शाळा संपली, बारावी ढकलली 🙂 सगळयांचे मार्ग वेगळे झाले. कोणी शिकायला पुण्यात, कोकणात गेल. मी आपला मुंबई सोडायची नाही म्हणून इथेच राहिलो. चार-पाच वर्ष उलटली. मोबाइलची एवढी क्रेज़ नव्हती, म्हणजे मोबाइल वापरायचो पण फक्त घरगुती वापरासाठी आणि कॉलेजच्या फ्रेंड्सला माझी जरनल विसरू नकोस रे बाबा, माझी असाइनमेंट कोणाकडे आहे?, उद्या परीक्षा आहे लक्षात आहे ना 🙂 असे रिमाइंडर देण्यासाठीच वापरायचो. शाळेतले जास्त कोणीच कोणाच्या संपर्कात नव्हते. सगळे कसे आपापल्या जगात सुखी.
आमच्या शाळेच्या ग्रूपचा रियूनियन ह्या ओर्कुट मुळेच झाला तोच काय तो आमचा फायदा बाकी दुष्परिणाम सोडले तर. प्रत्येक गोष्टीचे साइड एफेक्ट्स असतातच, ओरकुतमुळे आपले मित्र सापडले पण आपल्या प्रोफाइलचे फोटोस, आपले स्क्रॅप, आपली पर्सनल माहिती जगजाहीर झाली. कोणीही कोणाच्या प्रोफाइल मध्ये डोकावू लागला, माहिती कॉपी करून ठेवू लागले. मग उगाच आपला वेळ त्या व्यक्तीला कोण काय काय विचारत, ती व्यक्ती त्याला कसा रिप्लाइ देते हे “मॉनिटर” करण्यात जाउ लागला. माझ्या एक मैत्रिणीचा किस्सा सांगतो, तिच्या ऑफीस पिकनिकचे रेन डान्स फोटोस एका टूकार फोरम लिस्ट वर पब्लिश केले गेले. न्यू आइटम गर्ल इन टाउन म्हणून…काय म्हणायाच याला? ओरकुतला मिळालेल्या यशाने तश्या साइट्सचा धडाकाच लागला. असा म्हणत नाही की वाईट आहे हे, पण सगळ्याना याची सवय होऊन बसली कारण ते एका मर्यादेपर्यंत राहायला हव होत, ह्याला मी पण अपवाद नव्हतो.
आपला ईमेल अड्रेस आपला राहिलाच नाही, त्यामुळे मला नाइलाजाने माझे मेल्स दुसर्या अकाउंट मध्ये ट्रान्स्फर करावे लागले. आता मराठी ब्लॉग्स.नेट वर मी एका ब्लॉगला कॉमेंट काय दिली त्या बलॉगर कडून फॉर्वर्डेड मेल्स चालू मला न विचारता, शेवटी तो आइडी ब्लॉक केला तेव्हा कुठे शांती मिळाली. सोशल नेटवर्किंग करा, माझा विरोध नाही त्याला मी पण करतो पण कोणाला न विचारता त्याच्या मनाविरुद्ध त्याचा ईमेल आइडी त्या वेब साइट वर सब्मिट करू नका. कारण तिथून पुढे होणारा त्रास त्या व्यक्तीला होणार आहे हे लक्षात असु द्या.
खरय बाबा… जाम पिड्तात हे लोक… मी डिलीट करून करून थकतो… 😦
बघ ना, मला पण जाम कंटाळा आलाय 😦
Hi..!!
Hope I can add you on Facebook..I like the writing. Simply great.!!
Thanks Deepti.
सुहास
कशाला इतका मनःस्ताप करुन घेताय. जाउ द्या. एखाद्याला खूप बरं वाटतं मेल्स फॉर्वर्ड करायला. मी अगदी खूप चांगला मेल असेल तरच फॉर्वर्ड करतो अन्यथा नाही. आणि फॉर्वर्ड करतांना खाली ब्लॉगची लिंक देत नाही कधिच 🙂
फेसबुक वर तर मी कित्येक दिवस झाले गेलो नाही. त्या शेतीने (फार्म व्हिले)पार वैताग आणला होता . रोजच्या कमित कमी ५० रिक्वेस्ट्स.. वैताग नुसता.
