माझं बिन भिंतीचे घर


आटपाट शहर, कॉल सेंटर मधला सामान्य मध्यमवर्गीय मुलगा ह्या ब्लॉग विश्वात आला. कळलंच नाही की, लवकरच एका मोठ्या कुटुंबाचा सदस्य होईल. आठ महिने झाले तुम्ही माझी वटवट ऐकताय ह्या ब्लॉगवर. खरच कधी वाटल नव्हता मी ब्लॉगिंग नित्यनेमाने करेन. आधी फक्त वाटे की काय करायचाय ब्लॉग, आपल्याला कुठे काय लिहता येईल? बर खरडलं काही तरी, ते कोण वाचेल? त्यामुळे इमेलमध्ये आलेले लेख, कविता संग्रहित करून ठेवू लागलो, ब्लॉगस्पॉटच्या ब्लॉगवर. वेळ मिळेल तेव्हा निवांत वाचत बसायचो.

मग एक प्रसंग घडला, २६ नोव्हेंबर २००८ चा अतिरेकी हल्ला. च्यायला ऑफीस रूल्स मुळे फोन बंद, ऑफीस आइटी ने सगळ्या वेब साइट्स ब्लॉक करून केलेल्या. म्हटलं माहीत काढू कशी? कसा बसा माझ्या घरी आणि एका मित्राला फोन केला हालहवाल जाणून घ्यायला. शहरात काही तरी झालाय भयंकर आणि मुंबई संकटात आहे. पण आम्ही जगापासून तुटलेलो, काही काही करता येत नव्हत. आमच्या आयटीवाल्याला सांगितलं निदान वृत्तपत्रांच्या वेब साइट्स तरी अनब्लॉक कर. नाही कोणी काहीच करायला तयार नव्हत, सिनियर्सच अप्रूवल हव, ईमेल हवा अशी करणे दिली गेली. माझ टाळकं अस् सटकल, की एक खणखणीत मेल पाठवायचा सीईओला. दहा मिनिटात भराभरा लिहून काढला एक ईमेल. हात थरथरत होते, पण असा राग आला होता की काय सांगू.

दोन पानी ईमेल झाला. तेव्हा कळलं, की मागे उमाकांत उभा होता. वय ४४, अंकल म्हणायचं वय त्याच. आमच्या ऑफिसमध्ये नावानेच हाक मारायची सवय. तो मला म्हणाला “देख तू ये ईमेल यहां भेजेगा इसका कोई मतलब नही, तूने उस दिन मुझे वो तेरी ब्लॉग की लिंक दी थी ना, उसमे डाल दे और सब न्यूज़ चॅनेल्स को भेज दे” म्हटलं हा, हे मस्त होईल म्हणजे माझ्या कंपनीला मस्त अक्कल घडेल. तेवढ्यात आमच्या सीईओचा ईमेल आला आणि सगळे आयटी रूल्स शिथील करण्यात आले आहेत. सगळ्या वेबसाइट्स चालू करायला सांगितल्या. फोन वापरायला परवानगी देण्यात आणि मग लगेच फ्लोरवर फोनाफोनी सुरू झाली घरी.

तो इमेल ड्राफ्टमध्ये लिहून तयार होता पण तो कधी पब्लिश झालाच नाही कधी. लॉगिन होतोच तर दोन-तीन ब्लॉग्सच्या लिंक्स गूगल रीडर मध्ये टाकून ठेवल्या. दुसर्‍या दिवशी तिथून दोन पोस्टचे अपडेट्स आले. पोस्ट वाचले, म्हटलं अरे हे कसे बिंदास लिहतात. आपण काल जे लिहल होत ते पब्लिश करावा का ह्याच विचारात मी गूगल वर ब्लॉग्स सर्च करत बसलो. मग कविता, लेख, संपादकीय अस जे आवडेल ते मी माझ्या ब्लॉग वर नोंदवून ठेवू लागलो. मराठी, इंग्रजी दोन्ही भाषेत ब्लॉग अपडेट करायचो. थोडे महिने उलटल्यावर मराठीब्लोग्स.नेट वर आलो आणि हरवून गेलो.

