सन १९७३ पहिला मोबाइल फोन कॉल केला गेला, डॉक्टर मार्टिन कूपर ह्यानी डिज़ाइन केलेल्या मोटोरोला कंपनीच्या हॅण्ड सेटने. भारतात मोबाइल लाँच झाले १९९५ जून-जुलै मध्ये. आता म्हणाल हे सगळा का सांगतोय, आतच आय-फोन ३-जी फोन्स थाटामाटात लॉंच झाले काही महिन्यापूर्वी आणि जग आता रेडी झालाय ४-जी टेक्नालजी लॉंचसाठी.
यू.एस.ए मध्ये लास्ट वीक आमच्या क्लाइंट ने सुद्धा ह्याची अधिकृत अनाउन्स्मेंट केली. आम्ही तर शिव्याच दिल्या कारण आमचा काम वाढला ना (जोक्स अपार्ट :)). कस्टमर सपोर्ट, टेक्निकल सपोर्ट आणि आता नॅशनल हेल्प डेस्क वर काम करताना खूप काही शिकायला मिळाला. आम्ही ब्रॉडबॅंड सपोर्ट करायचो काही महिन्यांपुर्वी पण नवेंबर पासून वाइडबॅंड टेक्नालजी सपोर्ट करू लागलोय. ह्या टेक्नालजी मध्ये आमच्या सबस्क्राइबर्स ना मिनिमम २० MBPS ते मॅग्ज़िमम ५५-६० MBPS चा स्पीड मिळू लागलाय, आणि आता हे ४-जी. ह्यात तर तुम्हाला मोबाइल मध्ये ६ MBPS चा स्पीड मिळू शकणार आहे. बाप रे ह्याच्या ३०% पण मला घरी मिळत नाही 😦
असो, इंटरनेट आणि मोबाइल श्रेत्रात खूप मोठी उलाढाल होतेय आणि अजुन होईल. रोज नवीन टेक्नालजीस लाँच होतेय, मी खुश आहे कारण मला रोज नवीन काहीतरी शिकायला मिळतेय :). Wideband, 4-G Mobile Wireless आता आपल्या भारतात पण येईल लवकरच..जस्ट वेट न वॉच
चला वीकेंड संपला, आज पासून ४-जी चे इश्यूस हॅंडल करावे लागणार…. हे राम lol
ह्या नवीन गोष्टींसाठी अपडेट व्हावेच लागेल. छान माहिती आहे.
Thank you…will keep u all updated 🙂