लिव्ह इन रिलेशनशीप आणि आजची पिढी


रामनवमीच्या दिवशी सुप्रीम कोर्टाने लिव्ह इन रिलेशनशीप आणि विवाहपूर्व शरीरसंबंध हा गुन्हा नसल्याच जाहीर केला.

“जर दोन सज्ञान व्यक्ती विवाह न करता एकत्र राहात असतील तर तो गुन्हा नाही. जीवन जगण्याचा भारतीय घटनेनेच अधिकार दिला आहे. विवाहपूर्व शारीरिक संबंध हाही प्रत्येकाचा व्यक्तिगत दृष्टिकोन आहे त्यामुळे तो गुन्हा ठरूच शकत नाही असा निकालात स्पष्ट केला” इति सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन. माझी ह्या निकलावर प्रतिक्रिया म्हणाल तर निकालाच स्वागत आहे काही अर्थी पण त्याचा दुरुपयोग होणार याची खात्री असल्याने दु:खीपण आहे.

तसा मी कोणी तत्त्ववेत्ता नाही, की कोणी मोठा माणूस की ज्याचे विचार कोणाला पटावेत कारण एक गंभीर विषयाला हात घालतोय. पण रोज जे काही बघतो आजूबाजूला, कानी पडत त्या वर मला आज शोक करण्यावाचून पर्याय नाही. म्हणजे तस सगळ्यांबद्दल माझ हे वाईट मत नाही, मी सुद्धा याच पिढीतला मी पण ३-४ वर्षापूर्वी कॉलेजमध्ये होतो, धम्माल केलीय. कॉलेजच्या नावाखाली भरपूर भटकलोय (१२वीत एकही लेक्चर अटेंड नाही केल्याचा रेकॉर्ड आहे साठेमध्ये अजुन)

सुप्रीम कोर्टाने ह्या निकालाला जाहीर करून एक दिवस झाला नसेल ट्रेन मध्ये घडलेला प्रसंग सांगतो. कांदिवलीला ट्रेन मध्ये चढलो दरवाजातच उभा राहिलो लटकत, तेव्हा माझ्याच बाजूला एक तरुण कपल गुलू-गुलू गप्पा मारत होते. तेवढ्यात त्या मुलीचा फोन वाजला, कदाचित तिच्या घरून असावा ती म्हणाली आम्ही सगळ्या मुली निघालो एस्सेल वर्ल्ड मधून ट्रेन मध्ये आहोत (तिने समोर उभ्या असलेल्या मुलाला डोळा मारला) आणि फोन कट केला. तो म्हणाला तिला परत कधी जायच तिथे? मस्त मज्जा आली. एस्सेल वर्ल्डला? आपल्याकडे हॉल टिकिट आहेच की एकावर एक फ्री मिळवायला टिकिट आणि दुसर्या टिकीताच्या पैशात मस्त रूम घेऊ गोराईला कोणाला कळला तरी काय, आता ओफ्फिसियल आहे रूल वाचलास ना? तुझ्या आईला कळला की सांग बिंदास. (हे कॉन्वर्सेशन इंग्लीश मध्ये होत). तिनेही त्याला दुजोरा देत टाळी दिली आणि मिठी मारली त्याला. आई शप्पथ असा टाळक हटल माझ..म्हटला साली ती कार्टी १२ची नुकतीच परीक्षा संपल्यावर मज्जा मारायला बाहेर पडली आणि हे धन्धे करतायत. आई-बाबा म्हणत असतील की बाबा चला आभ्यास करून दमली असतील पोर म्हणून जाउ देत पण ही नालायक लोक..श्याsss

