सॉफ्टवेर इंडस्ट्रीमध्ये वाढलेल्या स्पर्धा आपण जाणतोच. त्यातच गूगल दादा आणि माइक्रोसॉफ्ट काका यांच तर हाडाच वैर, एकमेकांवर सरशी करण्यात दोघेही पटाईत. हल्लीच काकानी ऑफीस २०१० लॉंच केला. त्यानंतर काही महिन्यातच त्या ऑफीस २०१० मध्ये एक नवीन प्रॉडक्ट एड केला गेला. आजच ह्या प्रॉडक्टचा लॉंच वीडियो बघितला. विसिओ २०१० (VISIO 2010) फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रिलीस केला गेला हे जगभर. माइक्रोसॉफ्टने विसिओ ह्या कंपनीला टेक ओवर करून ह्या प्रॉडक्टच्या तांत्रिक फीचर्स मध्ये अमुलाग्र बदल घडवून स्वताच्या नावाखाली याची बाजारात घोषणा केली. (काका ह्या बाबतीत तर एकदम तरबेज:))
ग्राफिक इंटरफेसवर काम करणार्यांना हे सॉफ्टवेर खूप उपयोगी पडेल. विसिओ ऑटोकॅड, फोटॉशॉप आणि इतर २४ प्रकारच्या इमेज फॉर्मॅट सपोर्ट करतो. फ्लोचार्ट्स, टेबल्स, डेटाबेस इथे वापरात येणार्या स्टॅन्सिलस् हवे तसे एडिट करता येतात. ह्या मधील मला आवडलेला फीचर म्हणजे एखाद्या वेब साइटचा साइट मॅप, तुम्ही बघू शकता फक्त ती लिंक टाकून. त्यामध्ये तुम्हाला कळता पेजस कसे सेटप केले आहेत, कुठे पेज लिंक ब्रेक होतेय. सगळा सगळा एका क्लिक सरशी. ह्या गोष्टीसाठी नॉर्मली खूप डोकेफोडी करावी लागायची. नेटवर्क मॅप, ऑर्गनाइज़ेशन चार्ट्स, रिपोर्ट्स आणि खूप नवीन फीचर्स ह्यात काकानी सामावून घेतले आहेत. लवकरच दादांकडून याला प्रतुत्तर येणार आहे अशी बातमी आहे 🙂 एकूणच एक चांगल अप्लिकेशन रिलीस केलय काकानी
ह्याच बीटा सॉफ्टवेर इथून डाउनलोड करता येईल बघा वापरुन..
दादा आणि काकांच्या स्पर्धेत आपल्याला उत्तमोत्तम उत्पादने मिळत आहेत हे छान न्हवे का?
पोस्ट informative आहे….
हो नक्कीच..दोघांच भांडण तिसर्याला लाभ 🙂