माझा लॅपटॉप अप्लिकेशन एरर देतोय..
अरे माझा फोन बिल अजुन क्रेडिट झाला नाही माझ्या अकाउंट मध्ये…
माझी ऑर्डर कुठेय..?
माझ इंटरनेट का बंद आहे?
तुमच्याकडे हे अपग्रेड आहे का कस्टमरसाठी?
Thank you..you help me alot..you made my day
What the xxxk. this is the way you provide the services..I want to speak to your manager…blah blah 😀

अहो काही नाही आमच्या रोजच्या ऑफीस व्यवहारात कानावर पडणारी काही वाक्य. शेवटी आम्ही कस्टमर सर्विस वाले..सर्वसाधारण पणे ओळखले जातो कॉल सेंटर, CSR, कस्टमर सपोर्ट, हेल्प डेस्क किवा कॉंटॅक्ट सेंटर या नावाने. नाव तर भरपूर आहेत आणि अजुन नावही ठेवली जातात 😀
कुठल्याही इंडस्ट्री मध्ये असो, कस्टमर सर्विस हा एक अविभज्या घटक आहे. एकदा एका कंपनीचा प्रॉडक्ट बाहेर पडल, किवा एखादी सर्विस जर ते ऑफर करत असतील तर ते असे स्वतंत्र विभाग बनवतात. कस्टमर्सच्या प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, त्याना त्या प्रॉडक्ट बद्दल काही जाणून घ्यायचा असेल किवा अजुन काही काही मदत लागत असेल तर त्यासाठी आम्ही 🙂
तसा काही..सॉरी काही नाही बर्याचश्या पालक आणि मुलांच्या मनात ही इंडस्ट्री एवढी बदनाम आहे की काय सांगू, ह्या गोष्टीला माझा परिवार देखील अपवाद नाही. जेव्हा मी ह्या कंपनीचा ऑफर लेटर घेतला काय सांगू माझ्या घरी काय अवस्था झाली. अजूनही वाद होतात, नाही असा नाही पण आता सवय झालीय म्हणा मला अजुन काय? काही लोकांसाठी कॉल सेंटर म्हणजे समर जॉब्स, किवा कुठे जॉब मिळत नाही तो पर्यंत हौस मौज करायची म्हणून हे. त्यांच्या मते इथले लोक म्हणे चांगली नसतात, म्हणजे तश्या अर्थी नाही, नुसत्या पार्टी, पैशाची कदर नसलेले, लॉंग टाइम करीअर कॉल सेंटर मध्ये ह्या..काही काय. ३ वर्ष झाली मला इथे काम करून (still going on 🙂 ), माझ पण आधी असाच मत होत की कुठे जॉब लागत नाही म्हणून चला करून बघू, त्यावेळी खूप निराश झालो होतो मी पण काही होत नव्हता जॉबचा. खूप घाबरलो होतो पहिल्या इंडक्शन डेला. माहीत नव्हता मी पुढे काही करू शकेन की नाही.
Introduction आटपला, ब्रेक मध्ये कॅंटीन मध्ये गेलो. सगळ्याना सक्त तकित होती फ्लोर वर फक्ता इंग्लीश आणि फक्ता इंग्लीशच. खूप ओकवर्ड वाटत होता काय होईल काय नाही..पण जसा कॅंटीन मधल्या ग्रूप ला जॉइन केला तसा आपला नॉर्मल क्राउड लेका, मेल्या, साले आणि इतर नॉर्मल (?) शब्दासंपदा कानावर आली जी मी इथे लिहु शकत नाही 🙂 हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, गुजराती आणि भैईया पण, सगळे सण आपले आणि अमेरिकेचे सेलेब्रेट केलेत..खूप रमलोय इथे, नाइट शिफ्ट मी आयुष्यात पहिल्यांदाच करत असल्याने पहिला आठवडा एवढा वाईट गेला की काय सांगू. खूप त्रास झाला होता अड्जस्ट करताना. पण आता कुठलीही शिफ्ट करताना त्रास होत नाही, म्हणाल दगड झालोय अगदी..
