हो..केमिकल लोचा झालाय मुन्नाभाई सारखा. त्याचा तरी पॉज़िटिव होता पण माझा 😦
रोज मस्त माझ्या पूर्ण मित्र-मैत्रिणिना पहाटे पहाटेच (४:३०-५ लाच :)) एसएमएस करून मुद्दाम उठवणारा आणि सांगणारा की मी आता झोपायला जातोय तो सुहास..मग त्याच्या प्रेमळ शिव्या खाउन 🙂 त्याना परत झोपायला सांगणारा मी..आज एका एसएमसला सुद्धा रिप्लाइ देत नाही..
नाइट शिफ्ट करून आल्यावर आपली झोप विसरून सगळ्यांशी त्यांच्या ऑफिस अवर्स मध्ये मोकळेपणाने बोलत बसणारा तासांतास..आज चॅट वर login करत नाही..
ऑफीसमध्ये कूल माइंडेड म्हणून प्रसिद्ध असणारा शॉन आज कस्टमर्सवर पहिल्यांदा वैतागला..
घरी, ऑफीस, मित्र-मैत्रिणी उगाच मी स्वताला एकटा पाडून घ्यायचा अट्टहास चालू केलाय..
फ्रस्ट्रेशन आणि राग खूप लवकर येतोय….
पीसी वर कितीही वेळ बसू शकणारा आज २०-३० मिनीट्स मध्ये ब्लॉग्स अपडेट, वाचून आणि मेल्सला रिप्लाइ करून बंद करतोय..
त्यांच्या सुख-दु:खात मदतीला धावून जाणारा…आमच्या ग्रूप मध्ये सेंटर पॉइण्ट म्हणून फेमस असणारा..घरी सतत किचन मध्ये लूडबूड करून आईला मदत करणारा (याची भारी हौस मला :)).. कोणाला काही लागला की फक्ता एका फोन वर अरेंज करून देणारा (काही जण मला राजा माणूस किवा जीनी म्हणतात)…आयुष्यात पहिल्यांदा ट्रेकला नाही म्हणालो आज,,सगळे वैतागले माझ्यावर 😦
सगळे विचारतात काय झालाय तुला? तू तो सुहास नाहीस…
मलाही माहीत आहे ते, मी असा नव्हतो…… पण हे सगळा होताय माझ्या बरोबर हल्ली
काय कराव सुचत नाही…मन लागत नाही कशात.
का आपण असे वागतो मुद्दामून की आपल्या जवळच्या माणसाला त्रास होईल?
पण मी असा वागतोय, माझी चुक जाणवतेय मला पण मला ती सुधारावीशी वाटत नाही. सगळे त्यांच्या परीने तर्क-वितर्क लावून मोकळे होतायत कोणी म्हणे एटीट्यूड आलाय, कोणी म्हणे प्रेमात पडलाय, कोणी म्हणे नाइट शिफ्ट सोड तुला त्याचा त्रास होतोय त्याचा…
ही पोस्ट लिहाण्यामागे फक्ता एकच उद्देश आहे..मनात जे आहे ते सांगायचा प्रयत्न करतोय.. पण मीच सावरू शकत नाही आहे..कुठे तरी कमी पडतोय..सगळ्याना धीर देणारा मी आज……..नको नको जाउ देत
केमिकल लोचा झालाय सगळा..मला माफ करा मला तुम्हाला दुखावला मी..पण मी खरच असा नव्हतो यार…I am sorry
Aal izzzz not well 😦
19.212309
72.828347
Like this:
Like Loading...
Related
अरे काय झालं तरी काय पण? उगाच टेन्शन नको घेउस.. थंड गोळी घे.. अरे चिल पिल रे !!
घेतोय यार.. चिल पिल पण काल खरच राहावत नव्हता…I will surely try 🙂
सुहास,
अरे काय झालय मित्रा. असे निराश होणे बरोबर नाही. असे झाले तरी काय? अशी निराशा येते मानसाला. पण मग अशा वेळी मन मित्रांमधेच रमवायचे, नेट वर बसायचे. मी तेच करतो. मला सुध्दा अशी निराशा येते बर्याच वेळा. तेव्हा मी हेच करतो.अशाच निराशे मुळे मी पोस्ट लिहिणे थांबविले आहे. या निराशेतून बाहेर आल्यावर नव्या जोमाने सुरु करणार.
“DON’T WORRY BE HAPPY”
“DON’T WORRY BE HAPPY”
🙂 🙂 🙂 🙂 🙂 🙂
रविन्द्रजी, मी आता समजू शकतो खरच तुमची अवस्था…प्रयत्न मी करतोच आहे पण काल राहवाला नाही आणि वाटला माफी मागावी सगळ्यांची..
असं मलाही होतं कधीकधी…
वेगवेगळे खाण्याचे पदार्थ, घेत असाल तर पिण्याचेही पदार्थ… आणि झोप…
यामधल्या वेळेत वसंतरावांपासून ए. आर. रहमानपर्यंत सगळे रथी महारथी माझ्या दिमतीला असतात…
killing combo आहे…
बघा करून!
प्रयत्न तर चालू आहेतच…पिण्याच सोडून हा 🙂
Wake up Suhas…
Yes, Aparna trying to forget it like a bad dream but.. 😦
Mi Samaju Shakato….Karan Mi Pan yach stage madhun geloy …bt Khar Sagato Velich Savar…Nahi tar mazyasarkha houn basashil…..Savar Swatala an ho purvi sarkha….
हो यार…मला कुठे आवडता असा राहायला माझ्या जवळच्या माणसाना दुखावायला..पण कळत नाही रे काय होता 😦
सुहास,
कधी कधी काहीच करू नये अस वाटत. पण तू मनाच्या ह्या तात्पुरत्या अवस्थेला छान नाव दिलेस. ही सर्व केमिकल फोर्मूले लवकरच ठीक होतील. पोस्ट आवडली. जागा हो! जागा हो!!!!!!!
हो ग तायडे, प्रयत्न चालूच आहेत..
Pingback: सनडे स्पेशल – फरसाण - मनाचिये गुंती गुंफियला शेला