एम३ (मॅक्सस मॉल मुंबई) – आमच्या ऑफीस साईटच नाव. लोवर परेल नंतर आमच्या मॅनेजमेंटने डाइरेक्ट ठाण्याला ही जागा घेतली, खूप जण नाखुष होते ह्या निर्णयावर. मुंबईच्या मध्यवर्ती जागेत असलेला कमला मिल्सचा पॉश ऑफीस सोडून कुठे नेतायत आम्हाला खेडेगावात भायंदरला. तस तुम्ही लोवर परेल ऑफीस बघितला असेलच जब वी मेट, स्लमडॉग मिल्ल्लेनिएर मध्ये. सगळ्यानी नापसंती दर्शवली होती ह्या माइग्रेशनला. पण नाही नाही करता शेवटी झालच आणि कांदिवली ते दादर धावणारी पावले ठाण्याच्या दिशेने चालू लागली. सुरुवातीला त्रास झाला पण ते ऑफीसपण एकदम टकाटक डिज़ाइन केला होत. मॉलचे चार फ्लोर घेतले होते कंपनीने. खूप धम्माल करायचो फ्लोरवर. हेडफोन लाउन मस्त गाणी लावून दोन खुर्च्यांवर आडवा व्हायच, रिक्रियेशन रूम मध्ये जाउन खेळत बसायच, गोलाकार बसून गप्पा, अंताक्षरी, जोक्स, टीम मीटिंग सगळा सगळा खूप एन्जॉय केला होता कोणे एके काळी जेव्हा मी अडोबी मध्ये होतो. एम३ चा ४ था मजला अडोबी आणि माइक्रोसॉफ्टसाठी राखून ठेवलेला होता. त्याच एम३ ला आम्ही तब्बल एक वर्षाने भेट देणार होतो. साहजिकच आम्ही सगळे ह्या टेस्टिंगसाठी खूप उत्साही होतो. पण एक धास्ती पण होती मनात ह्या जागेची कारण अडोबी बंद होऊन इथूनच आम्हा सगळ्याना जायला सांगितला होत बाहेर. काहीना काढला, काहीना ट्रान्स्फर केला. जाउ देत नको तो विषय.
मी वेळे आधीच पोचलो होतो भायंदर स्टेशनला, मीरा रोडला पिक उप असतो पण मी तो घ्यायचा टाळला. थोड अस्वस्थ वाटत होत तिथे जातोय म्हणून नाही गेलो गाडीने. स्टेशनला शेअर रिक्षा मिळते, म्हटला तेच बर, म्हणून बसलो तर एक मुलगी, एक मुलगा पण येऊन बसले मॅक्सस म्हणून. म्हटला चला लगेच भरली रिक्षा लगेच जाता येईल. ती मुलगी मध्येच बसल्याने आम्ही दोघे जरा अवघडून बसलो होतो. त्या मुलीने तिचा मेकअप किट काढून टच द्यायला लागली तर तीच आइडी कार्ड पडला बाजूच्या मुलाने ते उचलून दिला, मग कळला ती आणि तो मुलगा दोघेही आमच्याच ऑफीसचे. काही बोललो नाही मी. पैसे देऊन उतरलो. मेन गेटला आलो माझी नजर माझ्या ओळखीचा कोणी चेहरा दिसतोय का तेच पाहत होती. तारिक दिसला, सिगरेट पीत होता. आम्ही गळाभेट घेतली, सलाम दुआ करून बिल्डिंगच्या लिफ्टच्या इथे आलो. एवढा अस्वस्थ मला कोणी बघितला असता तर माझी टेर खेचली असती…लिफ्ट मध्ये गेलो, माझा हात सारखा गालाला आणि नाकाकडे जात होता.
खूप कॉनशीयस् होत होतो मी. कारण नव्हता तस काही पण होत होत मला…कॅंटीनच्या मजल्यावर उतरलो आणि जुन्या नेहमीच्या जूसवाल्या भय्याने हात केला..तो म्हणाला “देखा सर आ गये ना? मैने कहा था आप वापस आओगे, मैं यही मिलुंगा” मी हसलो आणि बाद मैं आता हु म्हणून निघालो. फ्लोर वर गेलो. पूर्ण रिकामा. फक्त ५-६ डोकी होती २५० पीसी सेटअपच्या फ्लोर वर टेस्टिंगला. राजेंद्र फ्लोर वर पीसी सेटअप करत होता. त्याने तीन पीसी चालू करून दिले आम्हाला आणि सांगितला तुमच्या प्रोसेसचे सगळे टूल्स चेक करा. सगळे धावपळ करत होते. कारण रविवार पासून शिफ्टिंग चालू होणार होत आणि हे सगळा निर्विवादपणे पार पडायाच होत. कारण आमचा टेस्टिंग फाइनल अप्रूवल होत. आइटीसाठी. तीन तास काम केल्यावर वीपीएन कनेक्टिविटी टेस्ट करावी म्हणून आम्ही काम थांबवल.
