डू नॉट डिस्टर्ब

आSSSSआSई ग् !!

अहो तुम्हाला नाही हो आमच्या हापिसातल्या बॉस आणि टीम मॅनेजरला सांगतोय. DO NOT DISTURB

आठवडाभर शॉनकडून मर मर काम करवून घेतल. सगळी एस्कलेशन्स, रिपोर्टिंग सांभाळून माझा स्वताचा स्कोर चांगला ठेवून तुमची काम केली. पण आज नाही आज ना फोन ना पीसी संध्याकाळपर्यंत. त्यामुळे खबरदार मला फोन केलात तर. सहा-सहा दिवस काम करतोय (पैसे डबल मिळतात म्हणा ओवरटाइमचे:) ) म्हणून काय झाला?. एका डंब यूस कस्टमर ला मॅकमध्ये (Macintosh)माउस राइट-क्लिक (Right-Click) समाजावता समाजावता डोक्यात तिडीक गेली होती माहीत आहे ना? पण मी सांभाळला त्याला राग आवरून, फ्लोरवर सांगायला काय जातय तुमच सुहास बघा किती सहज टार्गेट अचिव्ह करतोय.

ज्याची जळते त्यालाच कळते. बस झाला, खूप सहन केला. मला आराम नको? त्यादिवशी फक्त डोक दुखतय, मला झोप हवी आहे मी घरी जातो हाल्फ डे तेव्हा कसे भाव होते तुमच्या चेहर्यावर. नशीब सोडला होतत मला..

पण आज हक्काची सुट्टी. मस्त तंगड्या पसरून झोपणार…so Don’t dare to DISTURB me today

गुड नाइट…ZZZzzzzzzz,,,,…!!!

ईडियट बॉक्स

आपला ईडियट बॉक्स दिवसेंदिवस ईडियट होत जातोय…

आता न्यूज़ चॅनेल सर्फ करताना हा सीन बघून थांबलो. ही म्हणे आईची आवडती सीरियल? काय मिळता ह्या लोकाना अश्या सीरियल्स टेलीकास्ट करून..लिस्ट तर खूप मोठी आहे पण काय ती लाडो का कोण, किवा बालिका वधु. बघू वादाचा मुद्दा असेल माझ बोलण कारण खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे अश्या टूकार मालिकाना. असो मग लिहेन  यावर आता ऑफीसला जायचय..

तूर्तास हा वीडियोतून माझा मुद्दा पटतो का बघा 🙂

माइक्रोसॉफ्ट विसिओ २०१०

सॉफ्टवेर इंडस्ट्रीमध्ये वाढलेल्या स्पर्धा आपण जाणतोच. त्यातच गूगल दादा आणि माइक्रोसॉफ्ट काका यांच तर हाडाच वैर, एकमेकांवर सरशी करण्यात दोघेही पटाईत. हल्लीच काकानी ऑफीस २०१० लॉंच केला. त्यानंतर काही महिन्यातच त्या ऑफीस २०१० मध्ये एक नवीन प्रॉडक्ट एड केला गेला. आजच ह्या प्रॉडक्टचा लॉंच वीडियो बघितला. विसिओ २०१० (VISIO 2010) फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रिलीस केला गेला हे जगभर. माइक्रोसॉफ्टने विसिओ ह्या कंपनीला टेक ओवर करून ह्या प्रॉडक्टच्या तांत्रिक फीचर्स मध्ये अमुलाग्र बदल घडवून स्वताच्या नावाखाली याची बाजारात घोषणा केली. (काका ह्या बाबतीत तर एकदम तरबेज:))

ग्राफिक इंटरफेसवर काम करणार्‍यांना हे सॉफ्टवेर खूप उपयोगी पडेल. विसिओ ऑटोकॅड, फोटॉशॉप आणि इतर २४ प्रकारच्या इमेज फॉर्मॅट सपोर्ट करतो. फ्लोचार्ट्स, टेबल्स, डेटाबेस इथे वापरात येणार्‍या स्टॅन्सिलस् हवे तसे एडिट करता येतात. ह्या मधील मला आवडलेला फीचर म्हणजे एखाद्या वेब साइटचा साइट मॅप, तुम्ही बघू शकता फक्त ती लिंक टाकून. त्यामध्ये तुम्हाला कळता पेजस कसे सेटप केले आहेत, कुठे पेज लिंक ब्रेक होतेय. सगळा सगळा एका क्लिक सरशी. ह्या गोष्टीसाठी नॉर्मली खूप डोकेफोडी करावी लागायची. नेटवर्क मॅप, ऑर्गनाइज़ेशन चार्ट्स, रिपोर्ट्स आणि खूप नवीन फीचर्स ह्यात काकानी सामावून घेतले आहेत. लवकरच दादांकडून याला प्रतुत्तर येणार आहे अशी बातमी आहे 🙂 एकूणच एक चांगल अप्लिकेशन रिलीस केलय काकानी

ह्याच बीटा सॉफ्टवेर इथून डाउनलोड करता येईल बघा वापरुन..

प्रीव्यू वीडियो –