोळा करून आपल्या कामात रमून जातो.

माझ्या फ्रेंड सर्कल मधील काही मुलींची लग्न सराई सुरू आहे सध्या जोरात ह्या वर्षी उरकून टाकायच ह्या ध्यासापोटी त्यांची नाव वेगवेगळ्या मंडळात, मॅरेज पोर्टलवर नोंदवली गेली आहेत. आम्ही गप्पा मारताना मध्येच त्या मंडळाच्या काकूचा फोन, मग मुलाचा प्रोफाइल आइडी घ्या, ऑनलाइन जाउन त्याची प्रोफाइल बघा, कोणी आपल्या प्रोफाइलला शॉर्टलिस्ट केलाय ते बघा असा रोज चालू झाला ह्यांच. आयला रोज गूगल टॉक बरोबर हे ऑनलाइन पोर्टल्स लॉगिन व्हायला लागल्या सगळ्याजणी..हे हे हे. त्या मग त्यांच्याच तोंडून पण मला मंगळ, राहू, देव गण, राक्षस गण असे शब्द कळू लागले. “माझे त्या मुलाशी ना फक्त २५च गुण जुळले, नाही तर मला आणि घरच्याना मुलगा आवडला होता” – इति माझी मैत्रीण. अरे मग सांगायाच ना हो असा मी म्हटला की तुला नाही कळत त्यातला असा बोलून माझाच पोपट करून गेली ती. मनात म्हटला असेलही मला नसेल काही कळत…

कदाचित कुठल्या तरी गुरुजीच्या सांगण्यावरुन माझ्या एक मैत्रिणिने लवकर लग्न व्हाव म्हणून केलेले सात मंगळावर उपवास आणि दर मंगळवारी दत्ताच्या देवळात जाउन नारळ देण हे राहू शान्तिचा उपाय बरोबर असेल किवा घरच्याना बर वाटाव म्हणून केलेला व्रत बरोबर असेल. पण तेच व्रत संपल्यावर त्याच मुलीला मंगळ सौम्य आहे आणि विवाह योग उशिरा आहे आणि संतान सुखं नाही असे सांगणारे तेच गुरुजी बरोबर असतील????…तिला ह्याबद्दल मी विचारल्यावर ती सांगते माझा विश्वास नाही रे पण घरचे म्हणतात तर करते…. म्हटला ठीक आहे,ह्यावर मी काहीच न बोलणे बर….पण आता एवढे उपाय केल्यावर त्या फ्रेंडच्या लग्नाला होणारा विलंब तिला ह्या कुंडली शास्त्रावर विश्वास ठेवायला भाग पाडत हे बघून मला फार वाईट वाटल….

माझा एका गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे (तुम्ही सहमत असाल की नाही माहीत नाही तरी) की माणूस कोणाच भविष्य सांगू शकत नाही, एकवेळ तो भूतकाळ सांगू शकेल एकदम व्यवस्थित जर त्याची निरीक्षण शक्ति चांगली असेल तर…भविष्य नाही. पण आपली भविष्य जाणून घेण्याची धडपड काही संपत नाही. म्हणूनच वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भविष्यावर लिहून येतात, सामाजिक टीवी चॅनेल, न्यूज़ चॅनेल्स वर प्राइम स्लॉट दिला जातो भविष्य कथन करणार्‍या लोकांसाठी…बघा आनंद घ्या त्याचा..जमल्यास ते काय सांगतात तस करून तुमच ऑफीस प्रमोशन होत असेल, घरचे वाद मीटत असतील, भरपूर पैसा मिळणार असेल तर तुम्ही ते करू शकता..पण मी नाही. जे काही घडतय किवा घडेल ते आपल्याच कृतीमुळे, निर्णयामुळे होताय वर फिरणार्‍या ग्रह-तार्‍यामुळे नाही ह्या मताचा मी आहे आणि राहीन…

असो तुम्हा सगळ्यांच्या भविष्यासाठी माझ्या शुभ कामना 🙂

तुम्ही जर वर्तमान नीट सांभाळलात तर भविष्य नक्कीच सुंदर असेल यात शंका नाही – इति सुहास 🙂

30 thoughts on ““कुंडलीका” वर दे..

 1. माझाही हया गोष्टींवर विश्वास नाही…आमच्या घरच्यांचा मात्र आहे…लगे रहो मुन्नाभाई मध्ये हया भविष्य सांगणार्यांची मस्त जिरवली आहे…पोस्टच्या शेवटची ओळ भारीच….

