कालच दिल्लीत मागील वर्षाच्या उत्तम चित्रपटांचा गौरव “राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार” देऊन केला गेला आणि त्यात वर्चस्व राहिला ते मराठी चित्रपट सृष्टीचा.
उपेन्द्र लिमये ह्याने साकारलेला जोगत्या हा त्याला या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गेला. त्याखेरीज सवोर्त्कृष्ट सामाजिक चित्रपट (जोगवा), सर्वोत्कृष्ट संगीतकार अजय-अतुल(जोगवा), गायक हरिहरन- जीव रंगला (जोगवा), गायिका श्रेया घोषाल (जोगवा) , अपेक्षित अश्या “हरिश्चंद्रच्या फॅक्टरीला” मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला असून ‘विठ्ठल’मधील बाल कलाकाराच्या भूमिकेसाठी मराठी बाल कलावंत अनिकेत रुमाडेला विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच “गंध” साठी सचिन कुंडलकरला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून याच चित्रपटातील प्रमोद जे. थॉमस यांची ऑडिओग्राफी सवरेत्कृष्ट ठरली.
खूप खूप अभिनंदन..तुम्ही केलेल्या कष्टाचा चीज झालाय..असेच प्रगती करत राहा. मराठी चित्रपट सृष्टीत नव्या दमाच्या ह्या पिढीचा जोर असाच उत्तरोतर वाढु देत हीच सद्दीच्छा..
एक विनंती – सगळ्यानी मराठी चित्रपट चित्रपटगृहाताच पाहावेत…कलेला प्रोत्साहन द्या. खूप छान चित्रपट येऊ घातलेत. असे नवीन नवीन आणि धाडसी प्रयोग आपल्याकडे होत आहेत त्याच खूप कौतुक करा. Please Please …