वन नाइट @ कॉल सेंटर


शनिवार, तारीख ६ मार्च

नेहमीप्रमाणे नाइट शिफ्ट साठी घरून निघालो, बस स्टॉप वर आलो तेव्हा कळल माझ मंगळसूत्र.. आय कार्ड हो विसरलोय 🙂 थोडा धावातच आलो घरी आणि घेऊन परत निघालो. बस नाही मिळाली खूप वेळ, मग रिक्षाच करावी लागली. एक तर वीकेंडला काम करायची सवय नाही. पण काय करणार अट्रेशन वाढल आहे ना खूप, त्यामुळे हो ओटी (ओवरटाइम) करावा लागतोय. त्यातच माझी अशी धावपळ झाली. कंटाळा आला होता एकदम. वाटत होता फोन करून सांगाव नाही येत पण..असो. स्टेशनला आलो, नेहमीची ट्रेन सुटली होती, म्हटला काय होताय हे आज श्याSSS … 😦

ट्रेनमध्ये सुद्धा बसायला जागा असून नाही बसलो, मूडच नव्हता. दरवाज्यातच उभा राहिलो, हवा खात. अंधेरीला उतरलो, चालत चकालाकडे निघालो. नेहमी सारखी पावल उचलतच नव्हती. नेहमीप्रमाणे गणपती मंदिरात जाउन बाप्पाच दर्शन घेऊन निघालो. ऑफीसला पोचलो. आरटीए पंच केला आणि पॉड वर डोक ठेऊन बसलो. आज एक तर सॅटर्डे एजेंट्स लॉगिन कमी. त्यामुळे काम थोडा जास्तच असणार होता. आणि मला सॉलिड कंटाळा आला होता. ६ दिवस काम करायची सवय नाही एवढी, त्यामुळे माझी शनिवारची साखरझोप, माझी बेडरूम, माझा मस्त बेड अस आठवत चहा घ्यायला उठलो, काहीसा चवताळत. चहा घेऊन आलो डेस्क, वर आउटेज चेक केल आणि हुस्सश् केला म्हटला चला आज क्लाइंटकडून तरी काही इश्यू नाहीत. देव पावला. लॉगिन केल. पहिली केस लगेच सॉल्व झाली, पण दुसर्‍या कस्टमर ने घाम आणला, डीएनस इश्यू होता, मी रिमोट लॉगिन केला पीसी, राउटर पण साला काहीच फॉल्ट सापडत नाही.

समोर असणारा फ्रँक (कस्टमर) हा सुद्धा टेकनीकली एवढा पर्फेक्ट होता की आम्ही दोघ डोक्याच्या शिरा ताणून ट्रबलशूट करत होतो प्रॉब्लेम. शेवटी तो कंटाळून म्हणाला जाउ दे नंतर बघू आणि निघून गेला. त्या नंतर अजुन दोन कस्टमर लागोपाठ तोच इश्यू घेऊन, डोक्यात धोक्याची घंटा वाजली साला आउटेज तर नाही ना..बघतो तर काहीच नाही तरी मी ऑन फ्लोर सूपरवाइज़रला सांगितला बाबा एकदा विचारून बघ. क्लाइंट पण म्हणाला अजुन तरी काही रिपोर्ट नाही, सो तुम्ही प्रत्येक गोष्ट चेक करा. (साला त्याच्या पप्पाच काय जातय सांगायला? कस्टमरला तर आम्हाला तोंड द्यायचा आहे) वैतागून आम्ही सगळ्या गोष्टी तपासू लागलो. काही क्षणात कस्टमर्सची रांग लागली म्हटल, चला मेलो आज काम करून, एक तर एजेंट्स कमी त्यात क्लाइंट काही अपडेटपण देत नाही. वारंवार विचारपूस केल्यावर शेवटी क्लाइंटने मान्य केला “Yes, there are some issues reported at Tampabay region from Brighthouse local servers. Those are failed to resolve IP’s for Google, MSN, gaming portals Etc. Kindly troubleshoot all the possible resolutions. All the best We will update you soon”. झाल चांगल्या शिव्या हासडून कस्टमर्सच्या तक्रारी ऐकून घेत समाजावत होतो त्याना. शेवटी कस्टमर्स ते, बडबड करणाराच, आमचा खूप नुकसान होतय ह्या प्रकारामुळे वगैरे वगैरे, अश्या गोष्टी बोलू लागले..शेवटी कस्टमर्स ऑल्वेज़ राइट म्हणून झालेल्या प्रकाराबद्दल नुकसान भरपाई पण करून देऊ असा प्रॉमिस पण करत होतो आम्ही.