 2. माझी प्रतिक्रिया वाचून तू आणि सगळेच कदाचित हसाल. but cant help. माझाही भविष्यावर पूर्णतः विश्वास असा नाही. पण मी त्याचं अस्तित्वच नाकारू शकेन का हे मला सांगता नाही येणार. म्हणजे भुतासारखं (घोस्ट) .. हे काही प्रकार असे आहेत की मला तरी वाटतं याबाबत अजूनही मानवाला संपूर्ण ज्ञान नाही. असंख्य रहस्ये कुठेतरी दडलेली आहेत. पण आपण त्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण आपल्याला माहित नाहीत, शोधता येत नाहीत, किंवा त्याच्या तळाशी आपण पोचू शकत नाहीत म्हणून त्यांचं अस्तित्व तर नाकारू शकत नाही. मला इथे भविष्य या प्रकाराला पाठीबा वगैरे द्यायचा नाहीये. फक्त एकूणातच अशा असंख्य गोष्टी, न उलगडलेली कोडी, संभ्रमात पाडणार्‍या घटना आहेत की ज्याच्या खरे-खोटेपणाबद्दल आपण अजून तरी छातीठोकपणे आपल्याला सांगता येणार नाही. अर्थात या सगळ्या प्रकारांचं अंधश्रद्धेत रुपांतर होणं हा भयानक प्रकार आहे.

  असो. तुझी पोस्ट काय मी लिहितोय काय. कमेंट टाकू की नको असाही विचार आला एकदा. पण तरीही टाकली. 🙂

  1. हो मान्य हेरंब..हे मानण्यावर आहे हे नक्कीच. भूतखेत कोणी बघितली आहेत पण मानतात ना? हे पण तसच काहीसा रे.

 3. बरेचदा अचानक अडचणीच अडचणी येऊ लागल्या किंवा एकही काम मनासारखे होईनासे झाले की माणसाचे मन अशा गोष्टींचा आधार शोधू लागते. अरे तुला ही अमुक अमुक महादशा सुरू आहे… शनी वक्री आलाय, राहू केतू अष्टम स्थानात बसलेत वगैरे ऐकवून मग एकदा का ही अमावस्या गेली नं की बघ कसे मार्ग पटपट निघतील…… हे असे सगळे बोल ऐकले की माणूस आपोआप त्या वेळेपर्यंत धीर धरतो…. बरेचदा तोवर काहीतरी मार्ग आपोआपच दृष्टीपथात येतोही…… पूर्वी आणि आजही असतील… अगदी अचूक भविष्य सांगणारे पाहिले आहेत. तंतोतंत तेच घडते… मग खरेच गोंधळात पडायला होते…. ब~याच गोष्टी आपल्याच हातात असतात…… गंमत म्हणून वाचणे-ऐकणे ठीक आहे पण अंधश्रध्दा मात्र आणखीच त्रास देऊ शकेल…. नेमका याचाच तर हे कुडमुडे भविष्यकथन करणारे लाभ उठवतात नं… पोस्ट झकास. अनेक शुभेच्छा!:)

  1. हो हे खर, आपल मन कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आधार शोधातच असत…भविष्याच म्हणशील तर असतील तंतोतंत भविष्य सांगणारे, पण कदाचित धंदा म्हणून भविष्य सांगणारे लोक ह्या कलेला काळ फासत आहेत एवढा मात्र नक्की..

 4. सोनाली

  सोनाली
  माझही हेरंबला अनुमोदन.
  काही काही गोष्टी आपल्या आकलन शक्तीच्या पलिकडच्या असतात. पण कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाण केव्हाही वाईट. प्रमाणात मदत घ्यायला हरकत नाही. असं माझ मत आहे.

 5. सुहास,
  माझा या गोष्टीवर भरवसा नाही.. पण जसं वय वाढत जाते, स्वतः वरचा आत्मविश्वास कमी व्हायला होतो, त्यावेळेस देव, बुवा, भविष्य अश्या गोष्टींचा आधार घेतला जातो हे सुद्धा नक्की.

  मला एकच गोष्ट पटत नाही त्या चॅनल्स वर भविष्य कथनात फक्त १२ राशींचे भविष्य सांगितले जातात… भारताची लोकसंख्या जर १२० पकडली तर १० लोकांचे भविष्य सारखेच असते ?

