आजकाल पैसा, प्रसिद्धी मिळवण्याचा शॉर्टकट म्हणजे Reality Shows on Small Screen (TV). इंडियन आइडल ह्या गान स्पर्धेतून मिळालेला अभिजीत सावंत आणि पब्लिसिटी माहीत असेलच आपल्याला. ती स्पर्धा संपली पण एक अश्या प्रोग्रॅम्स्ची लाट घेऊन आली भारतात की काय सांगू.

परदेशातील हिट ठरलेल्या असे काही कार्यक्रम आणि त्याच धर्तीवर भारतात ते हिट करून दाखवायचा प्रयत्न केला गेला इंडियन आइडलच्या यशानंतर. केबीसी तर खूपच प्रचंड लोकप्रिय झाला. ९ बज गये क्या? च्या नार्या वर भारत ९ वाजता कामधंदा सोडून टीवी समोर बसू लागला. मलाही तो कार्यक्रम खूप आवडतो. अमिताभच्या सादरीकरणाने तो एक माइलस्टोन ठरला छोट्या पडद्यावर.
त्यानंतर ही काही छान कार्यक्रम येऊन गेले पण हळू हळू त्यांचा दर्जा घसरू लागला आणि आता तर फार रसातळाला गेलाय. राखी सावंतच्या (खोट्या) लग्नाच्या देखाव्यानंतर आता “राहुल दुल्हनिया ले जाएगा” हा त्या कार्यक्रमाचा नवीन पर्व चालू होतोय आज पासून. कालच नाशिकला शिर्डीच्या इथे याचा पोस्टर बघितला हातात लग्न माळ घेऊन, हसत उभा हा XXXXXX. मनोमन प्रमोद्जी आठवले आणि तोंडातून पडणार्या शिव्या साइलेंट झाल्या. एक तर आधीच हा शो कुप्रसिद्ध राखी सावंत हिला घेऊन केला गेला होता. तिला कॅमरा समोर आला की तोंड उघडून काहीबाही बोलायची सवय, उगाच लाजून दाखवणा असे भयानक एपिसोड न्यूज़ चॅनेल्सच्या हेडलाइन्स मध्ये बघायला मिळाले. आपल्या न्यूज़ वाल्याना काडीची अक्कल नाही ते परत त्यानीच सिद्ध केला.
ह्या माणसाला उभाच कसा केला गेला? ज्याच लग्ना आधी एकदा मोडलाय बायकोला मारहाण केली म्हणून, जो ड्रग्स घेतो आणि अजुन काय नवाबी शौक असतील याचे कोण जाणे. काय अवस्था झाली असेल त्याच्या पहिल्या बायकोची? ज्याला आपण प्रेम केला, लग्न केला, तो आज परत थाटामाटात जगासमोर मुली शोधणार दुसर्या लग्नासाठी. दुख म्हणजे खूप मुली तयार पण झाल्या आहेत लग्नाच्या ह्या खेळासाठी…सगळ्याच कारण साला एक आणि एकच पैसा आणि फेम. कमी वेळात प्रसिद्ध होण्याची धडपड. त्यात चॅनेल्सची एकमेकांबरोबर चालू असलेली स्पर्धा. त्यात अश्या विक्शिप्त आणि विभत्स अश्या कार्यक्रमाची मेजवानी (????) आपल्या समोर मांडली जातेय. आश्चर्य म्हणजे ह्याना टीआरपी सुद्धा छान मिळतो आणि स्पॉन्सेर्स ही. न्यूज़ चॅनेल्स कडे कामधंदा नसल्याने ते ही आपल्या न्यूज़ च्या प्राइम स्लॉट मध्ये ३० मिनिट ह्या कार्यक्रमाच्या गुणगान गाण्यासाठी देतात.
हा एकच कार्यक्रम नाही “इस जंगल से मुझे बचाओ” “बिग बॉस” “पती पत्नि और वो” “पर्फेक्ट ब्राइड”असे मोठ्या चॅनेल्स वरील कार्यक्रम निव्वळ पैसा आणि त्यातील सहभागी कलाकारांच्या प्रसिद्धीची हाव ह्या दोन गोष्टीवर चालू आहेत. नशीब आपला टीवी सेंसॉर त्यातल्यात्यात चांगला आहे त्यामुळे सगळे उघडे-नागवे धंदे आपल्यापासून दूर आहेत. नाहीतर “इस जंगल से मुझे बचाओ” किवा “बिग बॉस” मधील सेन्सॉरेड दृष्या काय असु शकतील याची कल्पना करा. ज्या लोकाना कॅमरा समोर आंघोळ करण किवा त्यांच्या भाषेत म्हणतात ते टास्क (Task) कंप्लीट करणा असा बोलून त्यात काय वाईट आहे..असा प्रतीप्रश्ना करणारे. म्यूज़िक शो मध्ये चांगल्या चांगल्या गायकांची इज्जत काढणा वगेरे वगेरे….
