ईडियट Media


काय लिहाव सुचत नाही, पण गेले काही दिवस गाजलेला (?) विषय, रवींद्र काकांनी तर त्या विषयाला धरून क्लासचं सुरू केलाय, पण माझा विषय फक्त तो नाही. गेले १२-१३ दिवस महाराष्ट्रात खूप आत्महत्या झाल्या. प्रसारमाध्यमानी खूप उचलून धरलं हे प्रकरण. कोणी वाटेल ते निष्कर्ष काढले. कोणी ३-ईडियट्सला कारण मानलं, तर कोणी आजच्या शिक्षणपद्धतीला….पण एक सांगतो हे आत्महत्येचे हे प्रमाण नॉर्मल आहे. तुम्हाला धक्का बसेल, पण परीक्षेच्या काळात दबावाखाली किवा टेन्शनमध्ये ह्या गोष्टी नेहमीच होतात. आता फक्त त्या गोष्टी मिडियासमोर मांडतेय, म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कळतायत. स्पर्धा आणि आणि यश मिळवण्यासाठी असणारा दबाव काय फक्त ह्याच वर्षी नाही वाढला..तो दरवर्षी असतोच !!

ह्या वेळी न्यूज़ चॅनेल्सला आयतं कोलित मिळालं मग ते ३-ईडियट्स असो किंवा सरकारला कोंडीत पकडायला बाकी काही मुद्दे नव्हते म्हणून. त्यावर ग्रेट आपलं सरकार, लगेच आयोग स्थापन करून अहवाल घेतो असं सांगितलं.

आजकाल टीवी मिडिया फक्त फायद्याचे गणित बघून चॅनेल्स चालवतात असं दिसतंय. एका न्यूज़ चॅनेलवर मुलांच्या आत्महतेचा काउंटर लावला होता, म्हणे दिन नौवा आज क्या होगा? च्यायला हे असे पत्रकारिता करणार तर झालं कल्याण..

खुप मुद्दे देता येतील..स्वाईन फ्लू, टेरर अटॅक्स, बॉलीवुड गॉसिप्स, कुठला मुलगा बोअर वेल मध्ये ३५-४५ तास अडकून पडला  होता Etc Etc…

गोष्टीना अवास्तव महत्व देऊन त्या गोष्टी अक्षरशः थोपवल्या आहेत प्रेक्षकांवर. ह्या आत्महतेच्या बातम्या टीवी वर बघून सारख्या सारख्या कुठले पालक मुलाला पालकॅंसारखे रागाऊ शकतील? त्यांच्या मनात एक टांगती तलवार असेल आपण ओरडलो आणि ह्याने/हिने काही जीवाचा बरं-वाईट केलं तर? मुलांना पण आत्महत्येला प्रवृत्त केल्यासारखं नसेल का, ते जर त्याना एखादी गोष्ट जमत नसेल तर? ते त्याबद्दल बोलणं टाळतील पालकांशी. त्याना वाटेल आत्महत्या हाच एक पर्याय आहे आणि ह्यामुळे पालक आणि मुलांमध्ये संवांद कमी होऊन, दरी वाढत जाईल आणि अश्या दुर्दैवी घटना पण…

हे थांबवायला हवं. माझी नम्र विनंती सगळ्या टीवी मिडियाला..तुमच्याकडे सगळ्यात आधुनिक आणि तत्पर असे माध्यम आहे..प्लीज़ काळजी घ्या आणि ही फालतूगिरी  थांबवा.

24 thoughts on “ईडियट Media

 1. Abhijit

  बरोबर म्हणताय तुम्ही, मिडिया ने ही वट्वट बंद केली तर आत्महत्या कमी होतील. सारखा सारखा हा विषय चघळल्याने ज्याच्या डोक्यात नाही तो पण आत्महत्येचा विचार करायला लागेल.

  1. अभिजीत, धन्यवाद उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि प्लीज़ मला अहो जाहो नको सुहास, लेक्या, अरे, तुरे किवा आणखी काही चालेल 😀

 2. खरचं कुठल्याही प्रकारची मीडीया हे अतिशय शक्तिशाली माध्यमं आहे पण दुर्दैवाने आज ही सारी शक्ति दळभद्रि कामांसाठी खर्च होते आहे.

 3. सुहास, अगदी बरोबर बोललात. किंबहुना स्वाईन फ्लू च्या वेळी पण लोकांना हे माहित नव्हतं कि नॉर्मल फ्लूने जास्त माणसं मारतात स्वाईन फ्लू पेक्षाही. काय करणार. मिडिया, मोठी कॉर्पोरेट हाउसेस आणि सरकार सगळेच एकमेकांना सामील.