  1. हे हे…आता ते भविष्य सांगणार्‍यालाच माहीत…आणि आधराच म्हणाल तर आधार घ्या माझा काही म्हणन नाही पण त्याच्या आहारी जाउ नका बस

 6. sahajach

  माझे हेरंब आणि श्रीताई दोघांनाही अनुमोदन….. पुर्ण सहमत आहे मी त्यांच्याशी!!!

  बाकि मी पुर्वी वाचायचे भविष्य़, हल्ली त्यात तोच तो पणा वाटतो आणि मुळात बराचसा भाग समजतच नाही 😦

  आणि हो आमचेही लग्न पत्रिका न पहाताच झालेय बरं…. आमच्या लग्नानंतर दोन वर्षानी आमच्या पत्रिका कोणितरी जुळवून पाहिल्या 😀 … जुळताहेत म्हणे…खूप हसलो होतो आम्ही तेव्हा….

  1. ते तर आहेच गा..अश्या गोष्टीतून एक आधार मिळतो मनाला..पण तो आधार एवढा घेऊ नये की तो कुबड्या होऊन जाईल..

 7. anish

  मी खूप आधीच सांगितलं होतं की आपण देवळात जायला पाहिजे. तिथे probability जास्त असते. पण मी ज्योतिषी नाही त्यामुळे माझा कोणी ऐकत नाही. 😉
  >”माणूस कोणाच भविष्य सांगू शकत नाही”
  मी सहमत नाही. कितीतरी plan केलेले ट्रेक होणार नाहीत हे मला आधीच माहित असतं. कितीतरी ‘हो नक्की येणार’ सांगणारे येणार नाहीत हे मला आधीच माहित असतं. आणि त्यासाठी मला ग्रह – तार्यांची मदतही लागत नाही. 😀

  1. हा हा हा, अनिश 😀
   आता आपला ग्रूपच असा होता की निदान ट्रेक्सचा भविष्य सांगू शकायचो..तूच काय मी पण. आणि मंदिरात जायला हव काय? गुड वेरी गुड 🙂

 8. सागर

  मी हेरम्बशी सहमत….काही गोश्टी आपल्या आकालनपलिकडे आहेत

  1. हो समजू शकतो पण त्या गोष्टी स्व:तावर लादून घेऊ नका की तुम्ही काही झाला की त्याचाच आसरा शोधाल…

 9. hi suhas,
  Barobar bolalas. Je graha-tare swataha sthir nahit ti aaplya mansanchya pujapathane sthir houn aaplya jivnat sthirata kashi aananar?

 10. vinod

  hmm khup chhan lihale ahes…pratekala veg vegle anubhav yet astat tyamule hey sare samjun ghyayla vaitag yeto manus firstted houn jato…

  1. ब्लॉगवर स्वागत विनोद..
   हो, एकदम बरोबर बोललात. तुमची इच्छा तुम्ही काय मानता ते पण ते मत दुसर्‍यावर लादण चुकीच आहे या मताचा मी आहे..

 11. माझा भविष्यावर पूर्ण विश्वास आहे…काही गोष्टी आपल्या नशिबात लिहिलेल्या असतात त्या मिळतातच…किंवा काही ज्या नसतात त्या कधीच मिळत नाही…
  भविष्य कथन हे दिशादर्शक आहे…आपण त्याप्रमाणे आपल्या योजना आखल्यातर जास्त फायदा होतो…आणि मला स्वत: ला हा विषय फार आवडतो. हे शास्त्र अवघड आहे आणि सामान्यांच्या आकलनापलीकडे आहे म्हणून लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत.
  आणि टी. व्ही. वर चालतो तो मात्र तमाशा आहे -खास करून हिंदी न्युज चॅनेलवर…

  1. असेल कदाचित, पण मी पण अनुभवावरुनच संगितल आहे..असो.
   टीवीच्या तमाशाबद्दल न बोललेलच बर त्याना बातम्यापेक्षा हे कार्यक्रम जास्त महत्वाचे असतात

 12. poonam palande

  poonam,

  mi hya gostivar kiti vishvas theu ki nako mala samjat nahi,maja tar kup motha problem ahe maji lagan pratika julat nahi aahe , tari sudhha mi lagan kel, lagan kelavar doghanpaiki ekacha mrutu hoil aase sagital aahe, kitpat vishwas thevayache he kahi kalat nahi

  1. पुनमजी,

   शेवटी हा प्रत्येकाचा प्रश्न असतो. ज्याचा त्याने ठरवायचं. आपण इतरांच्या मतांचा अनादर करू शकत नाही, पण ते आंधळेपणाने मानू पण शकत नाही 🙂 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.