वीकेंड फ्रीक आउट करताना आज सगळीकडे चाप चोप पोलीस बंदोबस्त दिसला. अगदी प्रत्येकाला चेक करून मॉल आणि स्टेशन मध्ये एंट्री देत होते. म्हटला चला असा नेहमी राहिला तर कोणाची काय हिंमत मुंबईला हादरवायची. मग त्या हवालदारनेच खुलासा केला २६ नोवेंबर आलाय ना, म्हणून हा सगळा “टाइट सेक्यूरिटी” घाट. परत असा काही होऊ नये त्या दिवसारख म्हणून.
कपाळावर हात मारला, अरे पण बाकीच्या ३६४ दिवसांच काय? की वर्षाच्या प्रत्येक दिवसाला एका टेररिस्ट activity ची anniversary साजरी करणार की काय आपण tight security द्यायला? अमेरिका जशी एका हल्ल्यातून शिकली तसा आपला कधी होणार??? कधी ??