ना कोणाला ब्रेक घेता येत होते, ना क्षणभर विश्रांती, काय करणार एखादा एजेंट जरी लॉग आउट झाला तर प्रोसेस सर्विस लेवलची वाट लागणार होती. हाथ नुसते कीबोर्ड्स वर टक टक होते आणि तोंड चालू. वैतागलो, चिडलो, फ्रस्टरेट झालो, रागावलो, शिव्या देतोय..सगळा मनातल्या मनात 😦 उगाच मॉनिटरच्या श्रीमुखात मारतोय, पॉड वर थाप मारतोय, डोक्याला हात लावून सगळा सगळ निमूटपणे करत होतो. कारण काही झाला तरी आपले इमोशन्स कस्टमर्स ना कळता कामा नयेत असा trained केला जात आम्हाला. जेवणसुद्धा धड नाही करता आल. मी पटापटा भेळ खाउन परत लॉगिन केला. हळू आवाजात गाणी चालू होती तोच काय तो विरंगुळा..

आने वाला पल, जाने वाला है..
जिने दो, जिने दो..Give me some SunShine give me some rain..
उफ तेरी अदा..
ताल से ताल मिला..
टिप टिप बरसा पानी…
वो लडकी है कहा..वगैरे

खूपच डोक दुखत होत, पण काय करणार सगळेच जीव तोडून काम करतायत त्यामुळे मागे हटण शक्यच नव्हत. सगळ्याना डेस्क वरच चहा, कॉफी, पाणी सर्व केला जात होता. गाणी गुणगुणत आणि कस्टमर्सच्या शिव्या झेलत काम चालू. नंतर ही बातमी लोकल पोर्टलस् वर पब्लिश केली गेली की बाबा तिथे आउटेज आहे सो हॅव पेशियेन्स. रात्री २ पर्यंत सलग काम झाल. मग कुठे आराम मिळाला. सगळे सॉलिड थकले होते.

मग मी आणि माझ्या टीम मॅनेजरने खायला मागवायच ठरवला. रात्री २:३० ला ऑफीसची गाडी घेऊन सदानंदकडे थडकलो ७५ वडापावची ऑर्डर दिली आणि मी एक गरमागरम फू फू करत तोंडात कोम्बला 🙂 एक गरम बूस्ट मारल् आणि म्हटला काही गोड घ्यावा मित्रांसाठी तर बघितला सदानंदकडे गरमागरम केशराचा शिरा होता. लगेच पार्सल घेतला करून आणि ऑफीसकडे धूम ठोकली. ३ वाजत आले होते, माझ लॉग आउट असता ३:३० चा म्हटला घाई करायला हवी मग टीम मॅनेजरच्याच पॉड वरच पिशवी उघडून वडापाव प्रत्येकाच्या पॉड वर नेऊन दिले एक एक टिशु घेऊन. आता राहिला शिरा, मग मी, केतन (आमचा Team Manager) आणि हॅपी (हप्पिन्देर शान्दिल) ह्यानी मिळून प्रत्येकाला त्यांच्या पॉड वर जाउन आsss करायला सांगून एक एक घास भरवत होतो 🙂 सगळे थोडा और दे, और दे करत आम्हाला फ्लोर वर इकडे तिकडे फिरवत होते. वातावरण कसा प्रसन्न झाला एकदम. मग मी पण खाउन, पॉड साफ करून, पाणी पिऊन गाडीकडे धावलो. जाताना ट्रान्सपोर्ट मॅनेजरला वडापाव आणि शिरा देऊन गेलो कारण तो आम्हाला नेहमी अशी गाडी देऊन मदत करत असतो. तो खुश, सगळे मित्र खुश, मी खुश. थोड् डोक दुखतय पण होईल ठीक. चित्रपटात होतो की माहीत नाही पण ह्या दिवसाचा शेवट एकदम गोड झाला 🙂

