आज शिवजयंती.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना तमाम मराठा समाजाचा मानाचा मुजरा.

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी
नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा
आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी
धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले
देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे
कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा
– समर्थ रामदास
प्रौढप्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलवतंस,
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधीश्वर,
राजाधिराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय……….!
कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा….
किती मस्त वर्णन केलय ना?
me maratha boltoy… i am big fan of sivaji Raje ….. jai sivaji… jai bhavani….
माझ तर दैवत आहे हे. ब्लॉग वर स्वागत