आपण कितीही विरोध केला तरी निर्विवादपणे चालू असलेला ह्यांचा तमाशा असाच चालू राहणार…मला वाटत त्याना (काही) भारतीय मनाची पकड माहीत आहे जे असे तद्दन फालतू शो बघून इमोशनल होऊन एसएमएस ने वोट करतात, प्रचार करतात त्यांचा. चॅनेलवाले, सहभागी कलाकार हि लोक बक्कळ पैसे घेतील शो संपला की, मज्जा मारतील थोडे दिवस आणि अजुन एक सीज़न घेऊन आपल्या समोर हजर होतील.
असे ’वास्तवदर्शी (?)’ कार्यक्रम चालतात कारण त्या कार्यक्रमांना प्रेक्षकवर्ग आहे. दुस-याचं खाजगी आयुष्य, त्या व्यक्तीच्या नकळत जवळून पहाण्याची संधी ज्यांना दवडावीशी वाटत नाही, अशांसाठी हे कार्यक्रम असतात. कुणी सांगावं, उद्या राखी सावंत आणि राहूल महाजन यांच्या लग्नाचा बार उडवणारा कार्यक्रमही येईल. हल्ली एक कार्यक्रम माझ्या पहाण्यात आला – इमोशनल अत्याचार. आता ह्या कार्यक्रमात जे दाखवलं जातं, ते तरी खरं असतं की नाही कुणास ठाऊक?
हो ना, खाजगी गोष्टी मुद्दाम खाजगीत घडवून त्याच चित्रण दाखवला जात ह्या कार्यक्रमात. खूपश्या लोकाना अश्या गोष्टी जाणून घेण्याची आवड असते त्यामुळे अश्या शोचा एक खास वर्ग आहे. हेच एक कारण असु शकता फेसबुक आणि ओर्कुट ला प्रसिद्धी मिळवून देण्यात..
एकदम वास्तव दर्शी पोस्ट आहे. असे जळजळीत सत्य आहे हेच खरे आणि असे कार्यक्रम पाहणारे पण आहेतच की. मी जेंव्हा ह्या कार्यक्रमाच्या जाहिराती पाहत होते तेंव्हा असेच विचार माझ्या मनात आले होते. छान मांडलेत विचार आवडले
खूप संताप येतो अश्या कार्यक्रमाना मिळणारी लोकप्रियता बघून आणि ती दिवसेंदिवस वाढतच आहे ही त्याहून मोठी खंत..थोड्या वर्षानी नक्कीच हा नागवेपणा पब्लिकली होईल आणि त्यावर पण एसएमएस वोटिंग घेतील हे निर्लज्ज लोक…
आयला. हे असं काही चालू आहे? राखीच्या स्वयंवराबद्दल वाचलं होतं एका ब्लॉगवर. आता राहुल पण? खरंच प्रमोदजींचा आत्मा तळमळत असेल वर.
अरे हो ना, आधी फक्ता न्यूज़ मध्ये बघितला होता पण आता तो तमाशा प्रत्यक्षात घडतोय…किती विभत्स प्रकार आहे यार हा…
खरं आहे तुझं, पण आपण सुद्धा अश्या कार्यक्रमांबद्दलच जास्त लिहितो वाचतो नाही का ?
आजच्या काळातही ’गंगाधर टिपरे’. ’बोर्नविटा क्विज कॉन्टेस्ट’ सारखे चांगले कार्यक्रम असतातच की?, पण जास्त कुणी बघत नाही आणि आपण त्याबद्दल लिहितही नाही. अश्या कार्यक्रमांना नाव ठेवत, नाक मुरडत आपणच पाहतोत…सरळ अश्या कार्यक्रमांबद्दल लिहिणे टाळा, त्यांच्यासाठी तेच योग्य आहे.
हो काही नक्कीच छान शोज आहेत की पण यांच्या पैशाच्या भव्यतेपुढे त्यांचा निभाव राहत नाही..
हे असं काही चालू आहे?माणसं पाहातात कशी हा तर एक प्रश्नच आहे… तुम्ही मांडलेले सगळे मुद्देही पटतात….खरं तर रिऍलिटि शोचं जे पीक आलंय नं आपल्याकडे त्याला तोडच नाही…इतका वेळ आणि असल्या शोजसाठी एस एम एस करणारी लोक मला तर आश्चर्यच वाटतं….
हो करतात, भरभरून करतात. ह्या शोजच्या क्रियेटिव टीमला चांगलाच माहीत असत कुठल्या ऑडियेन्सला टार्गेट करायचा आणि ते तसा एक्सिक्यूट पण करतात. चीड येते असा काही बघितला की…