माफिया वॉर बराच खेळलो. नंतर तिकडे पण बोअर झालं. पोकर मधे ३ लाख डॉलर जिंकलो, पण फारच ऍडक्टिव्ह गेम आहे म्हणुन तो पण बंद केला.
एकंदरीच सगळ्यात सेफ म्हणजे ब्लॉग. आपलं एकदा टाइपलं की झालं!!!
अहो संताप होणारच, माझा पर्सनल आइडी जर मी कुठे सब्मिट करतो तर मला तिथून चक्क त्याच्या मित्रांच्या, मैत्रीणिंच्या फ्रेंड रिक्वेस्ट. डिनाइ केली तरी परत काही दिवसानी.
मी पण फक्त नावापुरताच राहणार ह्या वेबसाइट्स वर. हेरंब, अगदी बरोबर म्हणाला “गड्या आपला ब्लॉग बरा” 🙂
तुझ्या ऑर्कुट बद्दलच्या म्हणण्याशी तर १०१% सहमत. म्हणून मी कधीच कुठल्याच सोशल नेटवर्किंग साईटवर फोटोज टाकत नाही. सगळे scraps पण लगेच डिलीट करून टाकतो. मी माणूसघाणा नाही पण रोज नवीन सोने साईट निघते आणि तिला subscribe करत बसणं मलाही अजिबात आवडत नाही. त्यामुळे orkut, FB, twitter वर कमीच असतो. आणि अनोळखी लोकांना नो एन्ट्री. आणि या हजारो इन्व्हिटेशनसनी तर नुसता वैताग आणला आहे. काका म्हणतात तसं “गड्या आपला ब्लॉग बरा.”
हो यार, आता पण २१ मेल्स डीलिट केल्या आहे ह्या पोस्टच्या कॉम्मेंट वाचण्यापूर्वी…वैताग वैताग आलाय. पण आपले सगळे मित्र आहेत ह्या साइट्स वर म्हणून मी गप्प आहे. काय करू..तो मराठी ग्रूप बघशील तर स्वताचाच राग येतो. झक मारली आणि जॉइन केला 😦
एकदम खरं, फेसबुकच्या माफिया वार्स रिक्वेस्ट्सनी तर फेसच आणला होता.
ऑर्कुट, फेसबुक अगदी कामापुरतं उघडतो आज काल… ब्लॉगरवर मात्र बरेच दिवस झाले अडकलो आहे….
हो आपला सरळ, साध हे बलॉगर्सच जग मस्त 🙂
खरं सांगु का लोकांना स्वतःलाच कसं कळत नाही की आपण अशा प्रकारे दुसर्यांच्या personal space मध्ये जाऊ नये…उगाच चोंबडेपणा करायचा..मागे त्या ब्लॉग्जचे फ़ॉर्वड्स येत होते त्याने तर टाळकं सटकलेलं…आणि मग अजून कहर म्हणजे कुणीतरी म्हणे माफ़ीची पोस्ट लिहिली म्हणजे ती वाचायला यांच्या ब्लॉगवर जा….त्यापेक्षा आधीच जे काही मराठी भाषा दिनाचं प्रेम आलं होतं ते प्रत्येक ब्लॉगवर जाऊन वाटायचं ना?? असो…मीही माझ्या एका लेखात याचा उल्लेख केला होता..आणि ऑरकुटवर पण तेच…….
हो अपर्णा, कळतय मला. ह्या सोशल वेब साइट्स ने पर्सनल गोष्टी पब्लिकली करून त्या पर्सनल आहेत असा भासावतात. आणि ज्याला त्रास द्यायचा तो कसाही देतोच…
आजकाल तर ब्लॉगवर ही लिंक वाल्या स्पॅम कमेंटस खुप वाढल्या आहेत फ़ेसबुक इतक्या इन्व्हिटेशननी भरले आहे कि तिथे जावसच वाटत नाही.बाकी आधी काही ग्रुप जॉइन करायचो मि सुदधा चांगले बघुन पण नंतर त्यावरुन कुठल्याही विषयांच्या मेलचा मारा हौ लागल्यावर बंद केले…खरच खुप त्रास देतात हे लोक….
हो रे देवेन त्रास होतोच रे काय करणार 😦