तुम्ही काय कराल?


काल, माइक्रोसॉफ्टची परीक्षा द्यायला गेलो. तिथे वॉक-इन इंटरव्यूसाठी अर्ज मागवले होते. आता वॉक-इन म्हटल्यावर, माझ्या सोबत असणारे, इंजिनियर मूल गेली टाइमपास करायला म्हणून. एचआरला विचारला तर डेस्कटॉप सपोर्ट आणि सर्वर, क्लाइंट सपोर्ट अश्या दोन पोस्टसाठी इंटरव्यू चालू होते.

मित्रानी पॅकेजची माहिती विचारली तेव्हा त्याना दोन पर्याय देण्यात आले साहजिकच त्यानी जास्त पगार देणार्‍या कंपनीसाठी अप्लाइ करायाच आहे असा सांगितला. तिने त्याना फॉर्म्स दिले भरायला. त्यानी फॉर्म हातात घेतला आणि कंपनीच नाव बघताच कूजबूज सुरू केली. कोणाच लक्ष नाही हे पाहून फॉर्म्स तसेच फाडून फेकून निघून गेले. आता मला उत्सुकता होती की बाबा नक्की काय गोची झाली त्यांची? पॅकेजची माहिती मिळाल्यावर हवेत तरंगणारे असे मुस्क्तटात मारल्यासारखे निघून का गेले? मी विचारला एचआरला की बाबा कुठल्या कंपनी आहेत. तिने मला कंपनीची माहिती आणि कंपनीच्या पगाराच्या ऑफरची कॉपी दिली. एक जगविख्यात सॉफ्टवेर कंपनी आणि दुसरी कॉंटॅक्ट सेंटर इंडस्ट्री मधली दादा कंपनी. पॅकेज दुसर्‍या कंपनीनेच चांगल दिल होत पण ते नाकारून माझे वर्गमित्र (क्लास मधले) निघून गेले.

मी म्हटला ठीक आहे प्रत्येकाने आपआपल ध्येय ठरवला असत, काही करायची हीच उमर असते, पण हे त्याना सरळ सांगता आल असता तिला पण नाही..ते निघून गेले त्या अर्जाला कचरापेटी दाखवत. वाईट वाटला थोड…असो

अजूनही आमच क्षेत्र (मी कॉंटॅक्ट सेंटरलाच काम करतोय गेली अडीच वर्ष) हे समर/टाइमपास/लो-प्रोफाइल जॉब च्या पुढे गेलाच नाही खुप जणांसाठी. त्यात माझे आई-बाबा पण आहेत म्हणा. त्याना पण नकोय मी इथे काम केलेला..सारखे सांगतात दुसरीकडे बघ नोकरी. कोणी विचारला आम्हाला तुझ्या जॉब बद्दल तर काय सांगायाच? आयुष्यभर नाइट शिफ्टच करणार काय? मुलगी कशी मिळणार तुला लग्नाला? (हा आईचा ठरलेला प्रश्न)

खूप गमती, अनुभव मी आपल्या समोर मांडले ह्या ब्लॉग मधून जसे..वन नाइट @ कॉल सेंटर, डू नॉट डिस्टर्ब, आणि अजय पलेकर आलेच नाही.., How may I assist you today?

तुम्ही त्याना भरभरून दाद पण दिलीत. पण मला आज तुमच्या मनातल ह्या इंडस्ट्री बद्दलच खर मत जाणून घ्यायचा आहे. तुमचा मित्र/मैत्रिणी, मुलगा/मुलगी जर इथे जॉइन व्हायचा विचार करत असेल तर तुमचा स्टॅंड काय असेल? अगदी बिनदिक्कत लिहा कॉमेंट मध्ये. No Hard Feelings..बिंदास लिहा..चला तर मग

14 thoughts on “तुम्ही काय कराल?

 1. सुहास मी आता काही दिवसात सुरु करणार आहे जॉब हंटिंग …तेंव्हा तर आधी मी माझ्या विषयानुसार आधी जॉब बघेन म्हणजे ABAP,JAVA मध्ये पाहेन..पण खर सांगू मला जर काल सेंटर ला जर जास्त पैसे मिळत असतील तर मला इथे काम करण्यात काही एक प्रोब्लेम नाही..बाकी दुनिया गेली उडत..माझ्यासाठी पैसा सुद्धा महत्वाचा आहे..कारण माझ्या मतानुसार काम हे कामच असत.. 🙂 अन कशाला टेन्शन घेतो रे को काय म्हणत याच..तुला आवडत न मग बाकी गेले उडत म्हणायचं… 😀

  1. माझ्या आयुष्याची तीन वर्ष दिली रे मी, खूप मेहनत घेतली, एवढा प्रचंड स्ट्रेस असतो, आजारी पडतो, असा वाटत आता जाव घरी निघून..
   पण टाइमपाससाठी नाही करत ही नोकरी एवढा नक्की.

 2. सुहास, दिवसा सुरू करून रात्रीपर्यंतचं काम करण्यापेक्षा फ़क्त रात्री केलेलं चांगलं अशीही काही मतं असतील…मी स्वतः एक दिवस सकाळी सातला सुरू करून रात्रीचे साडे-अकरा वाजता स्वाइप आउट केलं होतं..काय म्हणायचं सांग…पण तरी आपल्याला उलटं आयुष्य जगून चालणार आहे का हे ज्याचं त्यानेच ठरवायला हवं..काम हे शेवटी काम असं माझं तरी मत आहे…..आणि मुख्य गोष्ट फ़क्त पैशासाठी कुठलीच नोकरी स्विकारू नये कारण मग प्रगतीचे मार्ग खुंटण्याची शक्यता असते…

 3. माझ्या मते कुठलीही कंपनी आणि कुठलंही काम चांगलंच पण तिथे व्हर्टिकल ग्रोथ पाहिजे.. !!

 4. खर तर call center मध्ये पण मेहेनतीने मोठ्या हुद्यांवर पोहोचता येतच की. फक्त कामाची वेळ रात्र पाळीची त्यामुळे जरा अडचण होते. पण लग्नासाठी मुली पटकन तयार होत नाहीत हे ही खरं.

 5. सुहास,
  कॉल सेंटरचा जॉब तुझ्या करीयर मध्ये मदतगार असेल तर काहीच हरकत नाही, पण त्याला केवळ एक पैशाची रास म्हणुन पाहशील तर लॉंग टर्म मध्ये नुकसानच होईल.
  रात्रपाळीचा तरुणपणी नाही पण नंतर त्रास होऊ शकतो…

  1. पैसा आणि करीयर ही दोन्ही उद्दिष्ट आहेत…मग ते करताना नाइट शिफ्ट हीच अड्जस्टमेंट…

 6. सुरवातीला कॉल सेंटरचा जॉब नक्कीच मदत करू शकतो. घरी बसून डिप्रेशन मध्ये जाण्यापेक्षा हे नक्कीच चांगले. शिवाय अनुभवही गोळा होतोच. ऑफिस पॉलिटिक्स, वातावरण व काम हे सारे अंगवळणी पडणे अतिशय जरूरीचे आहे. मात्र केवळ पैसा मिळतोय म्हणून त्यात अडकून राहू नये. ( Unless तो जॉबच आवडत असेल ) अनेक आघाड्यांवर पुढे त्रास होऊ शकतो. जुळवून घ्यावे पण तिथेच थांबू नये….

  1. हो श्रीताई, काही जुळवाजुळव, अड्जस्टमेंट ही असतेच…त्याला कोणी अपवाद नाही..मी पण 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.