आठवणीतलं कोल्हापूर… !!

पोस्टच्या नावावरुन तर कळलच असेल इट्स समथिंग अबाउट कोल्हापूर…

खरंय, मागच्या वर्षी मी अनुभवलेलं कोल्हापूर आणि सांगली आज शब्दात मांडायचा प्रयत्न करतोय. ब्लॉगिंगचा किडा हल्लीच चावल्याने, हा प्रपंच तब्बल एक वर्षानंतर करतोय. ते दिवस कधी विसरता येण शक्य नाहीच, तरी त्या दिवसांच्या आठवणी लिहून काढायचा हा छोटा प्रयत्न. पोस्ट थोडी घाईत लिहतोय काही चुका झाल्या असतील, तर मी नक्कीच सुधारेन.

माझे सगळे मित्र म्हणतात, की सुहासचा पाय घरात टिकत नाही. नुसता फिरत असतो, ह्याला घरी काही बोलत नाहीत का वगैरे वगैरे..कारण वीकेंड म्हटलं की, आम्ही (मी, प्रसन्न आणि अनिश) छोटे मोठे ट्रेक ऑर्गनाइज़ करायचो. बाकी कोणी येत नसेल, तर आम्ही तिघेच निघून जायचो. २००९ मध्ये खूप किल्ले सर पण करून झाले. तेव्हा एकदा प्रसन्नने कोल्हपुरला जाऊया का? असं विचारलं. ते पण ५-६ दिवसांसाठी. अनिशचा प्रेज़ेंटेशन होता आयआयटीमध्ये, त्यामुळे त्याला जमणार नव्हतं. आम्ही आमच्या ग्रूपमधल्या मित्रांना विचारलं, पण काही कोल्हपुरला खुपदा जाउन आले होते किवा काहींचा सुट्टीचा प्रॉब्लेम होता. पण आमचं मात्र ठरलं होत, कोणी नसेल तरी आपण जायचंच…

सरतेशेवटी हो-नाही हो-नाही करत तृप्ती (प्रसन्नची बायको), वैशु (वैशाली) आणि धनद तयार झाले. निघायचा दिवस पक्का झाला २७ जानेवारी २००९. ऑफीसमधून सुट्ट्या मंजूर करून झाल्या. आम्ही ज्यांच्याकडे मुक्कामाला जाणार होतो, ते म्हणजे आमच्या मित्राचं (सागर इंगवले) गाव. त्यांच स्वतःचं मोठ्ठ हॉटेल आहे असं सांगितलं होतं प्रसन्नने. त्यानेच सगळं मॅनेज केलं होत कोल्हपुरला. तो आम्हाला सोडायला पण आला होता बोरीवलीला गोकुळच्या इथे.

बस थोडी लेट होती, पण आली एकदाची आम्ही लगबगीने चढलो आणि सागरने ड्राइवरवरला सांगितला कुठे उतरवायचं आम्हाला ते. ड्राइवर म्हणाला, “साहेब उतरवतो बरोबर “साई मंगलमला” तुमचे पाहुणे ते आमचे पाहुणे, तुम्ही निर्धास्त रहा.” मनात म्हटला वाह, म्हणजे हॉटेल साई इंटरनॅशनल खुपंच मोठं प्रस्थ दिसतय 🙂

बस सुरू झाली ८ वाजले असतील. नाकोडा २x२ एसी बस बोरीवली वरुन निघून, वेस्टर्न एक्सप्रेस वे ला लागली. मी-वैशु, प्रसन्न-तृप्ती आणि बिचारा धनद एकटाच अश्या सीट्स पकडून बसलो. आमच्या सीट्स ह्या पहिल्या रांगेतल्या होत्या. मुंबईच्या ट्रॅफिक ला मागे टाकत आम्ही एशियन पेंट्स म्हापे पर्यंत आलो. थोडा नाश्ता झाला रस्त्यावरच्या गाडी वरचा बर्गर-सॅंडविच. ते खाउन मन शांत झालं, कारण कोणीच घरून काही खाऊन नव्हते आले. बसचे सगळे पिक-अप झाले आणि बस मधले लाइट्स स्विच ऑफ झाले आणि त्याने टीवी चालू केला.

म्हटला चला आता कुठलातरी चांगला मूवी बघत झोपून जाऊ. मूवी चालू झाला आणि त्याचं शीर्षक बघून, सरळ एक-दोन शिव्या निघाल्या (मनातल्या मनात :)). सिनेमा होता “रब ने बना दी जोडी” 😦 त्याला सांगून पण बघितलं, “बाबा चेंज कर किवा बंद कर, पण तो ऐकतच नव्हता. एक तरी पूर्णा पिक्चर दाखवू असा नियम आहे त्यामुळे पिक्चर संपल्याशिवाय बंद होणार नाही”.

