खर बोलायच औषध – सच की दवाई


रविवार झोपण्यातच गेला, शनिवारी खूप काम झाल होत माहीत असेलच तुम्हाला. दुपारपर्यंत नुसता झोपून होतो. डोक ठणकत होत, अजूनही ठणकतच आहे म्हणा, पण प्रसन्न बोलला म्हणून जरा बाहेर पडलो कुठे तरी शांत ठिकाणी जावस वाटत होत. मग गेलो गोराईला जिथून एस्सेल वर्ल्डसाठी बोटी सुटतात. सध्या परीक्षेचा हंगाम असल्याने गर्दी खूपच कमी होती. आता ज्यानी गोराई बघितली असेल, तिला काळाईच म्हणाव लागेल, निर्माल्य, कचरा ह्या मुळे पूर्णपणे काळवंडून गेलय पाणी. मस्त हवा सुटली होती, गारवा जाणवत होता. सगळे घरी जात होते.

आम्ही म्हटलं जरा त्या जेटटी वर फेर्‍या मारुन जाउ घरी. तेवढ्यात, एक बाई आली आणि निर्माल्याची प्लास्टिकची पिशवी भिरकावून गेली खाडीत. लगेच मग दोन मुल आली त्यांनी मात्र पिशवीतल निर्माल्य काढून पाण्यात टाकल. त्याची एक पिशवी चुकून पडली पाण्यात तर त्याने मोठ्या मेहनतीने, वाकून बाहेर काढली. म्हटल चला अक्कल आहे ह्याला तरी. तो प्रसंग बघून मला महेंद्रजींची पोस्ट आठवली. मग आम्ही असच बोलत राहिलो कचरा, साफ-सफाई ह्या बाबतीत जागृती नाही मुंबईच्या लोकांमध्ये, किवा त्याना त्या कचर्‍यामध्ये राहायला आवडत असेल असा ठाम मत झाल, त्याला साक्षात गोराई खाडी साक्षीदार होती.

आमच्या गप्पा सुरुच, मग महागाई, सरकारचे चुकीच धोरण ह्या वरती बोलत राहिलो. खूप दंग झालो होतो. तेवढ्यात आमच्या लक्षात आल कोणी तरी उभ आहे खूप वेळ आमच्या मागे, दुर्लक्ष केलं आणि बोलत राहिलो म्हटला बोटीची वाट बघत असेल, पण बोट येऊन गेली तरी हा माणूस जागचा हलला नाही. मग तो स्वतः पुढे झाला बोलायला.

“You are right gentlemen; this Mumbai and country become a SHIT. Nobody cares what’s happening. Neither Government nor people. I was listing to your talks since last 10 minutes. Feels nice that at least some of you think this way.  I really appreciate that. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केल पण तुमच्या चर्चत भाग घेतोय न विचारताच”

मी प्रसन्न कडे बघितला. आम्हाला कळल होत, की ते गृहस्थ दारूच्या नशेत आहेत. बोला, काय बोलायच आहे तुम्हाला.

ते बोलू लागले – “काय बोलायच मी, पेश्याने शिक्षक पण आता रिपोर्टरचा काम करतो नवाकाळमध्ये गिरगावात. मी खूप फिरलो महाराष्ट्रभर गावा खेड्यात. लोकांची हालाकीची अवस्था लेखणीतून मांडली, आंदोलन केली भाजप मध्ये असताना, पण हे राजकारणी कोणीच कोणाचे नाहीत. शेतकर्‍याकडून ८-९ रुपये दारात धान्य विकत घेतात आणि आपल्याला ४०-५० रुपये भावाने विकतात. आणि वर आपल्यालाच सुनावतो तो पवार की “शेतकरी कमावतोय तर तुम्हा लोकांच काय जात”

अरे मा*****,साल्या तुला काय जात बोलायला शेतकरी कमावतोय, एकवेळ त्याना ३५-४० चा भाव दिला तर आम्हाला ते धान्य खरेदी करायला काहीच वाटल नसत, पण हे सगळे राजकारणी हरामाचा पैसा जमा करून शेतकरी आणि सामान्य माणसाचा छळ मांडतायत. एवढा टॅक्स घेता मुंबई आणि इतर शहरातून, पण सगळा रिता केला जातो त्या रोमन बाईच्या पुढे दिल्लीत. मुंबईचे रस्ते, स्वछता, पाणी हे दुय्यम विषय. कोणी कुठेही कचरा टाकतो, हगायला बसतो, थुकतो आणि म्हणे मी मुंबईकर. ही भय्या लोक खूप मेहनती हे मान्य करा, साला कुठल्याही कामाला नाही म्हणत नाही. आपण सॉफ्स्टीकेटेड लोक जी काम नाक मूरडून नाही सांगतो ती ही लोक पैशासाठी करतात, तर त्यांच काय चुकाल? तुम्हाला लाज वाटते आणि त्यांनी केल तर त्याना बाहेर काढता? मुंबईतले लोंढे थांबवु शकत नाही कोणी. कारण ही एक नीती आहे मराठी माणसाला संपवायच आहे. मराठी माणसाची शिवसेना फक्त बाळासाहेबांच्यामुळे अस्तित्वात आहे पण त्यांच्या नंतर…?(कानाला हाथ लावत) देव न करो असो होवो पण आता ठाकरे कुटुंबातला राज हाच काही करू शकतो. मी कोणा एका पक्षाला सपोर्ट नाही करत पण राज जरी चुकाला तर त्याला चपराक मारायला मी कमी नाही करणार, पण कॉंग्रेसच्या नीतीने मराठी महाराष्ट्राला खुप मागे आणलाय.

