माझं स्वप्न आणि माझी शाळा..


अहो गोंधळून जाऊ नका, मी एवढा हुशार कधीच नव्हतो, की माझ्या शाळेला माझा गौरव वगैरे असेल आणि त्या आठवणींना मी उजाळा द्यायचा प्रयत्‍न करतोय 😀 गेले दोन दिवस, का कोण जाणे एक स्वप्न पडतंय, की मी ऑफीसच्या डेस्क वरुन उठून आमच्या टीम मॅनेजरच्या डेस्कवर जातोय बोलायला माझ्या टार्गेट्स आणि पर्फोरमन्सबद्दल, पण जसा उठतो तसा मी माझ्या शाळेच्या यूनिफॉर्म मध्ये आणि मॅनेजरच्या डेस्कच्या जागी आमच्या वर्ग शिक्षिका बाईंची बसायची खुर्ची आणि टेबल. मी आमच्या बाईंशी बोलतोय. मला कळत होत, की मी ऑफीसला असायला हव, पण आता शाळेत सर्व वर्गासमोर पांढरा हाफ शर्ट आणि ब्लू हाफ पॅंट घालून उभा होतो. मी खूप गोंधळलेला होतो आणि तेवढ्यात मला माझे मित्र आणि मैत्रिणी दिसू लागतात. शाळेच्याच गणवेशात (काहींची लग्न पण झालीत पण तोच निळा फ्रॉक आणि केसांच्या वेण्या 🙂 )

मला ते बघून खूप हसू येत होतं, आमच्या गप्पा, हसणं-खिदळणं चालू एकदम मच्छीमार्केट सारखं (असा आमच्या बाईंच ठरलेलं वाक्य गोंगाट वाढला की) पण माझा गोंधळ अजुन वाढला, म्हटलं मी तर ऑफीस मध्ये होतो आणि केतनला पर्फॉर्मेन्सबद्दल विचारायला आलो होतो आणि आता चक्क बालक विहार विद्यालयाच्या “अ” तुकडी वर्गासमोर उभा. मी हलकेच माझ्या डेस्कवर नजर टाकली, तर माझे ऑफीस फ्रेंड्स रिशी, इम्रान, रोहन मॉनिटर मध्ये डोक घालून कीबोर्ड वर खट-खट करत नॉर्मल काम करत बसलेत. म्हटलं आयला हे काय गौंडबंगल आणि हे स्वप्न सलग दोन दिवस पडले. मला स्वप्न दिवसाच पडतात, कारण मी सकाळीच झोपतो नाइट शिफ्ट असल्यामुळे 🙂 मग विचार करायला लागलो काय अर्थ असेल या स्वप्नाचा.

कारण मनी वसे ते स्वप्नी दिसे असे म्हणतात, पण मला शाळेचं स्वप्न पडावं? असा हुशार, गुणी, शिक्षकांचा लाडका, स्पोर्ट्समध्ये अव्वल असा मी कधीच नव्हतो. सुहास म्हटलं की  लाजराबुजरा, . आमच्या इंग्रजीच्या मानेबाईना तर धक्काच बसेल, जर त्याना कळलं की सुहास Works in International Contact Center now. त्या आम्हाला इंग्रजी शिकवीत आणि ७ वीत असताना, मी फक्त काठावर पास झालो होतो इंग्लीशमध्ये 🙂 असो तर मी माझ्या गुणपत्रिकेचा अहवाल देऊ इच्छित नाही, पण सांगायाच मुद्दा हा की माझा शाळेतलं अस्तित्व फक्त त्या पुरतचं आणि मधल्यासुट्टीत मित्राना वडा-पाव, कटलेटची पार्टी देणारा इतकंच. त्यामुळे शाळेची मला अशीच मध्ये आठवण यावी ८-९ वर्षानंतर असा काहीच घडलं नाही एवढ्यात..

मग माझं संशोधन चालू त्याचा अर्थ शोधून काढण्यात..मग असा ना तसा अर्थ लावला त्यातले काही निष्कर्ष..

– सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात शाळेतले दिवस आरामाचे आणि आनंदाचे वाटले असतील.

– प्रॉजेक्ट्स, सर्विस लेवल, टार्गेट्स पेक्षा शाळेतला इतिहास, भूगोल, गणित अधिक जवळचा वाटत असेल मला

– ऑफीस महागडा मधला बर्गर, पिझा पेक्षा २५-५० पैश्यात घेतेलेल्या गोळ्या आणि त्याने झालेले चिकट हाथ आवडत असेल

– तो निरागसपणा लहान वयातील लोभवत असेल मला ह्या कॉर्पोरेट लाईफस्टाईल समोर..का मोठे झालो असा विचार येतो 🙂

– शाळा सुटली की धावत घरी येऊन. जेवून थोडा वेळ टीवी बघून मस्त बिछान्यात ७-८ तास लोळायला आवडत असेल, आताच्या ४-५ तासाच्या डिस्टर्ब झोपेसमोर.

– खिशातले पाकीट संभाळण्यापेक्षा, बाबांनी शाळेत खर्चाला दिलेले ५ रुपये मोलाचे वाटत असतील.

