हॅपी न्यू ईयर..


आज ३१ डिसेंबर, उद्या पासून नवीन वर्ष चालू.

बहुतेक सगळेच ३१st च्या पार्टीस किवा सेलेब्रेशनचे प्लॅनिंग करत असतील. हॉटेल्स, पब्स, डिन्नर, आउटिंग, किवा घरीच आपल्या परिवारासोबत कुठे जाउ कुठे नाही… तसा हे वर्ष ठीक गेला मला, जास्त लक्षात राहील अश्या फार कमी गोष्टी असतील. आईच ऑपरेशन, अजुन थोडी घरातली जबाबदारी, नवीन मित्र बनले (तुटले नाहीत, निदान माझ्याकडून तरी नाहीच), छोटी मोठी भांडण, जॉब मध्ये रिसेशन मुळे आलेला स्लॅग, फ्रस्ट्रेशन मग परत एक ब्रेक घेऊन स्व:ताला टेक्निकली अपग्रेड करून ऑफीस री-जॉइन, नवीन प्रोसेस चे टार्गेट्स, डेडलाइन्स, परत नाइट शिफ्ट्स, अर्धवट झोप, नियमीत ब्लॉगिंग Etc Etc.. खूप कमीच गोष्टी आहेत ना..? lol

तर सांगायचा मुद्दा हा की माझ हे सलग तिसरा वर्ष असेल ३१st ऑफीस floor वर सेलेब्रेट करताना दोन वर्ष अडोबी (ADOBE) आणि ह्या वर्षी टीडब्ल्यूसी (TWC ).  यूएस कस्टमर सपोर्ट हेल्प डेस्क, किवा कॉंटॅक्ट सेंटर किवा सगळे म्हणतात तसा सिंपल कॉल सेंटर. आम्ही तरी काम करूनच ३१ st सेलेब्रेट करणार आहोत 🙂

तुम्हीसुद्धा तुमच्या परीने ह्या नवीन वर्षाच स्वागत कराल. नवीन संकल्प धरून, मग कोणी वाईट गोष्टी सोडायाच संकल्प करेल किवा कोणी चांगल्या आत्मसात करायचा. एकच करा जे कराल ते मनापासून करा  🙂

माझ्या तुम्हा सर्वास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछा.  सगळ्याना हे वर्ष भरभराटीच, आनंदच आणि सुखाच जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

हॅपी न्यू ईयर..

15 thoughts on “हॅपी न्यू ईयर..

  1. पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा..
    तुमच्या कर्तॄत्वाला, पुन्हा एक नवी दिशा..

    मागे वळुनी नको पाहणे, नको भाषा दु:खाची..
    सदैव वाहो तुमच्या दारी, सरिता ही आंनदाची..

    नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

  2. नवीन वर्षाच्या शुभेच्छा…इथे अजुन ३१ चे सव्वा सात वाजताहेत त्यामुळे तसं फ़ार उशीरा नाही देत आहे :))

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.