ता.क. –
चेतन भगतच्या पुस्तकातून वरील प्रसंग घेतलेला नाही. त्यामुळे चेतनने तसा दावा करू नये. वरील सगळी पात्र वास्तवात आहेत आणि जिवंत आहेत. चेतनच्या हेलो ह्या चित्रपटात दाखवलेल कॉल सेंटर आयुष्य किती खोट आहे हेच माझा सांगायचा उद्देश होता.

– सुझे 🙂

15 thoughts on “वन नाइट @ कॉल सेंटर

  1. Samina

    Hey Suhas,

    So I heard correct you turned writer huh..:p

    Tujhe to pata hai meri marathi itani acchi nahi, par fir bhi accha likha hai. My best wishes dear. I m now working @ Sital now. Miss you all friends in Stream. Give my regards to all..

    Byee

    1. Ohh..What a Surprise

      No re, what writer and all.
      Its Just like that. Thanks for commenting 🙂
      Do Mail me..Hope you have my email address. My Stream mail address is same..

      Take care…

  2. बापरे. कसला स्ट्रेसफुल जॉब आहे रे. भगतचं पुस्तक वाचलंय आणि चित्रपटही बघितलाय. तू म्हणतोस ते बरोबर आहे. त्यात सगळं गुडी गुडी दाखवलं आहे.

    1. हो यार…असो आने वाला पल जाने वाला है असाच म्हणत चालू द्यायच..हो की नाही? 🙂

  3. कसला वैताग असतो . मला पण सवय आहे कस्टमर्स झेलायची. तेच काम करतो मी पण..

  4. अरे सुहास, वरची कॉमेंट माझी ( महेंद्र)ची बरं का. सौ.च्या अकाउंट्ला लॉग इन असल्यामुळे असं झालं बघ.

    1. हो कळला काका, ह्या ब्लॉगचे फीड्स घेऊन ठेवले आहेतच मी रात्री. मस्त आहेत कविता. काकूना सांगा त्यांचा पंखा झालोय 🙂

      कस्टमर्स काय चालायच. सवय झालीय मलापण आणि तुम्हाला पण हे हे हे…

  5. sahajach

    अरे खरयं की प्रत्यक्षात हे काही वेगळच प्रकरण दिसतेय….. मी तर म्हणेन की अजुनही पोस्ट टाक या विषयावर म्हणजे आम्हाला खरे खुरे कॉल सेंटर समजेल…….
    बाकि वडापाव हा पदार्थ दिवसा-रात्री केव्हाही आवडतोच….

    1. हो नक्कीच प्रयत्‍न करेन तन्वी, बघू कसा जमतय.
      वडापाव बद्दल बोलशील तर कधीही, कुठेही. जी ललचाए राहा ना जाए 🙂 रात्री/पहाटे ३ वाजता गरमागरम खादाडी करायची संधी सोडत नाही म्हणा कधीच 🙂

  6. हे शॉन खरच जाम वैताग आहे यार कस्टमरला तोंड द्यायच …त्याबाबत आमच नशीब चांगल आहे… असो आने वाला पल जाने वाला है….

  7. शॉन सही झालीय पोस्ट…वडा-पाव माझाही फ़ेवरिट…माझी एक वड्यावर पोस्ट पण आहे कदाचित पाहिली असशील…:)
    आणि आता हा चेतन भगत वाचावा आणि पाहावाच लागेल….त्याचं (बद)नाव थ्री इडियट्स पासून ऐकतेय….
    बाकी मीही कस्टमर सपोर्टला काम केलंय आणि तेही आर बी आय क्लायंट…..आणि इथेही कन्सल्टिंग म्हणजे शेवटी ‘ग्राहक मेरा देवता’ टाइप नोकरी त्यामुळे तुझं दुःख कळतंय…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.