Month: February 2010
तेंडल्या लगे रहो..
सssssssचिन सssssssचिन

काय बोलू?
ह्या रन मशीनला सलाम आणि मनःपूर्वक शुभेच्छा…
१०:१६ ची फास्ट लोकल
सकाळचे १०:१५ बस मधून उतरलो आणि स्टेशनकडे तडक निघालो..उशीर झाला होता. ११ ला अंधेरी चकालाला पोचायच होत. स्टेशनच्या पायर्या चढून प्लॅटफॉर्मवर आलो आणि समोर नजर टाकली.
बाप रे..एवढी गर्दी (आता मला सकाळच्या ऑफीस अवर्सची गर्दी नवीनच, कारण नेहमी जगाच्या उलट्या दिशेने चालणारी आमची घड्याळ अशी गर्दी बघून अशी प्रतिक्रिया निघणारच) पूल चढू लागलो मनात म्हणायला लागलो घे अजुन INITIATIVE.
सगळ्यांत मोठ काम म्हणजे अट्रेशन (एजंटची गळती) रोखणे. मार्च-एप्रिल महिना परीक्षेचा हंगाम, त्यामुळे जे एजेंट्स स्टडीस सांभाळून जॉब करतायत किवा पुढील शिक्षणाचे निर्णय घेतात त्याना नाईलाजाने जॉब सोडावा तरी लागतो किवा लांबलचक सुट्टी लागते अभ्यास करायला. मग त्याना एक फिक्स शिफ्ट देऊन फिक्स वीकेंड्स ऑफ अश्या ऑफर्स दिल्या जातात. पण तरी फ्लोर वर होणारा मानसिक ताण कोणाला चुकलाय?
त्यामुळे Servers रिसेट होण्याच्यावेळी, मला फ्लोरच्या एजेंट्सचा डेटा मॅनेज करून फ्लोर सपोर्ट द्यावा लागतोय सकाळी..त्यामुळे झोपेचे तीन तेरा वाजलेत..
स्वत:ला शिव्या देत, प्लॅटफॉर्म २ वर आलो, लगोलग १०:१६ ची ट्रेन येतेय अशी घोषणा झाली, पाय उचलतच नव्हते, विचार आला, जाऊया रिक्क्षाने, पण १५० रुपयाला फोडणी नको म्हणून त्या विशाल जनसागरात अशांत उभा होतो. वाटल होता आता काय २-३ ट्रेन्स सोडाव्या लागतील. तेवढ्यात ट्रेन आली, मी सरसावलो, अपेक्षा नव्हती पण मला लोकांनी चढवलं धक्का-बुक्की करत 🙂

आत एका कोपर्यात टिपिकल गुजराती ग्रूप बॅग वर पत्ते खेळत खाकरा खात होते आणि मोठमोठ्याने हसत, शिव्या देत मग्न होता. माझ्या बाजूलाच एक कपल (आयला एवढ्या गर्दीत काय ती हौस मूलीना पुरुषांच्या डब्यात शिरायची?) हॅंडल्सच्या इथे बुक्स ठेवून वाचायाचा प्रयत्न करत होती, त्यांच्या संभाषणावरून कळला १२वी चे विद्यार्थी होते आणि मराठीचा अभ्यास करत होते. बाजूलाच एक महाशय मोठ्याने मोबाइल वर गझल (चढता सूरज धीरे धीरे..) ऐकवत होते सगळ्याना. दोन भैईया बँबई मे कितनी भीड बढ गयी है ह्या गहन मुद्द्यावर चर्चा करत होते. कोणाची क्रिकेटची चर्चा, कोण आपल्या प्रेयसीशी गप्पा मारतोय, कोणी स्टॉक मार्केटचे अपडेट्स घेतोय. कोणी शांत घामाच्या धारा पूसत शांत उभे आहेत. मी आपला बॅग सांभाळत एका विचित्र पोज़ मध्ये उभा होतो. एकाच हॅंडल मध्ये ५-६ हात, त्यात स्वताला उभा राहायला जागा करत होतो.
आअअआ…..हा काही नाही जांभई देतोय, झोप आलीय… 🙂
– सुझे