अडोबी (Adobe भारतात ज्याला अडोब म्हणतात) ग्राफिक आणि मल्टिमिडीया अॅप्लीकेशन निर्मिती करण्यात एक नंबर हे आपण जाणतोच. जगभर ख्याती मिळवलेली त्यांची सॉफ्टवेर माहीत नाही असा कोणीच नसेल. पीडीफ, फ्लॅश प्लेयर, शॉकवेव प्लेयर, फॉन्ट्स, इमेजिंग आणि मीडीया एडिटिंग प्रॉडक्ट्स काय काय बनवते ही कंपनी आणि तेही एकडम अप टू डेट. फ्लॅश प्लेयर, शॉकवेव प्लेयर, फॉन्ट्स नसतील तर वेब पेजस नीट बघता पण येणार नाहीत. आडोबी पीडीफ हे त्यांच सगळ्यात जास्त गाजलेला प्रॉडक्ट. डॉक्युमेंट्सला सहजरीत्या, कमी जागेत आणि प्रोफेशनल लुक देण्याच काम ह्या अॅप्लीकेशन ने केला.
१२ फेब्रुवारी २००७ रोजी जेव्हा SGSI जॉइन केला लोवर परेलला तेव्हा मला सुतराम कल्पना नव्हती की मी अडोबीसाठी काम करतोय. आम्हाला आमच्या क्वालिफिकेशनच्या आणि सेलेक्षन प्रोसेस नंतर वेगळा करण्यात आल होत पहिल्याच दिवशी. Induction रूम मध्ये एक फिरंग बसला होता जाडया, बटल्या, पण सुटाबुटात, लॅपटॉपशी खेळत. आम्ही कुजबुजतोय, शिव्या देतोय, सुरू कर रे बाबा काय ते एकदाच सांग काय करणार आम्ही? तेवढ्यात त्याने टाळी मारली आणि रूम मध्ये अंधार आणि प्रोजेक्टर लावला गेला. वेलकम स्लाइड संपल्यावर नेक्स्ट स्लाइड वर खाली दिलेला लोगो आला.

मग डियौन नॅश (तोच तो फिरंग) त्याने असा प्रेज़ेंटेशन आणि इंट्रो दिला आमच्या प्रोसेसचा मानला. आम्हा सर्वांसाठी तो एक मल्टीटॅलेन्टेड डॅन बाबा होऊन बसला होता 🙂 त्याने आम्हाला ट्रेनिंग दिला प्रोसेसचा आणि आम्ही प्रोसेस यशस्वीरित्या दोन वर्ष आणि ३ महिने सांभाळला. आम्ही Adobe Creative Suite 3.0 (CS3) आणि Adobe Creative Suite 4.0 (CS4) सपोर्ट करायचो. त्यांच्या अडोबीची नवीन नवीन प्रॉडक्ट्स आणि त्यातून साकारलेली क्रियेटिविटी बघून तोंडात बोट घातली अक्षरशः…आज खास ही आठवण काढतोय कारण मला आताच अडोबीकडून इन्विटेशन आलय Creative Suite 5.0 (CS5) च्या लॉंचचा.
तुम्ही हे लॉंच घरबसल्या देखील बघू शकता..त्या साठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा..क्रियेटिव लोकांच्या क्रियेटिविटी ला मन:पूर्वक दाद द्या.माझ्या शुभेच्छा अडोबीला..
हे अडोब उर्फ अडोबी चं CS 5.0 आर्टिस्ट लोकांचं application वगैरे आहे का?
हो हे पूर्ण, पॅकेज आहे बंड्ल म्हणता येईल त्यांच्या नवीन प्रॉडक्ट्सचा.. CS५ हे वर्जन आहे अप्लिकेशनचा
खुप मस्त लेख लिहला आहे आवडला
स्वागत आणि थॅंक्स असाच भेट देत राहा..
Pingback: Tweets that mention Adobe Creative Suite 5.0 « मन उधाण वार्याचे… -- Topsy.com