सगळे कसे घरातील, ऑफीसच्या गमती जमती पोस्ट केलेल्या वाचल्या. घरातल बारस, ऑफीसच्या कॅंटीन मध्ये झालेली नजरानजर, ट्रेक्स, भटकंती, खादाडी मस्त मस्त विषय होते त्या ब्लॉग्सचे. तेव्हा वाटलं, चला आपण पण पोस्ट करू की असंच काही तरी. ठरवलं होत की मराठीत लिहायचं आणि जुन्या ब्लॉगवर नाही. सगळ नवीनच सुरू करू, म्हणून वर्डप्रेस वर आलो. कोणी मुद्दाम कौतुक करावं माझ किवा जास्त हिट्स मिळावे ही भावना त्यादिवशी पण नव्हती जेव्हा ब्लॉग चालू केला आणि आजही नाही. स्वताच्या मनातील विचार, उत्स्फूर्तेने मांडणे हाच ह्या ब्लॉगचा उद्देश होता आणि कायम राहील.

विधानसभा निवडणुका आणि घरात घडलेल्या एका छोट्या अपघातावरुन पोस्ट लिहली. खूप मित्राना आवडली. मग मला थोडा अजुन धीर आला. मग सगळ्या ब्लॉग्स वर नियमीत वाचन चालू झाला, इंटरनेटवर बसलो की आधी बघायचो कोणी नवीन काय पोस्ट केली ते….महेन्द्रजी, रवींद्रकाका, रोहन, देवेंद्र, अपर्णा, कांचन, हेरंब आणि अनुजा ताई रोज रोज ह्यांच्या ब्लॉगला भेट देण आणि प्रतिक्रिया देण. मी दिलेल्या प्रतिक्रियेला त्यांनी दिलेली उत्तरे वाचेपर्यंत मी भेट देतच राहायचो. हळूहळू सगळे नावाने ओळखू लागले, मग पोस्टच्या कमेंट्सच्या माध्यमातून मारलेल्या गप्पा जोर धरू लागल्या. खूप आदर वाटतो मला या सगळ्यांचा. मग मी पण झेपेल तितक नियमीत ब्लॉगिंग चालू केलं.

सगळ्या ब्लॉगर मित्रांच्या ब्लॉग पोस्ट वाचून असा वाटत की वाह..काय लिहतो/लिहते. ह्यांच्या शब्दातच एवढी ताकद आहे की मला पार पंखा बनवून टाकला त्यांचा.  त्याच सुमारास बझ्झमुळे ओळख झालेल्या नियमित ब्लॉगर देव काका, अमेय, श्रेयाताय, बिरुटे सर, योगेश, सागर, विक्रम, आणि खूप नाव आहेत जी लक्षात पण नाहीत. प्रझ्झबुवा एकदा म्हणाले “सुप्रभात मंडळी, या गप्पा मारायला”. त्यांची बोलायची खोटी की आले सगळे मग गप्पा गोष्टी मारायला हजर.  खूप गप्पा रंगायच्या दिवसभर, ह्याची त्याची खेचायची, मस्करी, सीरीयस नाजूक विषय हाताळले जाऊ लागले.

सगळे वेळात वेळ काढून ह्या धाग्याला भेटी देऊ लागले. ब्लॉग्सचे अपडेट मिळू लागले रोज. सगळ्यांची लिहण्याची लकब एवढी एवढी आवडली की भेटवासा वाटत होत सगळ्याना. अजिबात खोटेपणा नाही, सगेळ मनात येईल ते सगळ ब्लॉग्सवर मांडत होते. विषयाची निवड, विविधता, त्यांच भाष्य, मग माझ्या प्रतिक्रियेच उत्तर. रोज हा दिनक्रम चाले. एकदम वर्च्युअल जग होत, जे एकदम खरं होत. कधीच कुणाला भेटलो नाही त्या आधी, पण एक वेगळीच जवळीक झाली होती सगळ्यांबरोबर ह्या ब्लॉग्समुळे. एक नवीन जग मला सापडल होत, जिथे तुम्ही तुमचे विचार मांडणार तुमच्या हक्काच्या जागेत आणि सगळे ते विचार पटले की नाही ते उत्स्फूर्त सांगणार. रोज माझ हे कुटुंब वाढता वाढता वाढे असा झालं. रोज नवीन सदस्य येऊ लागले आणि ह्या घराचे सदस्य होऊ लागले. आता मी ह्या माझ्या ऑनलाइन घरातील माझ्या सदस्यांना भेटण्यास खूप खूप आतुर आहे.

वाटायचं कधी ह्यांना प्रत्यक्ष भेटता आलं तर? पुण्यात ब्लॉगर मीट झाली, मी लगेच दुसर्‍या दिवशी महेंद्र काकांना एक ईमेल पाठवला आणि आपण सगळ्यानी भेटायाचं का असं विचारलं. ते म्हणाले थोड थांबून करू, मग प्रतिसाद मिळेल छान. मी म्हटला व्हक्के. जेव्हा मदत लागेल तेव्हा सांगा.