Image Courtesy Rediff.com

आमच्या ग्रूप मध्ये तर आजही कुठली मुलगी माझ्या सोबत आउटिंगला पिकनिकला जात असेल तर तिच्या घरी फोन करून सांगतो आम्ही स्वत:, मग तिला तिच्या घरापर्यंत सोडून येतो. जरी कॉल सेंटर मध्ये काम करतो तरी मला माझी मर्यादा माहीत आहे, भले मग मला माझ्या पाठी कोणी काही म्हणू देत. वर घडलेला प्रसंग बघीतल्यावर लाज वाटली की अशी आहे पिढी आपली. थट्टा-मस्करी पुरता ठीक पण आजकल शाळेपासूनच हे प्रेम प्रकरण सुरू झालीत तीपण सीरीयस. त्यातून मग निर्माण होणार आकर्षण, संबंध काय बोलायच ह्यावर. आमच्या चारकोपच्या एका प्रसिद्ध शाळेतला प्रसंग इथल्या लोकाना माहीत असेलच नववीच्या मुला-मूलीना पोलिसानी धरून तसाच नागव शाळेत आणला होता ब्लॅंकेट मध्ये गुंडाळून. हा एक खेळ झालाय खेळ, केवळ मज्जा मारायला हा/ही माझा बाय्फ्रेंड/गर्लफ्रेंड…लिव्ह इन रीलेशन म्हणतात ती मूल ह्या वयात याला. आमची परवानगी होती मग कोणाचा बाप अडवेल आम्हाला ह्या गुर्मित ही पिढी वाहत जातेय. थोडे दिवस राहू एकत्र एकमेकना साथ देऊ आणि नसेल पटत तर निघून जाउ. अशी काही उदाहरण समोर आली की वाटत नको तो कायदा. काय मिळणार आहे त्याने? लावून द्या पोराची-पोरीची लग्न एकदा अंगवळणी पडला की घेतील सांभाळून. ह्या निकालाच जेवढा स्वागत झाला तितकीच टीका ही झाली…मग परत वाद-विवाद, चर्चा. समलिंगी कायदा (सेक्षन ३७७) झाला त्यावेळी ही अशी बोम्ब झाली होती.

पण माझ मत इथे थोड्यासाठी बदलतय कायद्याच्या  बाजूने म्हणा, कारण की मी माझ्या आयुष्यात अशी दोन-तीन उदाहरण बघतोय की जी काही गरजेपोटी अशी कांट्रॅक्ट मॅरेज करून रहातात, लिव्ह इन रीलेशनशिप सोप्प्या शब्दात..स्वताचा फायदा बघितला त्यात कारण दोघांचीही वय झाली होती आणि घराचे हफ्ते भरण्यासाठी त्या मुलीने हा पर्याय स्वीकारला. मुलालाही आर्थिक मदत हवी होती, त्यामुळे दोघांच्या नोकरीवर त्यानी कर्ज काढल. माझी खूप चांगली मैत्रीण आहे ती..तिला समाजवला पण होत पण…असो तिची गरज होती आणि तिने हे केला आपल्या घरच्या फायद्यासाठी त्यामुळे मला तीच वर्तन अजिबात गैर वाटत नाही. आज तीन वर्षानंतर त्यानी लग्न केल.

मी कोणाही एका बाजूने बोलत नाही आहे. दोन्ही बाजू पटतात असा म्हणा हवा तर..त्यामुळे माझा स्वताचा वैचारिक गोंधळ सुरू आहे 😦 नाती जपायला हवीत मित्रानो मग ती लग्न करून जपा किवा लिव्ह इन मध्ये राहून..ह्या कायद्याची पळवाट होऊ देऊ नका म्हणजे मिळवली…

लिव्ह इन रिलेशनशीप विषयावर वाचलेला हा लेख बघा वाचून आवडेल – लिव्ह इन रिलेशनशीप : कऱहा ते मिसिसीपी

असा सुवर्णमध्य काढण जमेल का खरच? असे कायदे का करावे लागतात याचा विचार केलाय का कोणी? सांगा ना?

30 thoughts on “लिव्ह इन रिलेशनशीप आणि आजची पिढी

 1. हेमंत आठल्ये

  अगदी बरोबर आहे. ज्या रामाचा एकपत्नी, एकबाणीचा आपण एवढा जयजयकार करतो तिथे आपण असे कायदे होतांना बघतो आहे. माझ्या कंपनीत एक फॉरेनर होती. तिला आपली इथली संस्कृती, भाषा आवडायची. आणि हो ती मराठी शिकली सुद्धा. पण आपण परदेशी गोष्टींचा, असल्या गोष्टींनी समाज बिघडल्यावर मग हे पुन्हा कायदा करतील. असो, मस्त लिहिलंय. आवडल. अगदी माझ्या मनातल बोलला आहेस.