झालं आमच्यावर तो “रब” फेकून मारला गेला. १२:३० झाले तरी संपायचा नाव घेत नव्हता “रब”. मग एका ठिकाणी जेवणाचा हॉल्ट घेण्यात आला. बर्गर-सॅंडविच खाउन आमचा जठराग्नि शांत झाल्यामुळे फक्ता इडली वरती समाधान केलं आणि मी फक्कड चहा घेतला (मी कधीही चहा पीऊ शकतो त्याच एक उदाहरण :)) परत प्रवास सुरू झाला, हळूहळू सगळे झोपून गेले राहिलो, तो फक्त मी आणि वैशु. आम्ही गप्पा मारत, गाडीचा एवरेज, टोल नाका, आकाशातले तारे, ऑफीसच्या गप्पा मारत बसलो होतो, मध्येच काही झालं आणि वैशु जोरात हसली, मग तीच दचकून हळूच मागे बघायला लागली तिला वाटलं कोणी तरी उठलं असेल, पण सगळे शांत झोपले होते. एकदम गाढ. थंडी खूप होती शेवटी आम्हाला ही कळलं नाही की, बोलता बोलता कधी झोप लगाली. कऱ्हाड आलं डोळा उघडला, थोड्या वेळाने आम्हाला उतरायाचं होत.

हॉटेल साई इंटरनॅशनल

हॉटेल साई इंटरनॅशनल नॅशनल हाइवे-४ (मुंबई-बंगलोर) कोल्हापुरच्या आधी २०-२२ किमी. हायवेच्या डाव्या बाजूला आहे. आमची बस थांबली आणि आम्ही उतरलो. खूप अंधार होता आणि जसे आम्ही उतरलो, तशी कुत्री भुंकायला लागली कोणी दिसत नव्हतं. मेनगेटजवळ गेलो, तेव्हा सेक्यूरिटी गार्ड आला आणि विचारलं सागर साहेबांचे पाहुणे ना? या आत आणि लाइट्स लावले गेले. हॉटेल खूपच मस्त होत, दरवाज्याजवळ साईबाबांचा मोठ्ठा फोटो होता. आम्हाला रूम्स दिल्या गेल्या आणि रूम मध्ये गेल्या गेल्या सागरचे बाबा (श्री. आर.डी.इंगवले) आम्हाला भेटायला आले. त्यांनी सांगितलं, मस्त झोप काढा आपण सकाळी बरोब्बर ८:३० ला भेटू आणि आणि ठरवू कुठे कुठे जायचं ते.

आता मला कळलं, की सागरने कुठल्याही परक्या माणसावर आमची जबाबदारी सोडली नव्हती कोल्हापूर दर्शनाची. त्याचे बाबाच आम्हाला कोल्हापूर आणि आजु-बाजूचा परिसर फिरवणार होते ४ दिवस. आपली सगळी काम सोडून. फक्त आम्ही काही बघायचे राहू नये, ह्या एकाच तळमळीने ते स्वत: सगळं ठरवत होते. सकाळी आम्हालाच उशीर झाला उठायला, पण काका काही बोलले नाही आणि सांगितलं नाश्ता करा गाडी आलीय म्हणून. आम्ही त्या हॉटेलच्या फुड कॉर्नरला गेलो, काउंटरवर ऑर्डरसाठी पैसे देऊ केले. ते त्यांनी सरळ सरळ नाकारले, म्हणाले साहेबांनी सांगितलंय आमचे पाहुणे आहेत म्हणून.. कुणी आपलं माणूसच, इतके लाड करू शकतो ह्याची जाणीव झाली. 🙂

मग आम्ही निघालो क्वॅलिसमधून कोल्हापुरच्या वारीला 🙂

पहिला मुक्काम वारणा मिल्क प्लान्ट, गाडीत आमच्या गप्पा-टप्पा चालूच होत्या. काका मोबाइलने फोन करून सांगत होते, मी येतोय तिथे मुंबईच्या पाहुण्याना घेऊन साहेब आहेत ना आफिसत? मग ते माहिती देऊ लागले परिसराची. तोडकं-मोडकं इंग्रजी, आणि त्यावर गावरान भाषेचा प्रभाव अशी त्यांची बोली. खूप छान वाटायचं जेव्हा ते बोलत असे तेव्हा. आमच्यापेक्षा जास्त उत्साही काका होते. त्याच प्रवासात तृप्ती आणि वैशुचं नामकरण, पण झालं “पिंकी” आणि “बंटी” म्हणून. काका त्याच नावाने त्यांना हाक मारत होते.