  1. हो बघ ना, स्वाईंन फ्लू च्या वेळी तर एवढा गोंधळ घातला होता ह्यानी..नशीब आता ते प्रकरण तरी शांत झालाय. प्रतिक्रियेबद्दल आभार

 4. आनंद पत्रे

  १००% सहमत!
  मिडीया विषयी काहीही लिहिण्याजोगं राहीलेले नाही, मी न्युज पाहणं बंद केलं आहे अश्यात!

  1. मीडीया हा लोकशाहीचा एक आधारस्तंभ आहे, पण तो एक प्रकारचा व्यवसाय झालाय आणि निर्भीड पत्रकारिता करणारे दुर्लक्षित होतात..

 5. vijaydeshmukh

  मला खूप असं नाही पटलं. तसा मिडियाचा तो धंदाच आहे, पण सरकारही मूर्ख बनाव ? बाकी या निमित्त्याने का होईना पालक विद्यार्थ्यांशी बोलतील तर. तसही भारतीय जनतेला एकदा सांगुन कळत नाही, त्यासाठी भडीमारच हवा…. 😦

  1. करा भडिमार नक्कीच करा पण विषयाचा गांभिर्या, समाजाची त्यावर प्रतिक्रिया हे मुद्दे पण लक्षात घ्यायला हवेत…

 6. सुहास,
  नमस्कार
  मन उधाण वाऱयाचे एकदम छान. सगळे लेख नाही पण काही लेख वाचले. थ्री इडियट्स आणि आत्महत्या या विषयाबद्दल प्रसारमाध्यमे विशेषत इलेक्ट्रॉनिक माध्यमांबद्दल व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे. हे अगदी खरे आहे की नको ते विषय ही मंडळ दिवसभर चघळत बसतात. त्यापेक्षा देशात इतर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत ना, पण तिकडे लक्ष देणार नाही. कारण यांना आपला टीआरपी वाढवायचा असतो ना. असो.
  शेखऱ

 7. Trupti

  लोक जाग्रुतीपेक्शा प्रसारमाद्यमान्मधील स्पर्धा आणि थोडक्यात् TRP गोळा करण्यासाठि सुरु असलेली धड्पड् यामुळे बातम्या ह्या आता एखाद्या Entertaining Show सारख्या बघीतल्या जाऊ लागल्या आहेत्. त्यामुळे प्रस्तुत् बातमी मधे किती तथ्य आहे यावर् प्रश्न् चिन्ह उपस्थित् होतो… And as u said Suhas, व्रुत्तपत्रान्नि सुध्दा electronic media चाच् कित्ता गिरवावा हि दुर्दैवचि बाब् आहे….आपल्यकडे एके काळी लेखणीला तलवारीपेक्शाही तिक्श्न अस्त्र मानल गेल् आहे..पण् त्याचा हा असा दुरुपयोग् होइल् अस त्यावेळेस् आगरकर् आणि टिळकान्नाहि वाटल् नसाव्…

 8. prasanna

  svatantrya kashashi khatat he mahit nasnaryaa lokani lokashahicha udho udho karun ekhadya garanyachya hatakhali rajeshahi padhdhatine rajyakarbhar chalavnarya aani 100-200 rupayansathi mate denarya lokanchya lokashahi deshat evdhe swatanrya tyanahi asnarach ! aso u r right my dear frnd. keep writting…..

  1. प्रसन्ना यार, तू तर एवढा छान लिहतोस. तू लिह ना काही तरी ह्यावर and bi da way thank you for your comment 🙂

 9. सुहास अगदी माझ्या मनातल बोललास. मला असाच वाटत. तेच तेच बिन्ब्विल्याने मनात तसेच विचार येतात. अशा विषयांना मिडिया ने बगल दिली तर बरे होईल. मुळात हाटी.व्ही.आलेलाच मला आवडलेला नाही.

  1. ह्या बातम्या बघून आपलाच मन एवढा हेलावून जात मग त्या विद्यार्थ्याच्या दुखी मनात त्यात काय विचार येत असतील कल्पना करवत नाही.

 10. काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नव्हतं. शब्द अपुरे पडताहेत. या मिडियाने सगळ्या बातम्यांना “विनोदी” बनवायचा चंगच बांधला आहे. इतक्या वेळेस इतके विचित्र कॉमेंट्स दाखवतात, आणि सिरियस न्युज ची कॉमेडी न्युज करुन टाकतात की हसुन हसुन पुरेवाट होते..
  पण या आत्महत्यांचं किती वेळा तेच ते दृष्य़ दाखवायचं यावर पण कंट्रोल असलाच पाहिजे..

  1. हो बघा ना, कोण काय खबर आणि कशी देईल सांगताच येत नाही…ह्या लोकांवर काही बंधन आणू शकत नाही ना. म्हणे वी आर जर्नलिस्ट

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.