  1. धन्यवाद हेमंत, खरच खूप गोंधळ सुरू आहे डोक्यात. कळत नाही काय बरोब्बर काय चुक

 2. मला वाटतं अधिकार आणि जवाबदार्‍या यांच्यात बॅलन्स ठेवून जगता आलं तर बरेच प्रॉब्लेम्स सुटतील. अर्थात ते फार कठीण आहे म्हणा !!

 3. सुहास
  अतिशय मुद्देसुध व कुठलाही गोंधळ होवू न देता व्यवस्थित लिहील आहे..
  सर्व प्रथम उत्तम लिहिलंस त्याबद्दल कॉमेंट अन आता राहिला त्या लिव इन चा प्रश्न तर आपण कशाला डोक खराब करून घ्यायचं(होत हे माहित असूनही लिहितो रे 🙂 ) ..ज्याचा त्याचा प्रश्न म्हणून सोडून द्यायचं फक्त सार्वजनिक जीवनात लिव इन च्या नावाखाली नंगानाच नको…बाकी काय गोंधळ घालयचा तो घाला… 😀

  1. अरे भीती तीच आहे ना सागर. काही लोकांसाठी हा कायदा अतिशय उपयुक्त असा आहे..पण काहींसाठी हा वरदान आहे नंगानाच करायला…पोस्ट आवडल्याच आवर्जून सांगितल्या बद्दल थॅंक्स आणि ऑल द बेस्ट परीक्षेसाठी…

  1. धन्यवाद, आनंद. मला वाटत नव्हता मी ह्या विषयाला न्याय देऊ शकेन. एक प्रयत्‍न केला छोटा.

 4. गंभिर आणि वादचा मुद्दा आहे हा.
  विवाहसंस्थेमुळे सुरक्षिततेची भावना आणि एक प्रकारचे मानसिक स्वास्थ्य मिळत, त्याच काय अशा लिव्ह इन रिलेशन शिप मध्ये?

  1. हो वादाचा मुद्दा तर आहेच..दोन्ही बाजू मला पटतात हेच सांगायाच होत मला…कारण मी दुसरी बाजू ज्याला सगळे विरोध करत आहेत ती बाजू खूप जवळून अनुभवली आहे.

 5. Anish

  सर्वोच्च न्यायालयाने फक्त सज्ञान व्यक्ती एकत्र रहात असतील तर तो गुन्हा नाही, एवढंच म्हटला आहे. मुख्य मुद्दा हा आहे की कायद्याने सज्ञान असलेली व्यक्ती खरच सज्ञान असते का?
  सारासार विचार करून निर्णय घेतलं असेल तर इतर कोणी काही चिंता करायची गरज नाही. त्यांना सुरक्षितता, मानसिक स्वास्थ्य वगैरे काय हवं ते मिळतही असेल बहुतेक. पण टीव्ही, चित्रपट, मित्र-मैत्रीण यांच्या प्रभावामुळे वहावत जावून निर्णय घेतलं असेल तर तो चिंतेचा विषय आहे.

  1. अगदी बरोब्बर बोललास मित्रा. माझ ही म्हणण तेच आहे, विचार करा आणि मग पाउल टाका. घाईत आणि कुणाच्या प्रभावाखाली घेतलेले निर्णय हे नेहेमीच यशस्वी होतील असे नाही.

 6. सुहास, अरे एकंदरितच रिलेशनशिपचे अर्थ आपल्याइथे बदलताहेत…लिव इन एक टोक झालं आणि पटापट होणारे घटस्फ़ोट दुसरं…आणि हे दोन्ही आपल्याकडे इतकं कॉमनली होत नव्हतं….जास्त विचार केला की त्रास होतो मग आपण स्वतःपुरता हा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहायचं असं उगाच वाटतं….