वारणा मिल्क प्लान्ट फिरलो, एकूण-एक प्रॉड्कशन यूनिट्स दाखवले, मग हळूच फ्रेश श्रीखंड पण मागवून खाल्लं. तिथलं मॅनेजमेंट खूप छान होत. प्रत्येक ठिकाणी स्वच्छता राखली होती, आणि सगळी कामगार मंडळी उत्साहात काम करत होती. आम्हाला एक एक यंत्र समजावून सांगत होती. खूप छान वाटलं. 🙂

मग तिथून निघालो आणि वारणा साखर कारखाना गाठला. तो मिल्क प्लांटपासून किमान ७-८ किलोमीटरवर असावा. तिथल्या एका ओळखीच्या सूपरवाइज़रने आम्हाला पूर्ण कारखाना फिरावला आणि सगळी माहिती दिली. हा कारखाना

पन्हाळावरील धान्य कोठार

खूपच भव्य होता. कधी विचार नसेल केला, एवढ्या मशीन्सचा जाळं खूप कुशलतेने विणलं होत. आम्हाला लहानात-लहान गोष्टींची माहिती दिली गेली. भाउ (आर.डी. काका) सुद्धा ते सगळा मन लावून समजून घेत होते आणि आम्हाला समजावून सांगत होते. कारखाना बघून झाला, मग आम्ही मस्त दोन पेले उसाचा रस पिऊन निघालो तिथून. मग एका जवळच्याच हॉटेल मध्ये जेउन ज्योतिबाच्या दिशेने निघालो, आमचा सारथी राजेश 🙂 पण आम्हाला माहिती देऊ लागला. भाउ आपली सगळी काम फोन वरुनच मॅनेज करत होते, कारण ते सगळा कामाचा पसारा मागे सोडून आम्हाला फिरवायला घेऊन आले होते.  ज्योतिबाच दर्शन घेतला आणि मग पन्हाळा बघुया असा ठरला. किल्ला म्हटल तर आपला वीक पॉइण्ट. मला तर खूपच आनंद झाला आतून. पूर्ण किल्ला फिरलो एक गाइड घेतला होता सोबत. मस्त बॉट्टेल सोडा पियुन घराकडे (हॉटेलकडे) फिरलो. मस्त जेवलो आणि लवकर झोपलो.

दुसर्या दिवशी सकाळी काकी (मिसेस आर. डी) आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जायला आल्या. बत्तिस शिराळा फाट्या वरुन त्यांच्या घरी पोचलो “अमरदीप”. मग मस्त चहा घेऊन, “यशवंत ग्लूकोस फॅक्टरी” ला गेलो. मक्याच्या एकूणएक भागाचा उपेयाग केला जातो हे पहिल्यांदाच कळला आम्हाला. यशवंत नंतर पुढचा मुक्काम “विराज आल्कोहल प्लान्ट” ला पोचलो. हा प्लान्ट एवढा Technically advanced होता की सगळे कंट्रोल्स एका छोट्या रूममधून  सांभाळले होते. तिथून निघालो आणि चांदोली धरण बघायला. पूर्णपणे मातीच असलेला हे धरण खूपच भव्य होता, शेजारीच धरणाच्या पाण्यावर विजेचा उत्पादन कारखाना होता. तिथे कॅमरा बंदी होती, त्यामुळे सगळे मोबाइल्स आणि कॅमरा डेपॉज़िट करावे लागले. खूपच मजबूत असा ते धरण खरच बघण्यासारखा आहे. परत निघालो हॉटेलवर जायला. येताना पवनचक्की वीज निर्मिती बघून आणि गरम गरम गुळ चाखत रूम वर पोचलो. मस्त जेवलो आणि फिरफेटका मारू लागलो बाहेर.

रूम वर गेलो पण झोप येत नव्हती मग असेच बाहेर लॉबीच्या खिडकीजवळ बसून गप्पा मारत बसलो मी, वैशु आणि प्रसन्न. तृप्ती आणि धनद होते थोडा वेळ पण ते गेले झोपायला थोड्यावेळाने. आम्ही तिघ पहाटे ४ पर्यंत गप्पा मारत बसलो कळलच नाही वेळ कसा गेला ते. मग शेवटी सकाळी त्रास नको म्हणून गप्पा आवरून झोपायला गेलो 🙂