हीच संधी साधून मी खाली उतरलो ७व्या मजल्यावरून चालत धावतच म्हणा ना…मग विक्टर भेटला, सचिन भेटला कॅंटीन मध्ये जाताना..खूप मस्त वाटला त्याना भेटून..मी ४थ्या मजल्यावर आलो. सेक्यूरिटी चेक करून आत गेलो. तोच आमचा प्रशस्त फ्लोर, पूर्ण भरलेला, सगळीकडे आवाज आवाज एक एका कॅबिन मधून मला हाय म्हणणारे हाथ, मी फ्लोर वर पोचाल्यावर एक एका बे मधून हाका, अबे तू आ गया..कीधर था इतने दिन…सगळा किती मस्त वाटत होत. माझे जुने फ्रेंड्स एचपी ह्या नवीन प्रोसेस मध्ये जॉइन झाले होते. मी एका व्यक्तीला खास शोधत होतो. कुठे आहे कुठे आहे म्हणत मी फ्लोरच्या टोकाच्या बे ला येऊन पोचलो आणि केतकी ओरडली अय्या तू आलास. केतकी ही माझी बेस्ट फ्रेंड, अडोबीमध्ये असताना आमची ओळख झाली. तिच्या लहान मुली पेक्षा हीच खूप हट्ट धरणारी 🙂 🙂 उद्या येताना मला चॉकलेट हवा तुझ्या कडून असा दम देणारी केतकी, सणासुदीला घरी बनवलेले पदार्थ आवर्जून आणून द्यायची, मला कंटाळा आला रे जरा गप्पा मार ना चॅट वर असा सांगणारी केतकी. जेव्हा आम्ही सोडून जात होत ते ऑफीस तेव्हा मला न भेटना हिने पसंत केला..का? कारण तिला रडू येईल म्हणून आणि कदाचित मला पण 😦 अशी ही केतकी, हिला भेटून मला खूप आनंद झाला, आम्हाला परत वर बोलावल्याने मला निघाव लागणार होत पण तिने विचारलच मला…माझ चॉकलेट कुठेय रे? हा हा हा…मी म्हटला नेक्स्ट ब्रेक घेतो आणि बघतो मिळत काय कॅंटीन मध्ये. मग ब्रेक मध्ये कॅंटीन मध्ये मस्त जूस घेऊन चॉकलेट घेतले एक नाही दोन. आता मी आणि इम्रान गप्प बसणार का? म्हटला चलो कुछ मीठा हो जाए 🙂 खूप ओळखीचे चेहरे दिसले कॅंटीनमध्ये..खूप प्रसन्न वाटत होत मला आता..संध्याकाळी जरा दबकून वागणारा सुहास आता शॉन शोभत होता…Thanks to all my Dearest Friends :-))
केतकीला चॉकलेट देऊन मी परत आमच्या फ्लोर वर आलो टेस्टिंग चालूच होत. आम्ही आलो ही खबर आता सगळी कडे पोचली होती….फोनाफोनी सुरू, एसएमस सुरू, वर मित्र भेटायला येऊन गेले..आता कसा मी एकदम रिलॅक्स झालो होतो, फ्लोर वरच वेफर्स, सॅंडविच, कोल्ड ड्रिंक, आइस्क्रीम (तुफान सर्दि असताना देखील) खाल्ल (काही रूल्स तोडण्यात पण मज्जा असते :))…खूब जमेगा रंग जब मिल बैठे सब यार वाला सीन झाला होता…आता मी स्वतालाच दोष देऊ लागलो का आपण घाबरत होतो, ही वास्तू तर लकी ठरली, माझे सगळे जुने मित्र, नाती परत दिली मला…आता मी खूप खूप खुश आहे 🙂
सुहास, छान लिहिले आहेस… जुने मित्र भेटल्यावरचा अनुभव अवर्णनीय….
हो रे..खूप मस्त वाटला. आजारपण पळून गेला एकदम 🙂
अरे मस्तच.. झाला न आता मूड फ्रेश एकदम? ये हुई ना बात !!
हो रे, झाला मूड एकदम मस्त 🙂
खूब जमेगा रंग जब मिल बैठे सब यार…..
मस्त रे एकगम सही….
धन्यवाद, सचिन.
असाच भेट देत राहा..
छान वाटतं रे असे जुने मित्र मैत्रीणी भेटल्यावर 🙂
खरयं आणि तुझं मरगळ पार दुर पळून जाते बघ मग!! मस्त लिहीलयेस!!
हो ग, काही लोक असतात जी आपला मूड एकदम फ्रेश करून टाकतात बघ…
आपली नेहेमीची जागा, ठिकाण बदलले की जाम अस्वस्थ वाटते. मी तर खुप इमोशनली अटॅच्ड असते सगळ्या गोष्टींशी अगदी पर्समधला कागदाचा कपटासुद्धा मला टाकावासा वाटत नाही 🙂
हो एकदम खरय..सोनाली 🙂
मला असे बरेच अनुभव आहेत:) सुरुवातीला वाईट वाटतं, मग सगळ काही – आल इज वेल….
हो काका, आल इज वेल :-))))
छानच आणि अगदि मनापासुन लिहल आहेस …जुने मित्र भेटल्याचा आनंदात आम्हाला सहभागी करुन आम्हालाही आनंदी केलस….
धन्यवाद, देवेन 🙂
आता पुढची पोस्ट तुम्ही सगळे भेटलात त्याच्या आनंदाची 🙂
जुने मित्र-सहकारी भेटले, मस्त आनंदी-फ्रेश झालास ….:) माझा जीवही फार गुंतलेला… माणसांमध्ये, घरामध्ये, अगदी सोनाली म्हणतेय नं तसच… अगदी क्षुल्लक गोष्टीतही…. पोस्ट सहीच रे….
हो आपल्याला आनंद देणार्या लहानात लहान गोष्टी मी पण जपून ठेवतो.. :)प्रतिक्रियेबद्दल धन्यु 🙂