
आता रोमपुत्राने बिहार मध्ये केलेल्या मूर्खपणाच्या (मुद्दाम राजकीय हेतुपुर्व असलेल्या) वक्तव्यानंतर पूर्ण महाराष्ट्र आणि दिल्लीच राजकारण हादरून गेला, काय तर म्हणे “२६/११चे वेळी बिहार, उत्तर प्रदेशातील बहाद्दर एनएसजी कमांडोंनी मुंबई वाचवली” च्यायला याच्या ते कमांडों काय मुंबई वाचवायला आले होते की देशावरच संकट दूर करायला? त्याच कसला राजकारण करायाच? पण नाही बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसची लाट आणायचा विडा उचललाय ह्या माणसाने, मग तिथल्या लोकाना आवडणारी, दाद मिळवणारी भाषण करायचा अट्टहास कसा सोडेल आपला रोमी 🙂
तर हे साहेब भाषण ठोकून मोकळे झाले आणि इथे मुंबईत राजकारणात संतापाचा वणवा पेटला आणि का पेटू नये, त्या हल्ल्यात आपल्या मुंबई पोलीस डिपार्टमेंटचे जाबाझ ऑफिसर्स शहीद झाले. एनएसजी कमांडोंना यायला तर ४० तास लागले कारण मॅडमचा आदेश वेळेवर मिळाला नव्हता म्हणून..असो आता आपल्या रोमी एवढा शिकलेला सवरलेला महाराष्ट्राच्या वाटेला जायच्या आधी थोडा आभ्यास केला असता तर काय बिघडले असत पण नाही मला माझ्या पक्षाच्या वोट बॅंकला मजबूत करायचा होता ना..म्हणून बोललो बाबा ते, मस्त टाळ्या पडल्या असतील तिथे पण त्याला खरच कल्पना नाही त्याने उगाच वाघाच्या जबड्यात हात घातलाय.
मग आता शिवसेना आणि मनसे ह्या दोन्ही प्रमुख मराठी पक्ष पुढे सरसावले आणि त्याच्या विधानाचा तीव्र निषेध केला, आणि तो व्हायलाच हवा होता. देशहिताच्या गोष्टीत कशाला आणायाच राजकारण? मुंबईतील प्रांतवादा बद्दल काय माहीत आहे ह्याला? पण नाही उचलली जीभ आणि लावली…
एवढी मोठी संतापाची लाट उसळली तरी याला अजुन अक्कल आली नाही, एवढे ताशेरे ओढले गेले त्याच्या विधानावर तरी तो आपला त्याच गोष्टीवर ठाम आणि हाईट म्हणजे तो आज मुंबई भेटीवर येतोय. आता त्याला हे टाळता आला असता पण “खाज” असते ना स्वत:ला कट्टर राजकारणी असल्याची तीच पूर्ण करायला येतोय तो.
बाळासाहेबानी तर त्याच स्वागत करायचे आदेश दिलेच आहेत शिवसैनिकाना, मनसे सुद्धा सज्ज असेल त्याचा समाचार घेण्यासाठी आपल्या परीने..कॉंग्रेस आणि मित्रपक्ष नक्कीच ही भेट वीना विघ्न पार पाडू द्यायचा प्रयत्न करणार..
त्यामुळे आज राडा होणार…रोमी सांभाळ रे बाबा
रोमी… हा हा हा !! आणि सल्ला एकदम मस्त आहे.
धन्यवाद हेरंब, असच सुचला बघ हे नाव 🙂
गोची अशी आहे की आता पुन्हा हिंदी मिडीया मागे जळके लाकूड घातल्या सारखे बोंबलत सुटेल. राडे करुन फायदा होत नाहीए आपला.
१. सामनावर कारवाई करा म्हणतात मग हिंदी मिडियावर का नाही?
२. बाळा साहेबांचे पोस्टर जाळले मुरादाबाद मध्ये मग सेना व मनसे गप्प का?
३. मराठी माणसाला काय वाटते हे हिंदी माध्यमांनी कधी विचारले का?
४. टाईम्स ऑफ इंडियावरच्या कमेट्स मध्ये लोक गरळ ओकत आहेत त्याचे काय?
हो ह्या मीडीया बद्दल काही बोलायलाच नको…
माझा मित्र एका नावाजलेल्या हिंदी चॅनेल मध्ये नोकरी करतोय त्याला टॅक्सीच्या मुद्द्याच्या वेळी मुद्दाम अश्या प्रश्नाची यादी दिली गेली होती की त्यातून असाच अर्थ निघेल की मराठी येत नसल्याने त्यांच काही अडत नाही…
अश्या चॅनेल्सवर अबु आझमीचे, संजय निरुपमचे इंटरव्यूज परत परत काही दृष्या न कापता केली होती तीच राज ठाकरेच्या सभेचा हिंदी ट्रॅन्स्लेशन लिहून दाखवतात आवाज बंद करून. हिंदी टीवी मीडीया पूर्णपणे Biased आहे आणि त्याचा कारण त्यांच्यावर असलेला पोलिटिकल पार्टीसचा होल्ड
रोमी…..:)
bhaidas chya ithun tu ghari jatos mhanaje majha juna bhagubhai college chya aaspas tu rahatos evdha kalala..Sorry mala wishayantar navata karaycha pan Mumbai baher ahot tyamule Mumbaibaddal kahihi asal ki pahile weglyach aathwani yetat…
Ani kharay tujha mala watata media ani rajkarani (including marathi) Maharashtrasathi ani marathi lokansathi kahi karnar aahet asa ajibat nahi….sagale ek numberche …….jaude…
अपर्णा, मी राहायला कांदिवलीला. ऑफीसमधून मित्राला ड्रॉप करून घरी जात होतो 🙂
हो माहीत आहे सगळे एक नंबरचे %#%#$%%#*%# 😀
आपले मराठी नेते आणि खास क्रून मिडियावाले का नाही , आवरत या हिंदी-इंग्रजी चॅन्ल्स ना. ?
त्याचाच तर दु:ख आहे..ह्याना लगाम लावायला कोणीच नाही आजच्या घडीला. ज्या मराठी वृत्त वाहिन्या आहेत त्या अंतर्गत बाबी सोडवण्यात मश्गुल आहेत
रोमी! नाव छान दिलंय. मी कालपर्यंत हा काही सेन्सिबल बोलेल असं समजत होते. याने तर तारेच तोडले.
तेच आधी वाटला जरा टॅलेन्टेड, फ्रेश, युवा नेता बनेल हा..पण काय झालाच जे व्हायचा होता ते 😦
He…he…
PHUKAT SALLA mastach aahe ekdam….. 😀
Lay bharriii…..
धन्यवाद मैथिली..स्वागत माझ्या ब्लॉगवर 🙂
छान लिहिलंय
दोघांनीही एकत्र येउन काम करणं आवश्यक वाटतं मला.. आणि ते रोमी — वाह मस्त आहे नांव.. 🙂
थॅंक्स महेन्द्रजी…
Pingback: माय नेम ईज़ वाद… « मन उधाण वार्याचे…