आता हा मेळावा प्रत्यक्ष होतोय. मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी आम्ही देव काकांकडे भेटलो. मस्त दिलखुलास गप्पा झाल्या मी, देवकाका, कांचन ताई आणि महेंद्र काका. मी ह्यांना प्रथमच भेटलो, मस्त कॉफी सोबत भाकरवडी आणि फरसाण. सगळे खूप उत्साही होते आणि मी सुद्धा 🙂

ह्या मेळाव्याला अपेक्षेपेक्षा जास्त नाव नोंदणी झाली त्यासाठी कांचन तायचे खास अभिनंदन. खूप खूप मेहनत घेतेय ती तसच, महेन्द्रजी, देवकाका आणि आमचे आदरणीय सेनापती सॉरी खाणापती रोहन..ह्यांचे विशेष आभार.

मला माझ्या कुटुंबाला भेटायाच आहे जे बिनभिंतीच्या घरात गुण्यागोविंदाने नांदत आहेत. तुम्ही होणार का सदस्य ह्या घराचे? सगळ्यांच्या वतीने मी आग्रहाच निमंत्रण देतोय. काय मग येताय ना?

मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याची नाव नोंदणी आता ४ मे २०१० पर्यंत!

36 thoughts on “माझं बिन भिंतीचे घर

  1. Pingback: Tweets that mention MarathiBlogs: माझ बिन भिंतीचे घर -- Topsy.com

  2. sagar

    Mast Lihil aahes re…ek dam sahich…. title sudhaa khup aavadl..mi Yenyacha nakki prytn karen…an to email publish kar jamal tar…(sry pc format kelay tyamule barah install nahiye mahnun ashi coment takatoy..)

  3. हेमंत आठल्ये

    ‘ऑफीस आइटी ने सगळ्या वेब साइट्स ब्लॉग करून केलेल्या.’ की ‘ ऑफीस आइटी ने सगळ्या वेब साइट्स ब्लॉक करून केलेल्या. ‘? असो, मस्त. आवडली.

  4. मस्त लिहिलंयस. खरंच हे म्हणजे एक व्हर्च्युअल कुटुंबच झालंय आपलं सगळ्यांचं..
    मला ब्लॉगर्स मेळाव्याला येता नाही येणार म्हणून खूप वाईट वाटतंय.. 😦
    पण तुम्ही सगळ्यांनी खूप मजा करा, फोटो, व्हिडीओज वगैरे काढा आणि आम्हाला पाठवा.. !!

    1. हेरंब, अरे आम्ही जमेल तसा तुला पाठवू सगळा…तू म्हणालास म्हणून काल ही पोस्ट टाकली घाईत 🙂 मला भेटायाचा आहे ह्या वटवट सत्यवानाला..प्लीज़ 😦

  5. sahajach

    मस्तचं लिहीलयेस रे….एकदम दिल से!!!!

    खरयं हेरंबचे आम्हालायेता नाही आले मेळाव्याला तरीही तुमच्या ब्लॉग्स मार्फत आणि फोटॊंद्वारे आम्ही व्हर्च्युअल हजेरी नक्की लावणार…

    (माझे नाव नाही लिहीलेस ना पोस्टमधे…कट्टी!!!!!) 🙂

    1. अग तन्वी, नाव लिहाल्यानी जर माझ्या भावनेला न्याय मिळत असेल तर त्यासाठी एक वेगळी पोस्टच टाकतो 🙂 😀
      बघ ना जमव न गा काही तरी..भेटायाच आहे मला तुम्हा सगळ्याना… 😦

  6. सुहास मी येतेय….लकीली माझ्या ट्रिपची आणि मीटची तारीख जुळतेय…पोस्ट मस्तच आहे….

      1. जूळवली की जूळली हे जास्त महत्वाच नाही…तुम्ही सगळे येताय यातच मला समाधान आहे 🙂

        1. सुहास, लाखावारी रुपए खर्च होतात रे..त्यामुळे असं काही मनात आलं तरी जुळवता येईल का?? तुच सांग..आमच्याकडे एक लगीनही आहे रे त्याचवेळी…असो..भेटुया..घाईत आहे म्हणून एकच कॉमेन्ट देतोय….