सकाळी नेहमीप्रमाणे काका आणि राजेश हजर आमच्या आधी 🙂 पटापट नाश्ता करून सांगलीच्या दिशेने निघालो, श्री क्षेत्र औदुंबरचा दर्शन घेऊन प्रसिद्ध अश्या सांगलीच्या गणपतीचा दर्शन घेतला. मग नरसोबाची वाडी, बाहूबली मंदिर बघितला. इचलकरन्जिला “बॉम्बे रेओन्” च्या गार्मेंट्स यूनिटला भेट देऊन परत फिरणार तर समोर मस्त शेत होता. मग तिथे गप्पा, कसला पीक घेता, कसा सगळा काम चालता, पाणी कसा आणता वगेरे वगेरे..खूप फोटो काढले. मग काका म्हणाले चला टोपला जाउ. ते जवळच असलेला गणपती मंदिर होता “चिन्मय गणाधीश” दुरुनच गणपतीची भव्य ८५ फुट उंच मूर्ती दिसली. मागे आमच्या क्लाइंटने मला ह्या गणपतीचा फोटो पाठवला होता, विचारला होता तुला माहीत आहे का कुठे आहे हा. तेव्हा ऑनलाइन बघितला होता आणि आज मी त्याच मुर्तीच्या चरणाशी उभा होतो मी 🙂

तिसरा दिवस संपला..हळू हळू जाणीव झाली की उद्या रात्री निघायचाय 😦 परत मुंबई, गर्दी, ऑफीस चालू होणार..घरी परतूनये असाच वाटत होता रात्रभर. खुप लवकर लवकर दिवस गेले :(:(

शेवटचा दिवस राजेश आम्हाला कोल्हापुरच्या अंबेमातेच्या दर्शनासाठी घेऊन जाणार होता. मी आणि प्रस्सनने एक म्यूज़ीयम बघायचा मनात पक्का केला होता तसा राजेशला बोलून दाखवला. तो म्हणाला जातो की घेऊन काळजी नका करू. कोल्हापुरच्या प्रवेशह्द्दीच्या बाजूलाच “कन्हेरि मठ” आहे तिथेच हे कृत्रिम गाव बनवला आहे. “सिद्धगिरी म्यूज़ीयम” ते बघून थोडी निराशा झाली कारण ते अर्धवट होता आणि काम चालू होता तिथे. त्यामुळे काही अर्धवट कलाकृती सिमेंटच्या बघून निराशा झाली पण ते पूर्ण झाला की नक्कीच बघायला आवडेल. आत खूप छान माहितीपर तक्ते लावले होते. आम्ही गेलो तेव्हा शाळेची पिकनिक आली होती तिथे मग त्यांच्यासोबत राहून त्यांच्या मॅडम काय-काय माहिती देत होत्या ते एकत बाहेर पडलो

मग तिथून कोल्हापुरच्या अंबेमातेच्या दरबारी पोचलो. आईने आवर्जून सांगितला होता की ओटी भर देवीची. पंचमी असल्याने मंदिरात गर्दी होती. ह्याच दिवशी सूर्याची किरण मातेच्या चेहर्यावर पडतात. त्याच अनन्यसाधारण महत्व असत म्हणून मंदिरात भाविकांची एकच झुंबड उडाली होती. मातेच दर्शन घेऊन बाहेर पडलो. थोडा नाश्ता करून चपला खरेदी करायला थांबलो. कोल्हापुरात येऊन कोल्हापुरी चपला नाही घेणार असा होईल का? कोल्हापुरी चपला नवीन फॅशन च्या, एकदम आकर्षक ही घेऊ की ती असा झाला. शेवटी एक जोड आवडला आणि भाव करून विकत घेतला.

आता खास कोल्हापुरचा आकर्षण असलेला “रंकाळा” बघायला गेलो. तिथे तो तलाव एक मोठ क्रिकेट ग्राउंड वाटत होता. त्या पाण्यात एका पाण वेलिच आवरण तयार झाला होता. मोठ्या क्रेनच्या साहहायने ते काढण्याचा काम चालू होता.

दुपार झाली आणि आता कुठे तरी जेवायचा होता थांबून तेव्हा राजेशने एक सुचवला एक हॉटेल आहे, थोडा लांब आहे पण त्या हॉटेल मध्ये जुन्या गोष्टींच छोटेखानी संग्रहालय आहे, बघणार का? मी म्हटला नेकी और पुछ पुछ 🙂 त्याने स्वत: फोन करून सांगितला मी येतोय पाहुण्याना घेऊन. तिथे पोचलो “फौजी” असा त्या हॉटेल चा नाव. प्रशस्त अश्या घरात. खाली हॉटेल आणि वरच्या मजल्यावर घाटगे बंधू आणि त्याचा परिवार राहत होता. त्यानी आमचा स्वागत करत त्याच घरगुती संग्रहालय दाखवला. खूप मस्त होता ते..तिथेच कोल्हापुरचा फेमस पांढरा-तांबडा रस्सा मागवला. पोटभर जेवण झाला तिथे