 7. सुहासजी, अतिशय चांगला विषय निवडला तुम्ही लिखानासाठी! मी तुमच्याशी १००% सहमत आहे. ही नालायक पोरं मजा मारतात आणि त्यांचे आई-वडील तिकडे काही कल्पना नसताना, यांची काळजी करतात. पोरींच्या नंग्या-नाचाने तर आता कहर केला आहे..कुठेही बघा गुटूर-गुटूर करत उभी असलेली टाळकी दिसतातच. अशी डोक्यात जाते ना….जाऊध्यात…नाहीतर कोणीतरी ह्युमनराइट्सवाला येऊन आम्हालाच शहाणपण शिकवायचा!!

  1. आशिष, पोस्ट आवडल्याच आवर्जून सांगितल्याबद्दल आभार. आता पोर आई-बाबाची अक्कल काढायला लागली आहेत त्यामुळे आता पुढे काय वाढलाय देवाक माहीत 😦

 8. Pushpraj

  सुहास पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत आहे..माज़या मते हा जो काही खेळ मंडला आहे तो अतिशय पोरकट खेळ आहे…..काय तर म्हणे लिव इन रिलेशन शिप…..मला फक्त एक सांगा तुम्हाला मजा म्हणून एकत्र राहायले आवडते ठीक आहे पण पुढे काय…??ह्या अशा नात्यामधे लवचिकता असते पण बंधन नसते…त्यामुळे उद्या जर ती तुम्हाल सोडून गेली तर व्रुधापकाळात तुम्ही काय करणार आहात??….. अशा वेळी लवचिकतेपेक्षा बंधन आवश्यक असते आणि माज़या मते विवाह संस्थे मधे बंधन हे पायाभूत तत्व आहे…पत्नीला पतीचे बंधन…पतीला पत्नीचे बंधन..
  .दोघंा समाजाचे बंधन……. बाकी तुमच्या विचारांशी सहमत…

  1. धन्यवाद, पुष्पराज
   नात्याच यशस्वीतेच मूळ तुम्ही किती ते खरेपणाने निभावता यावर आहे. मग ते कुठलाही नात असो..

 9. सुहास खुपच छान मुद्द्याला हाट घातला आहेस. आणि स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं चित्र समोर ठेवलं आहेस. या अशा रीलेशनला काय नाव देणार. नवरा बायको संसार हे शब्द कोठेच बसत नाहीत यात. आपण अधोगती कडे चाललो आहोत असेच वाटते. मात्र या अशा मंडळीनी क्षणिक सुखाचा छ विचार केलेला असतो. दीर्घकालीन विचार केल्यावर त्यांच्या पुढे चित्र उभे राहील की शेवटी म्हतार पण आपण एकटेच आहोत.मागे पुढे कोणीच नाही. this is nothing but enjoying todays life not preserving our future. अरे म्हातारी झाल्यावर नवरा बायको एक दुसर्याच्या सोबतीला असतात, सूना – नातवंड असतात देखभाल करायला आपल म्हणायला. याना कोण असणार आहे.

  1. धन्यवाद काका, असाच आपला एक प्रयत्‍न. बाजू मला दोन्ही पटतात, कारण मी ते अनुभवला आहे. पण असो…

 10. trupti salvi

  सुहास,
  पोस्ट आवडली… कोर्टाचा निर्णय मान्य करून प्रत्येकानं आपापलं बघावं अस म्हणून ही गोष्ट सोडून द्यायची म्हटली तरी त्याचा गैरफायदा घेऊन समाजाच स्वास्थ्य बिघडवणारी ही संस्क्रुती गळी उतरत नाही. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक लक्षात घेऊन आपण वागलो तर बर होईल. बाकी मुद्दा छान मांडला आहेस.

 11. सुहास विषय आणि त्याची मांडणी दोन्ही उत्तम…
  तसच काही कारण असेल तर हे ठिक आहे नाहितर मी तरी लिव इन रिलेशनशिपच्या विरोधातच आहे…

  1. हो गरजेपोटी काही निर्णय घ्यावे लागतात. शेवटी तुम्हीच तुमच्या नात्याला न्याय देणार. मग ते नात कसा टिकवायच हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.