  7. उत्तर मुंबई सुभेदार सुहास राव… 🙂 ‘सगळ्या बलॉगर मित्रांच्या ब्लॉग पोस्ट वाचून असा वाटत की वाह..काय लिहतो/लिहते. ह्यांच्या शब्दातच एवढी ताकद आहे की मला पार पंखा बनवून टाकला त्यांचा.’ – तुही त्यातलाच … 🙂

    आपल्या बिन भिंतीच्या घरात भेटू लवकरच… 🙂

    .
    .
    @ अपर्णा… तारीख जूळते आहे??? की जूळवली आहेस 😛

    1. हा हा..काहीबाही खरडतो रे मी..जास्त ताण देत नाही डोक्याला…जे आला ते पटापटा टाइप करायाच बस.

  8. अरे वा,सुहाससेठ,मस्त लिहिलंस रे…अगदी गप्पा मारल्यासारखं. मस्त वाटलं. 🙂
    असाच लिहीत राहा…एक दिवस खूप मोठा लेखक होशील…तेव्हा ओळख ठेव आमची..तुझ्या बझमधल्या मित्र-मैत्रिणींची.

    1. देवा, स्वागत आहे ब्लॉग वर. तुम्ही सगळे माझ्यासाठी बझ्झ पुरते मर्यादित नाहीत हो…फक्त रोज गप्पा मारत जा आमच्याशी आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहा बस..हीच देवाचरणी प्रार्थना.

      मी लेखक…..काय राव. कशाला गरीबाची मस्करी करून राहीले तुम्ही 🙂

  9. Avinash Nikam

    Are suhas,

    Me Hya tuzya Virtual Gharacha niymit vachak aahe.

    Mala tuzya post kharach khup avadtat, me nehami tuzya navin post chi vat bhaghato asato.

    Tari aso, Chhan Lihilas.

    B.P.O. Vishwatali ek Udaleli Patang.
    Avinash Nikam.

  10. सुहासराव झ्यॅक लिहल आहे…इथे अगदि सहज उतरवल आहेस तुझ्या मनातील भावनांना…मी सुद्धा या बिनभिंतीच्या घरात खुप रमतो…सध्या नेहमीच नाही पण वेळ मिळेल तेव्हा ओढीने दुसर्यांच्या घरात डोकावुन पाहतोच काय चालल आहे ते…

  11. गेले काही दिवस नेट वर फारच कमी वेळ होतो, म्हणून काही ब्लॉग वाचणे झालेच नव्हते. आजच पाहिले हे पोस्ट.. अगदी मनापासून लिहिलेले आहे त्यामूळे एकदम भावले .
    लवकरच एक मिटींग करु या रोहन आला की. बहुतेक् ‘१८-१९ ता ला..

  12. सुहास,
    मस्त लिहिलयसं रे.
    ब्लॉग्स, बझ्झ हे आपल एक वेगळ विश्वच तयार झालयं. इथली सगळी आपल्या घरचीच वाटतात.

  13. बिन भिंतीच्या घराच्या बांधणीत वाचताना इतकी गुंतले कि अगदी मनाला स्पर्श करून गेली हि पोस्ट. आपण सगळ्यांच्या प्रेमाखातर एकमेकात इतके गुंतलो कि भिंती नाहीत हेच बरे झाले कारण ह्या घरात प्रवेश करायला कोणालाही सोपे आहे. फक्त हवे आहे एकमेकांसाठी थोडा वेळ, थोडे प्रेम, जिव्हाळा व अर्थात आपलेपणा मग आपलेच घर अधिका अधिक मोठे होत जाते. मी मेळाव्याला येऊ शकणार नाही पण तुम्हा सर्वांच्या मध्येच आहे हे नक्क्की आहे. जून मध्ये येईन तेंव्हा भेटेनच, तोपर्यंत फोटो वर समाधान मानून घेईन. सुहास तुझा स्वभावातला सहजपणा व सरळ पारदर्शी लिखाण हेच तू आवडण्यासाठी महत्वाचे आहे. असेच मनाला स्पर्श करणारे लिहिणे सातत्याने व्हावे…….. मेळाव्यासाठी खूप खूप शुभेच्छा……

    1. धन्यू तायडे, माझ्यासारख्या नवशिक्याच खूपच कौतुक केला आहेस. आपण भेटूच लवकर. काळजी नसावी 🙂

  14. Pingback: आनंद सोहळा, दासावा मुंबई ९ मे २०१० « मन उधाण वार्‍याचे…

  15. Pingback: स्वागत नववर्षाचे… « मन उधाण वार्‍याचे…

  16. Pingback: मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा – मुंबई २०११ | मन उधाण वार्‍याचे…

  17. Pingback: आनंद सोहळा, दासावा मुंबई ९ मे २०१० | मन उधाण वार्‍याचे…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.