मला तर खूप मोठा धक्का बसला जेव्हा ह्या फोटोची लिंक विक्रमने बझ्झ वर दिली. विश्वास बसत नव्हता स्वताच्या डोळ्यावर. महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार आहे माझ्याकडे, एकदा संधी द्या मला असे आवाहन करणारे राजसाहेब ठाकरे. ‘कोणत्याही समाजापुढे लांगूलचालन करणार नाही , निवडणुका आल्या म्हणून ‘ टोप्या ‘ घालणार नाही ‘ असे ठणकावून सांगणारे मराठी हृदयसम्राट नक्कीच उन लागता म्हणून वर टोपी घालून नाहीत.
मी राजच्या अ.भा.वि.से. बरोबर काम केलय साठेला असताना, तेव्हापासून ह्या माणसाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. राज यांची निवडणुकीतील सडेतोड, आभ्यासपूर्ण, अर्थपूर्ण भाषण कानावर पडली की रक्त कसा सळसळून येत. पण, राजला असा बघून सगळा अवसान गळून पडलय. सगळे म्हणतात (मलापण वाटत) की बाळासाहेबांनंतर तुम्हीच असे युवा आणि कणखर नेतृत्व देऊ शकाल महाराष्ट्राला, पण का कोण जाणे बाळासाहेबानची जागा घेण्याची लायकी कोणाचीच नाही याची खात्री पटली पुन्हा. ज्यानी ४० वर्षापूर्वी दिलेला शब्द मोडला नाही आजपर्यंत.
नक्की कुणाकडे बघायच आता मराठी समाजाने? राज लवकरच पक्षाकडून तुमच्या बदललेल्या अजेंड्यावर प्रतिक्रिया अपेक्षित आहे..
बाकी काही बोला माझ्या राजनिष्ठेला नक्कीच धक्का लागलाय 😦
सुहास तुमच्या प्रमाणेच माझा हि राज ठाकरे वर खूप विश्वास होता पण हे दृश्य बघीतल्यावर नक्कीच माझ्या हि राजनिष्ठेला तडा गेला आहे …
जय हिंद
जय महाराष्ट्र ……..!!!
मी समजू शकतो सागर..
अरे भाऊ,
राजचा फुगा फुटायाचाच होता, राज कॉंग्रेसचा हुकमी एक्का झालाय शिवसेनेला आणि भाजपाला झोपवण्यासाठी. मराठी माणसांचा दुहीचा शाप अजून काही सुटत नाही!
हुकमी एक्का वगेरे माहीत नाही, पण निदान पक्ष स्थापन करताना आणि पदोपदी आपली वचनपूर्तता करून देणार्या ह्या युवा नेत्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. मराठीची दुही वाढतच जाणार यात शंका नाही 😦
त्यांच्या झेंड्यातुन त्यानी आधीच हे सुचीत केल होत त्यामुळे मला इतका धक्का लागला नाही.मी काही राजसाहेबांचा कडा समर्थक नाही पण कितितरी मुस्लिम मराठी भाषीक आहेत आणि सगळेच मुस्लीम वाईट असतात असेही नाही.तरीही थोडस वाइट वाटतेच….
माझा आक्षेप त्याच्या भेटीवर नक्कीच नाही. पण स्वत: मराठी माणसाला ओरडून ओरडून दिलेल्या वचनांची आठवण त्याना झाली नसेल का याच राहून राहून दु:ख होतय मला
सुहास , माझं असा प्रामाणिक मत आहे की तुम्ही ह्या फोटोचा चुकीचा अर्थ काढताय। मनसे च्या ध्येय आणि धोरणान मधे सर्व समाज घटकानां एकत्रित घेउन महाराष्ट्राचा विकास करायचं नक्की केलेलं आहे । राज साहेब असले फोटो क़िवा लांगुलचालन टाळतात हे सगळ्यानांच माहित आहे । तेव्हा ह्या फोटो मधे “असलेली” राज निष्ठां भंग व्हावी असं काही नाही । राहिला प्रश्ना विद्याधरांच्या प्रतिक्रियेचा , तो तर शिवसेनेचा जुना उगाळुन चोथा झालेला मुद्दा आहे तेव्हा त्या बाबतीत मत प्रदर्शन करणे योग्य ठरणार नाही
विनोद, मला बाकी पक्षाच मला काहीच घेणा-देणा नाही. सगळे आपापल्या परीने आणि पातळीने राजकारण करत आलेत आणि करतील.
माझा मुद्दा एकच, करा की सगळयाना जवळ, महाराष्ट्राचा विकासाच्या आड मला अजिबात नाही यायच. मी हिंदू आहे म्हणून मुस्लिमाना विरोध करत असा वाटत असेल तर प्लीज़. मुस्लिमच काय, ख्रित्चन, गुजराती, बिहारी सगळेच घटक मिळून काम करतील विकासासाठी. पण वर फोटोत दिलेला पेहराव करून त्याना काय सिद्ध करायाच होत मला फक्त हेच जाणून घ्यायचय्.