असो, इथला क्राउड पण Ambitious असतो जसा सॉफ्टवेरवाले आपला टार्गेट मोठमोठ्या कंपनी ठेवतात तसा इथेही..Professionalism किवा कडक Rules ईतर नॉर्मल ऑफीसपेक्षा खूपच कडक mind you. मिनिटा-मिनिटाचा हिशोब धरतात इथे. काही करा पण कस्टमर आपल्याला सी-सॅट (Customer Satisfaction point) देऊन गेलाच पहिजे, एखादी केस हॅंडल करताना एएचटी (Avarage Handle Time) आणि Number of cases resolved per day. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या पर्फॉर्मेन्स इन्सेंटिव मध्ये असतात. मग सगळ्याची धावपळ ही टार्गेट्स achieve करण्यासाठी. एक स्पर्धा सुरू असते त्या फ्लोरवर..
Now I am professional 🙂 मग कुठलाही कठीण कॉल असो, irrate कस्टमर. शॉन (हे माझ टोपण नाव कस्टमर्ससाठी) रिसॉल्व करेल रे क्वेरी, ट्रान्स्फर कर त्याला ती केस. दिवसामागून दिवस आणि वर्षा मागून वर्ष गेली. अजूनही काही मुला-मुली समर जॉब किवा टाइमपास जॉब म्हणून इथे येतात आणि जातात . मग ते MBA असो किवा बीई किवा बीएससी किवा शिकणारेसुद्धा. असो शॉनच्या टीम मध्ये खूप आले आणि गेले. पण शॉन अजूनही आपल्या कामात हरवून गेलेला.
क्लाइंट बदलले, रूल्स बदलले, घरातले वाद वाढले पण स्पिरिट अजूनही तेच Thank you for choosing Adobe, How may I assist you today?
एकदम छान लिहिलंय.. आवडलं.
प्रतिक्रियेबद्दल आभार, हेरंब
छान लिहिले आहे…
थॅंक्स अ लॉट 🙂
gharachyanchya aani itaranchya hi vadala aani cal center career kade timepass job ya drushtikonatun baghanarya najaranna davalun aaj 3 varsh ya industrimadhe rahun grow karun dakhavanyacha tujha nirdhar vakhanya joga aahe…..
man udhan varyache he naav sarth aahe Shaun…
Thanks a lot dear..
अरे खुपच खुमासदार झालाय लेख.. शॉन.. एकदम बेस्ट.. हार्ट वॉर्मिंग.. गेले काही दिवस नेट वर कमीच आहे.. म्हणुन राहुन गेलं वाचायचं.. 🙂
धन्यवाद महेद्रजी
शॉन भारी लिहलय…
’three years @ the call center’ अस एखाद पुस्तक लिहुन टाक आता…
पुस्तक नको रे बाबा..आपला ब्लॉगच बरा यार..इथेच शेअर करीन काही अनुभव 🙂
शॉन 🙂 असे बरेच माइक, जिल नाहीतर कॅरेन भेटतात फ़ोनवर जेव्हा आम्ही क्रेडिट कार्डसाठी नाहीतर एअरलाइन रिजर्व्हेशन इ. साठी अमेरिकेतून फ़ोन करतो…कितीही ऍक्सेंटमधले बोलत असले तरी कळतं आपलाच माणूस आहे आणि मग काही सवलतीही मिळतात…ही ही….छान लिहिलंस….
थॅंक्स अपर्णा, खूप लोकांमध्ये कॉंटॅक्ट सेंटर्सचा जॉब म्हणजे कुठे जॉब मिळत नसेल तर टाइमपास जॉब म्हणून ह्या इंडस्ट्रीकडे बघितला जात. ह्याला माझ घर सुद्धा अपवाद नाही 😦
कुठलंही काम हे शेवटी काम असतं हा concept आपल्याइथे कधी येणार देव जाणे…..
देवाक माहीत 😦
Pingback: तुम्ही काय कराल? « मन उधाण वार्याचे…
कुठलंही काम हे शेवटी काम असतं हा concept आपल्याइथे कधी येणार देव जाणे…..
aprna ch patale hey…
lhileys jhak 🙂