टाइम्स ऑफ इंडियाने हा उपक्रम हाती घेतलाय नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून. १ जानेवारीला जेव्हा पेपरचा फ्रंट पेज बघितला तर ह्यांची फुल्ल पेज जाहिरात बघितली. तसे टाइम्सचे सगळेच उपक्रम काबिले तारीफ असतात. त्यांच्या ह्या प्रॉजेक्टचा प्रमोशन पण दणक्यात चालू आहे. आज त्याचा पहिला कार्यक्रम आहे बान्द्राला. कलेच्या माध्यमातून, खेळाच्या माध्यमातून आपण खूप प्रयतना केला आणि आताही करतोय. कोणाला नकोय अमन ह्या देशांमध्ये

मला त्यांच्या ह्या प्रॉजेक्टचा खूप कौतुक आहे पण आशावाद शून्य आहे (सॉरी पण माझ असाच मत आहे). भारताने खूप वेळा नमत घेऊन (एवढ्या टेररिस्ट आक्टिविटीस नंतर सुद्धा) अमन करायचा प्रयतना केला होता आधी. मग आपल्याला कारगिल मिळाला ते सुद्धा मुशरफच्या आग्रा शांतता भेटी नंतर, खूप हल्ले पचवले आणि परत उभे राहिलो पुरावे आणि लिस्ट घेऊन (जशी आपण किरण्यावल्याकडे जातो तसे) हे आतंकवादी आम्हाला द्या, ह्यानीच हल्ले केलेत. त्यावर पाक, हो काय, बघू ते पुरावे काय हो, किती कमी पुरावे हे, ह्यावर कोणाला अटक नाही करता येणार. ट्राइ अगेन..Bull Shit..संताप होतो अगदी
तसा ह्या मुद्द्याला हाथ घालायची माझी एवढी लायकी नाही. पण आज टाइम्स मध्ये कार्यक्रमाची अमन की आशा जाहिरात बघितली आणि मटा मध्ये “विशेष” भारत-पाक युद्धाच्या दिशेने आणि त्यात परस्पर सैनिक आणि आण्विक युद्ध्याच बलाबल दिला होता. आता हसू की रडू झाला, त्यात सांगितला की कधी युद्धा झाला तर पाकिस्तानच पहिला वापर करेल न्यूक्लियर बॉम्बचा. आता काय बोलायच आपण ह्यावर?
माझा अजिबात विरोध नाही ह्या प्रोजेक्टला..So don’t misunderstand me. बॉर्डर पलीकडे सुद्धा आपल्या सारखेच लोक आहेत, तशीच शहर.
पण एक छोटी माफक अपेक्षा आहे की प्रयतना जर दोन्ही बाजूने झाले तरच ही आशा आशावाद आहे, नाही तर हा पण फक्ता एक धुरळा राहील काही दिवसानी शांत होणारा. असा खरच होऊ नये आणि दोन्ही देशात शांतता नांदू दे रे देवा..
वेब लिंक – http://timesofindia.indiatimes.com/amankiasha.cms
मला भावलेला एक टीवी कमर्षियल –
टाइम्स ऑफ इंडिया चे दर वर्षीच हे स्पॉन्सर केलेलं इव्हेंट असतं.. आता जाहिरात होते म्हणुन की, सोशल कमिटमेंट म्हणुन..जे काय असेल ते असो, पण चांगला उपक्रम आहे.
मला हे याच वर्षी माहितीत आला..असो काही चांगलाच होईल अशी आशा करूया
दोन्ही बाजूनी अमन साठी प्रयत्न व्हायला हवेत. उपक्रम स्तुत्य आहे.
हां…दोन्ही बाजूने ते जास्त महत्वाचा आहे 🙂