मी फक्त मराठी लोकांच्या मनात आलेला एक प्रश्न विचारला. उत्तर द्याव आणि विषय संपावावा बस एवढीच प्रांजळ अपेक्षा
मला धक्का नाही बसला कारण मला हे असलं काही अपेक्षीत होतंच… झेंडा चित्रपटात तसे सुचवले गेले होतेच…
मला ही तो प्रसंग आठवला होता जेव्हा मी हे बघितला 😦
सुहास सॉरी पण मला एक प्रश्न विचारावाच लागेल. पाहिजे तर स्पॅम म्हणून डिलीट मार, पण तरीही,
शिरसाट साहेब, मला एकाच प्रश्नच उत्तर द्या, राहुलबाबा मूर्खासारखे बरळले तेव्हा अबुआझमीवर बरसणारे राजसाहेब आणि मनसे काय करत होते?(हे शिवसेना समर्थक नाही, एक मराठी माणूस तेव्हासुद्धा विचारत होता आणि आजही विचारतोय)
हे प्रश्न मी पण विचारले होते, ..कारण मला मनसेकडून एक तीव्र निषेध अपेक्षित होता जेव्हा हा रोमी मुंबईत येऊन ट्रेनवारी करून गेला त्या वादग्रस्त विधानानंतर. पण…….
mala konavar vishvas thevava tech samjat nahi.
mala konavar vishvas thevava tech samajat nahi.
i am speechless there are no for marathi.
i am speech less there is no one for marathi.
हो, कळतय रे पारस
अजुन एक नेता राजकारण करत आहे….
मला वाटल होत की हा नेता खरच मनावर “राज” करेल…
पण आता त्याने सुद्धा आपला म्हणण फिरवल….
“कधी टोप्या घालणार नाही…
इफ्तार पार्टी देणार नाही…”
शेवटी सगळे राजकारणात गेले की समाजकारण विसरतात हेच खरे!!
हो मला ह्या नेत्यामध्ये पक्का स्थान मिळवेल ह्याचा विश्वास आहे…पण त्यानी समोर येऊन या कृतीच स्पष्टीकरण देणा गरजेचा आहे.
सारा महाराष्ट्र याच्याकडे आशेने बघतोय, हे पाउल नक्कीच एक ओरखडा देऊन जाईल मराठी मनावर एवढ नक्की
मला वाटत हा फोटो जुना आहे..
या बद्दल राज बोलले सुद्धा होते कि “समोरच आले मग गेलो ” अस काहीतरी…
पण काहीही झाल तेरी मलाही हे अस पाहून दुख झाल….
विठ्ल्ला कोणता झेंडा घेवू हाती?
समोरच आले मग गेलो..जा ना..मी पण गेलोय दर्ग्यात..मी विचारला होता मला पण हे असा कराव लागेल का? तर मला त्या मौलवीने स्वत: सांगितला..मनात श्रद्धा ठेव बस, बाकी काही नको असत देवाला किवा अल्ल्हाला
मला वाटते कि राजने कधीही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतले नाही आणि तो शिवसेनेतही नाही मग तुम्ही अशी अपेक्षा का ठेवतात . त्याचे ध्येय धोरण निश्चित आहे “मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा “
कळेलच, जर असा वागत राहीले तर मराठी माणूस जवळ करेल का राज साहेबाना? तुम्हाला आवडेल का तुम्ही असा वागलेला?
हिंदू एकतेला घातक राजकारण राज ठाकरे करत आहेत. आणि म्हणूनच पर्यायाने देशविभाजनाचे राजकारण होत आहे. हिंदूंनी हिंदूंची टाळकी फोडायची. आणि इथे ‘ते मराठी मुसलमान आहेत वगैरे’ समर्थन करणार्यांची कीव करावीशी वाटते. मुसलमान मानतो का स्वतःला? जगभरातला मुसलमान ‘इस्लाम खतरे में ही म्हटल्यावर एक होतो’..आणि आम्ही मात्र दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय हिंदूंची टाळकी फोडण्यात मर्दुमकी दाखवणार. आज न उद्या जनतेला हा दिखावा कळल्याशिवाय राहणार नाही. भ्रमनिरास तर होणारच आहे. या विषयावर अधिक वाचा- http://www.vikramwalawalkar.blogspot.com
धन्यवाद, विक्रम उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल. आपण ऐकीचा विषय काढला तो पटला एकदम. आपण हे कधीच साधू शकलो नाही ह्याचीच खंत वाटते..असेच भेट देत राहा
satta he mansala kahi he karavatya
स्वागत उमेश ब्लॉगवर…
सत्ता ही राजकारण्यांची आणि राजकारणी फक्त सत्तेसाठी बस
kahi changala karanyasathi, asa kahi tari karav lagat.
हे भलतच काहीतरी आहे असा नाही का वाटत????
tumhala kahihi karayacha asel ya maharashtrasathi , tar tumachya hatat satta asavi lagate.
ekada satta milali ki aapli dheya ani aapan.
parantu satta milalyashivay tumhi kahihi karu shakat nahi.
Tumhala kitihi changala karayache asel, tarihi jo paryant satta milat nahi to paryant tumhi kahihi karu shakat nahi.
hatat hukmi ekka asel tarach tumhi pahije ti chal khelu shakata.
manase ekdach sattevar yeu dya.
“MAHARASHTRA” ya shabdacha arth tumhala tyach veli kalel.
ब्लॉगवर स्वागत 🙂
सत्ता स्थापन करायला जर हे काहीतरी करावा लागत असेल तर मग कॉंग्रेस आणि शिवसेनेचा का धिक्कार करता? त्यानी सुद्धा अशी थेर केली आहेत..आपला त्यास पाठिंबा आहे का, शरद?
महाराष्ट्र शब्दाचा अर्थ?? तुम्हाला कळला असेल तर ह्या पामराला पण सांगा, कदाचित माझी माहिती चुकीची असु शकते…
अरे हा फोटो मनसे निर्माण होण्याआधी ते महाराष्ट्र दौरा मधे असताना ते कुठेतरी गेले असतानाचे (कदाचित बीड) ते आहेत त्यात निवडणूका किंवा कशाचेही राजकारण नाही, हे जे बोलायच्या आधी त्याची सर्व माहिती घ्या…जय महाराष्ट्र…!!
असेलही पण मागून सुद्धा स्पष्टीकरण दिला गेला नाही…असो