मग आमचा शेवटचा मुक्काम कोल्हापूरची शान “शाहू महाराज पॅलेस”. अतिभव्य असा तो पॅलेस आणि त्यात जपून ठेवलेली एकूण एक गोष्ट अप्रतिम होती. माहितीपर पेपर्स, हत्यारे, बैठका, फोटोस सगळा कसा नीट मांडून ठेवला होता. तो बघून बाहेर आलो चहा घेतला मस्त आणि परत फिरलो हॉटेल मध्ये जायला. राजेशने त्याचा नंबर दिला. आत्मीयतेने सांगत होता तो परत आलात तर नक्की सांगा मी फिरवेन तुम्हाला गाडी आपलीच आहे आणि त्याने आमचा निरोप घेतला. तो त्याच्या हक्काचे-मेहनतीचे पैसे पण घ्यायला तयार नव्हता, ४ दिवस तो आमच्या सोबत होता आपली काम सोडून. शेवटी मी पैसे त्याच्या खिशात कोंबले आणि भेटू परत म्हणून रूम वर गेलो सामानाची आवाराआवर करू लागलो.

लवकर जेउन. भाउंचा आणि इतर हॉटेलच्या स्टाफचा निरोप घेण्यास खाली उतरलो त्यानी फक्ता गाडीच्या डिज़ल व्यतिरिक्ता एक पैसा घेतला नाही आमच्याकडून आणि परत यायचा आमंत्रण देऊन आम्हाला सोडायला हाइ वे ला आले आमचा सामान घेऊन आणि आम्हाला बस मध्ये बसवला. तिथून जाउ नये असाच वाटत होत पण..

आज त्या भेटीला एक वर्ष झाला. अजूनही भाउंचा तो भारदस्त आवाज, त्यानी आमच्यासाठी केलीली धावपळ ४ दिवस, तिथे अनुभवलेला क्षण अन् क्षण तसाच आहे मनात..वाट बघतोय परत कधी जायला मिळाला तर..पण जायचाय हे तर नक्की..

तुम्ही येणार का???

पोस्ट थोड घाईत झालाय त्यामुळे फोटोस टाकता आले नाहीत, तुम्ही ते खालील दुव्यावर टिचकी देऊन बघू शकता..

http://suhas_zele.photoshop.com/

http://picasaweb.google.com/suhas.zele/SangliKolhapur2831Jan2009?authkey=Gv1sRgCIfv07ek57mSkwE&feat=directlink

प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

भारतीय प्रजासत्ताक दिन

सर्वांना ६१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या

मनःपूर्वक शुभेच्छा


मराठी झेंडा राष्ट्रीय पुरस्कारात

कालच दिल्लीत मागील वर्षाच्या उत्तम चित्रपटांचा गौरव “राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार” देऊन केला गेला आणि त्यात वर्चस्व राहिला ते मराठी चित्रपट सृष्टीचा.

उपेन्द्र लिमये ह्याने साकारलेला जोगत्या हा त्याला या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गेला. त्याखेरीज सवोर्त्कृष्ट सामाजिक चित्रपट (जोगवा), सर्वोत्कृष्ट संगीतकार अजय-अतुल(जोगवा), गायक हरिहरन- जीव रंगला (जोगवा), गायिका श्रेया घोषाल (जोगवा) , अपेक्षित अश्या “हरिश्‍चंद्रच्या फॅक्टरीला” मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला असून ‘विठ्ठल’मधील बाल कलाकाराच्या भूमिकेसाठी मराठी बाल कलावंत अनिकेत रुमाडेला विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच “गंध” साठी सचिन कुंडलकरला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून याच चित्रपटातील प्रमोद जे. थॉमस यांची ऑडिओग्राफी सवरेत्कृष्ट ठरली.

खूप खूप अभिनंदन..तुम्ही केलेल्या कष्टाचा चीज झालाय..असेच प्रगती करत राहा. मराठी चित्रपट सृष्टीत नव्या दमाच्या ह्या पिढीचा जोर असाच उत्तरोतर वाढु देत हीच सद्दीच्छा..

एक विनंती – सगळ्यानी मराठी चित्रपट चित्रपटगृहाताच पाहावेत…कलेला प्रोत्साहन द्या. खूप छान चित्रपट येऊ घातलेत. असे नवीन नवीन आणि धाडसी प्रयोग आपल्याकडे होत आहेत त्याच खूप कौतुक करा. Please Please …