शीर्षक बघून हडबडून जाउ नका, दादासाहेब फाळके यांच्या पहिल्या कलाकृतीच्या बॅक स्टेज स्टोरी “हरिश्चंद्रची फॅक्टरी मुळे” आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसा ख्रिस्त पडद्यावर दिसतो तसे राम-कृष्ण पडद्यावर दाखवता येतील का या विचाराने झपाटलेला हा माणूस “मोशन पिक्चर्स” अर्थात “हलत्या चित्रांचा” निर्मितीत उतरायचा निर्धार करतो.
मग त्यासाठी परदेशवारी, बायकोचे दागिने गहाण ठेवून, घरातले समान विकून पैसे जमवणा, अश्या अनेक अडचणीचा सामना खंबीरपणे केला. लोकांच्या दृष्टीत आधी हा माणूस वेडा होता, पण पहा कमाल त्या वेड्याची. आज पूर्ण चित्रपट सृष्टी ज्याला सलाम करते. अश्या ह्या मोशन पिक्चर्सच्या वेडाने झपाटलेल्या डी डी फाळके ह्यांची पहिली कलाकृती किती अडचणीचा सामना पार करून पूर्ण झाली आणि जगभर गाजली, त्याची कथा जरूर पहा “हरिश्चंद्रची फॅक्टरी” या आठवड्यात आपल्या जवळच्या चित्रपटगृहात आणि हो एक सांगायचा राहिला हा चित्रपट भारताची ओफ्फिसियल एंट्री पण आहे ऑस्करला.
माझ्या खूप शुभेच्छा
केव्हांची वाट पाहतोय या सिनेमाची.
दादासाहेब फाळके यांचे शतश: आभार!
हो..मी पण खूप आतुरतेने वाट बघतोय 🙂
एकदा तरी खऱ्या खु़र्या भारतिय सिनेमाला मिळु दे ऑस्कर.. शुभेच्छा..
खरच अवर्णीय असेल तो क्षण 🙂
मलाही पाहायचा आहे हा सिनेमा.
ऑस्करसाठी शुभेच्छा या सिनेमाला…
देवेंद्र, प्रतिक्रियेबद्द्ल आभार..फॅक्टरी चे प्रोमोस खूपच मस्त आहेत आणि सिनेमा सुद्धा मस्तच असेल 🙂
ऑस्करः’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ बाहेर :(:(
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5483429.cms