आणि अजय पलेकर आलेच नाही..


गुरुवार, दिनांक ११, फेब्रुवार…

फ्लोअर वर जास्त काम नव्हता..नेहमीसारखा वेळेत आरटीए (Real Time Attendance) पंच करून माझ्या पॉड वर येऊन बसलो..मस्त लाउड म्यूज़िक चालू होत..कॅंटीनवाल्या राजूला सगळ्यांसाठी चहा आणायला सांगितला. मस्त गरमागरम वाफ़ळता चहा (संध्याकाळी ६ वाजता बर का? हे माझ लॉगिन टाइम) घेत आमचे अप्लिकेशन्स उघडू लागलो. मग इम्रान तुकडा चकली घेऊन आला, म्हणाला साला भूक लगी है, मग एकाने वेफर्स, मग चिवडा अशी खाद्य मेह्फील जमली.

तेवढ्यात आमचा सीनियर टीम मॅनेजर आला अबे #%^$#@,  अजय पलेकर आने वाला है साइट विज़िट पे. झालं हातचा घास तसाच टाकून आवाराआवर सुरू केली…(सॉरी शिव्या खूप देतो आम्ही फ्लोअर वर  so those are censored :))

आता अजय पलेकर कोण, अहो माझ्या कंपनीचे कंट्री मॅनेजर, आमच्या कंपनीच दोन वेगळ्या कंपनी टाय-अप झाल्यावर एक संयुक्त असा हा कंट्री मॅनेजर अमेरिकेतून आला आहे. टिपिकल मॅनेजमेंटवाला चेहरा, अंगात नेहमी ब्लेझर, मस्त ताडमाड उंची, शिस्त प्रिय असा हा माणूस. अडोबी  (Adobe) मध्ये असताना एकदाच अजयशी बोललो होतो. त्याननंतर अजय आम्हाला फक्त साइट ग्रूप ईमेल मधूनच भेटायचे.ह्या माणसाने बीपीओचा चेहरामोहरा बदलायच असा निश्चय केलाय की काय सांगू, सोमवार ते गुरुवार जीन्स न घालणे, चप्पल घालून यायला बंदी, डोक्यावरच्या टोप्या नाही, सिगरेट नाही, मोबाइल ही नाही (हो आम्हाला मोबाइल नाही नेता येत प्रॉडकक्षन फ्लोरवर) (No Pens for voice agents as they take online orders for Cx). असे निर्णय घेतले त्याने आल्याआल्या आणि नियम तोडणारा सरळ बडतर्फीला पात्र 🙂

तर मी कुठे होतो? हा साइट विज़िट. आमच्या सगळ्या डेस्क वरुन पेपर्स, बॉट्टेल्स, टी कप्स गायब पाच मिनिटात. मग अजय यायच्या आधी आमचा एसडीम (Service Delivery Manager) आनंद जानी राउंडवर आला, सगळे रिपोर्ट्स बघून आम्हाला ब्रीफ केल. न जाणो अजय ने काही प्रश्न विचारले आम्हाला तर. मग तो प्रत्येक पॉड वर जाउन मोबाइल आहे की नाही बघू लागला. कॅमरा नसलेला मोबाईल असेल, तर निदान बंद तरी असावा. कॅमरावाला मोबाइल तर ऑफीस आवरत आणू पण शकत नाही. इम्रानच्या डेस्कवर आल्या आल्या आनंद ओरडला, इश्यू हिम अ वॉर्निंग लेटर, सगळे बघत राहीले. त्याने गोल गळ्याचा टीशर्ट घातला होता, बिचारा फसला 🙂

सगळ तय्यार, फ्लोरवर सगळे लाइट चालू (आम्ही काही बंद ठेवायचो, झोप नीट लागावी म्हणून :P). न्यूज़ आली होती की बाजूच्या फ्लोरवर अजय आलाय आणि त्याने दोन एजेंट्सला घरी पाठवले कॅषुयल्स घातले होते वीकडेसमध्ये म्हणून, एकाला मेन गेट वरुन घरी पाठवला होता कारण तो सिगरेट पीत होता, म्हटल आज इम्रानला टाटा करावा लागणार. आम्ही सगळे आमच्या फ्लोअरच्या दरवाज्याकडे बघत कस्टमर्स अटेंड करत होतो. दोन तास झाले म्हटल, हा करतोय तरी काय? म्हणून आमचा टीम मॅनेजर बघायला गेला तिथे आणि आला दोन मिनिटात.

अबे, अजय चला गया २० मिनिट पेहले..हे हे हे

हवा टाइट करून गेला तो आमची ३ तास. इम्रानने अल्लाला शुक्रिया अदा केला आणि लगेच चहा, कॉफी और कुछ खाने के लिये लेके आ रे अशी ऑर्डर सोडली राजूला.

साला टेन्शन मैं भूक बहोत लगती है ना? सुहास तू कुछ खायेगा?  :):)

– सुझे 🙂

24 thoughts on “आणि अजय पलेकर आलेच नाही..

  1. नाही रे…माझी कसली ही हिंमत..तरी त्यांची टोपण नाव नाही लिहली पोस्ट मध्ये..हे हे हे

 1. बरं झालं लिहिलंस. लोकांना वाटतं बी.पी.ओ. वाले मजा करतात. उलट रात्रीच्या वेळी सुद्धा फॉर्मल घालून बसण्याच्या यातना काय असतात, ते तिथे काम करणा-यांनाच ठाऊक. पुन्हा नेटीव लॅन्गवेज मधे बोलायचं नाही वगैरे वगैरे. सर्वांना असं वाटतं की बी.पी.ओ.वाले मजबूत पगार घेतात, नेहमी गेम्स खेळतात आणि खातच असतात.

  1. हेच तर मत आहे अजूनही सगळ्यांच…इंडस्ट्रीच बदनाम झालीय आमची.
   पण खरच खूप मानसिक आणि शाररिक त्रास होतो काम करताना…. 😦

 2. एक अपडेट..आता अजय पलेकर कधीच येणार नाहीत..त्यानी तडकाफडकी राजीनामा दिला असे कळले…पण अन्दर की बात है..त्याना टर्मिनेट केलय आमच्या APAC च्या मॅनेजर ने 🙂

 3. Pingback: १०:१६ ची फास्ट लोकल « मन उधाण वार्‍याचे…

 4. मी वाचेपर्यंत तुमचे अजय पलेकर पलाले पन…:)
  मस्त लिहिलंय..एकदम फ़ुल टु टेंशन…..कामावर मोबाईल नाही म्हणजे कठिण आहे…

 5. Pingback: तुम्ही काय कराल? « मन उधाण वार्‍याचे…

 6. Pingback: १०:१६ ची फास्ट लोकल - मनाचिये गुंती गुंफियला शेला

Leave a Reply to हेरंब Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.