(आम्हाला काही बोलायची सोयच नाही, आम्ही फक्त मानेने मान्य आहे असाच सांगत होतो)

हे भडवे, #$%&%, &*^%$@# राजकारणी लोकानी नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात पीएचडी केलय. एवढा पैसा कमावून कोणाच्या मढयावर टाकणार कोण जाणे? मला जर कोणी बंदुक दिली ना सगळ्याना उडवून टाकेन भले मला मराव लागला तरी बेह्हतर. केवढा तो भ्रष्टाचार. साध उदाहरण घ्या, बेस्ट बस चा टिकीट, त्यावर नेहमी १५-२५ पैसे अधिभार..कोणी विचार केलाय कुठे जातो हा टॅक्स? आणि त्याची गरज ती काय. १९७६ पासून हा टॅक्स घेतात पण जातो कुठे तो? हे कुठे तरी कोपर्‍यांत शौचालाय बांधून देणार आणि मॉल बांधला ह्या थाटात प्रसिद्धी करणार? अक्कल आहे की नाही साल्याना? सगळे साले नुसता पैसा जमा करतायत, पण सामान्य माणसाच काय? खेडोपाडी एवढी वाईट अवस्था आहे काय सांगू तुम्हाला मुलानो..ते नक्षलवादी खुप चांगले आहेत शासनपेक्षा त्यानी केलेली लोकोपयोगी काम बघा. तुम्हा तरुण मुलानी आता खरच मोठ रान उडवलं पाहिजे, तेव्हा हे वठणीवर येतील सगळे.

माझ नाव सुमंत दिवाडकर, वय ६३ बायको गेली सोडून देवाघरी आणि मी एकटाच असाच जगतोय. गोराई गावात राहतो. कधी कधी थोडी दारू पितो. तुमच संभाषण कानी आलं आणि म्हटलं जरा बोलू तुमच्याशी. मी पूर्ण शुद्धीत आहे बरा, पण तुम्ही प्लीज़ कधी दारू नका पीऊ. कधी आलात तर या प्रेस वर गिरगावात, माझ नाव सांगा कोणालाही आमच्या ऑफीसमध्ये आणून सोडेल गिरगाव नाही तर संध्याकाळी चारकोपला संध्याकाळच्या प्रेस मध्ये. चला माझी बोट आली. परत भेटू”

त्यानी आमच्याशी हाथ मिळवला आणि माझ्या पायाला खाली वाकून हाथ लावला, मी मागे हटत म्हटला अहो हे काय करताय? ते काहीच नाही बोलले आणि बोटीत जाउन बसले.

दारूला सच की दवाई का म्हणतात ह्याचा प्रत्यय आला आज..कधी जे आपण शुद्धीत असताना नाही बोलू शकत ते दारू पिऊन बोलून जातो. त्यांच्या डोळ्यातला राग, संताप अजूनही तसाच डोळ्यासमोर येतोय..

—————- ही पोस्ट फक्त त्या दारूड्या मराठी माणसासाठीच

– सुझे

12 thoughts on “खर बोलायच औषध – सच की दवाई

  1. Atishay sunder…Zakaaas…Naadkhula….Kay bolu mi ya post vishayee?….Majja aali…majhi pan awastha ashich kahishi aahe….Anek vidarak satye ya post madhun tumhi baher aanli aahet…ya peksha chan dusara kahich asu shakat nahi!! I really appreciate your writings.

    1. धन्यवाद आशिष, कळतच नव्हता कस लिहु?
      तरी मी जमेल तेवढा सोप्प करून लिहलय. त्या माणसाची बोलायची लकब, अकसेंट तुफान. एवढ्या शिव्या, राग होता ना त्याच्या मनात काय सांगू. परत नक्की भेटायाच आहे मला त्याना. बघुया

  2. जाम पेटलेला दिसतोय माणूस हा. अशी व्यक्तिमत्व असतात ती शेवटी स्वतःच्या रागाच्य ज्वालांमधे स्वतःच पेटुन निघतात- शेवटी उरते ती केवळ राख!!

    मध्यमवर्गीय माणूस तुमच्या आमच्या सारखा, एवढंच करु शकतो. राग राग आणि राग!!

    1. काय म्हणाव आम्हा दोघांनाही कळत नव्हत. ते आले बोलून निघून गेले माझ्या पायाला हाथ लावून. शेवटपर्यंत आम्ही निशब्द

  3. बिचारा. खूप वाईट वाटलं रे वाचताना. पण दारूच्या नशेत किती महत्वाचं आणि खरं बोलून गेला तो !!

    1. वाईट तर वाटलच रे, पण काही बोलता पण येत नव्हता…खूप सत्यावचन बोलू गेले पण ते..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.