कारण भरपुरच असतील पण May be I am missing something badly..very very badly 😦

This slideshow requires JavaScript.

32 thoughts on “माझं स्वप्न आणि माझी शाळा..

  1. Archana Panchal

    मला वाटत मला पण हे स्वप्न पडणार आहे आता.. पण रात्रीच… (मी सकाळी जोपत नाही )…:-)
    तू एकटा नाहीयेस रे काहीशी अशीच स्वप्न अप्ल्यात्ल्या प्रत्येकाला पडत असतील थोड्या फार फरकाने…
    one thing is there that we badly miss school badly…. very very badly…..

  2. hi,

    well i never knew tht u really miss school days a lot….. hmmm even i do but th moment which i spent wth friends only.. otherwise u knw very well how good i was in study.. 😀

    u knw wht the one thing i really miss abut our school is tht teh school bell and friends too…

    mazi far echha hoti ekada tari ti vajavayala milavi… pan kay karanar 10th parayant sudha hight kami padali…. 😀 aso

    good thing is tht ur taking efforts at least to write it.. i havent seen our school in last 9yrs…….

  3. Anish

    Seems like you are getting old. 😉
    चांगलं लिहिलं आहेस. मला माहित नव्हतं तू एवढा नियमितपणे आणि चांगलं लिहितोस.
    आणि आपल्या शाळेबद्दल दुर्दैवाने फार काही बोलण्याची सोय नाही… शाळेपेक्षा एकूण लहानपणाचा nostalgia येवू शकतो…
    असो.
    रामदासांनी सांगितल्याप्रमाणे दिसामांजी लिहित जावे अखंडीत..
    शुभेच्छा
    -अनिश

    1. अरे हो, तसाच. प्रोफेशनल लाइफमध्ये लाइफ नाही रे उरला..आणि I am getting old? Y buddy…६ महिन्यांचा तर फरक आपल्यात lol

      1. yojana salunkhe

        shala hi far moalyavan vastu ahe ani aaj tichya athavan jagya jalya tumachya swapanamule thamule tumache ani tumhala padalelya swapanache abhyar.vaaa …. chan hot swap ani ha anubhav asa shair kelat tyamule aaj khupashya athavani jagya jalya shalechya .thanx.

        1. योजना,

          सर्वप्रथम आपले ब्लॉगवर स्वागत. शाळा विसरणे शक्य नाही हेच खर 🙂
          अशीच भेट देत रहा 🙂

  4. आनंद पत्रे

    कारण काहीही असो(अथवा नसो), शाळेचे दिवस सर्वांनाच जवळचे असतात….

  5. आज ही आठवते शाळा मनाच्या कोपऱ्यात घर करून आहे. इतकेच काय पहिली पासून चे सर मेडम सर्व आठवते. आनंद वाटतो ती आठवण आल्यावर. गावी एलो कि मी सुद्धा हीपोस्ट टाकणार.

    1. हो नक्कीच लिहा आणि तुमच्या टेलीपथी च्या पोस्ट कधी वाचायला मिळणार? मी वाट बघतोय 🙂

      1. सुहास, मी तुझ्या ब्लोग साठी विजेट तयार करून पाठविले होते ते आवडले नाही का ? अध्याप ब्लॉग वर टाकले नाही म्हणून असे वाटले.

  6. सुहास, सगळ्यांनाच अशी स्वप्ना पडत असतील. पण एवढ्या मस्त रीतीने मांडता येत नाहीत. एकदम मस्त लिहिलंय..

    1. धन्यवाद हेरंब, सुचत नव्हता काही, खूप गोंधळ सुरू होता मनात. असो लहानपण देगा देवा अजुन काय 🙂

  7. भारी स्वप्न आणी त्याच मस्त अवलोकन..
    असो का मोठे झालो असा विचार माझ्याही मनात येतो बरयाच वेळा…

    give me some sunshine
    give me saome rain
    give me another chance
    i wanna grow up once again..na na na…~~~

  8. शाळेत असतांना शाळा कधी संपेल असे वाटते.. आणि संपल्यावर का संपली असं वाटायला लागतं..

  9. अशी स्वप्नं मला जागेपणी पडली तरी आवडतील…मजा आली वाचायला…शाळेच्य गणवेषात कॉम्प्युटरवर काम…हे हे हे…

  10. ह्या ह्या ह्या, डिप्लोमाला असताना आमच्या ’कम्युनिकेशन स्किल्स’ च्या प्रो. नी छातीठोकपणे सांगितले होते की तुम्ही इंजीनीअरींगच्या किंवा एक्झिक्युटीव्ह लेव्हलवर काम करायच्या लायकीचे नाही आहात, तुम्ही कुठेतरी कारकुनीच करणार. 😉
    आज जर के.बी. पवार सरांनी मला इंटरनॆशनल, मल्टीनॅशनल कंपनीच्या उच्चाधिकार्यांसमोर प्रेझेंटेशन्स देताना, त्याना ट्रेनींग्ज देताना बघीतले असते तर ते फ़िट येवुनच पडले असते 😛

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.