माझी चहाची तलप….


आता मेल चेक करता करता वाटलं ब्लॉग अपडेट करू माझ्या परवाच्या अनुभवाने.. म्हणून ही चहाची तलप मध्यरात्री 🙂

रविवार संपला, शनिवार वर्किंग असल्यामुळे वीकेंड झोपण्यातचं आणि घरातली काम करण्यात गेला. आई आणि बाबा दोघेही गावी गेले आहेत, त्यामुळे  शुक्रवारपासून घरची आणि माझ्या भावाची जबाबदारी माझ्या मोठ्या खांद्यावर आलीय. 😀

कॉन्टॅक्ट सेंटर (कॉल सेंटर) मध्ये काम करणारा मी नाइट शिफ्ट करून रात्रीचा दिवस करायची सवय मला. पहाटे घरी आलो की माहीत असतेचं, की काही ना काही खायला असेलचं घरी. कारण ते डिपार्टमेंट माझ्या आईचं, पण दोन दिवस तो पायंडा किवा सवय तुटली. मलाच घरी येऊन सगळं आवरून खायला करायाचं होतं माझ्या साठी आणि लहान बंधूसाठी. मी हे आधी पण केलंय, कारण किचन हा विषय माझा आवडता. सगळा स्वयंपाक मला करता येतो :), त्यामुळे माझी आई बिंदास असते, जरी कुठे बाहेर गेली तर. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी आलो ४:३० ला, मला लगेच फ्रेश होऊन निघायचा होत मरीन लाइन्सला एका मित्राकडे. चहाची तलप लागली, म्हणून दूध गरम करायला ठेवलं. मित्रांना फोन करून कधीची ट्रेन पकडायची, कुठे भेटायाचा हा प्लान ठरला. मी पीसी चालू करून गाणी ऐकत बसलो आणि फोन चार्ज करायला ठेवला.

सकाळचे ७ वाजले, माझ्या भावाने मला ओरडत ओरडत उठवले…मी वैतागून आणि काहीसा दचकून उठलो. मला गाणी ऐकताता डुलकी (डुलकी कसली २ तास झाले होते). मी उठलो आणि घाबरलोचं घरात सगळीकडे धूर धूर, काही दिसत नव्हतं. भाऊ ओरडला दूध ठेवलं, तर लक्ष नाही देता येत काय? मी उठलो सगळ्या खिडक्या उघडल्या आणि फॅन सुरु केले. मी किचनमध्ये आलो, दुधाचा कोळसा झाला होता करपुन, आणि त्याचा अतिशय घाण वास सुटला होता. पूर्ण घर त्या वासानेच भरून गेलं होतं. आमच्या बंधूराजांनी तडक फर्मान सुनावलं, जे झालं ते निस्तर आधी आणि घरातला हा वास घालव नाही तर मी आत्ताच फोन करून हा प्रकार आईला सांगतो.

मी माझी सगळी शस्त्र भावासमोर म्यान करून धूर घालवू लागलो. नशीब कोणी तो धूर बघून फायर ब्रिगेड ला फोन नाही केला 😀 धूर घालवुन मी माझा मोर्चा किचनकडे वळवला आणि त्या करपलेल्या दुधाच्या भांड्याकडे बघितलं. आई रोज ते पातेल किती काळजीपूर्वक धुवून ठेवायची कारण ते दुधाचे असायचे. त्या करपलेल्या दुधाकडे बघून, आईचा(संतापलेला) चेहरा आठवला आणि लागलीच ते भांड वॉश बेसिन मध्ये धुवायला घेतल. खूप दुर्गंधी सुटली होती पण मला ते करपलेलं भांड स्वच्छ होतं तसचं करायचं होत. काही केल्या तो कोळसा निघत नव्हता. मग त्यात थोडा पाणी भरून दुसऱ्या दिवशी सकाळी परत घासायचं असं ठरलं. भावाला सांगितलं, तर त्याचं उत्तर अपेक्षित असंच मिळालं. “तुला हव ते कर, ते भांड स्वच्छ कर आणि हा घरातला वास घालव”

मी रूम फ्रेशनएर मारला घरभर, पण काही केल्या तो वास जाईच ना. शेवटी धूर का जवाब धूर से 🙂 असा ठरवून देवासमोर धुप लावली. सगळी दार खिडक्या बंद केल्या. हॉल, बेडरूममध्ये अगरबत्ती लावली आणि १५-२० मिनिटानंतर घर त्या वासने भरून गेलं. मी म्हणालो भावला बघितलीस माझी आइडिया. तर समोरून परत अपेक्षित उत्तरचं मिळालं, हे झाल पण दुधाच्या भांड्याच काय? त्याला समजावल मी घासेन ते उद्या म्हणून आणि त्यादिवशी जेवण बाहेरूनचं मागवलं, अर्थातच भावाच्या आवडीचं.

दोन दिवस रोज सकाळी उठून ते भांड घासतोय, उद्या तिसरा दिवस आणि मंगळवारी तर आई-बाबा येणार. कोळसा पूर्ण काढलाय मी तरी थोडा करपलेल्या खुणा आहेतचं त्यावर,  पण मी हार मानलेली नाही.

I still have two attempts to make, मंगळवारी जेव्हा सकाळी मी ऑफीस मधून येताना दूध आणींन तेव्हा मला ते त्याचं भांड्यात गरम करायचं आहे आणि त्याचा आई-बाबाना मस्त कडक चहा करून द्यायचाय… 🙂 🙂

अरे रात्रीचे दोन वाजले, झोपायला हवं आता, सकाळी परत माझा थर्ड अटेंप्ट आहेच.. गुड नाइट 🙂

 

– सुझे !!

8 thoughts on “माझी चहाची तलप….

  1. हा हा हा .. तुझी ही जुनी पोस्ट आत्ता वाचली.. झक्कास लिहिलं आहेस.. मग काय झालं त्या चहाच्या भांड्याचं?? 🙂

    1. अरे हेरंब, आईला हल्लीच कळला त्या बद्दल..आधी अजिबात कळला नव्हता, पण भावाशी भांडण झाला आणि तो बोम्बलत गेला हे आई समोर…हा हा हा

  2. काय भाऊ, तुम्ही Google Transliterate किंवा Google IME वापरता काय? कारण ‘jhala hota’ टाईप केल्यावर ‘झालं होतं’ याऐवजी ‘झाला होता’ हे तिथेच येतं. एक उपाय आहे त्यावर. असे शब्द आले की Backspace दाब. अनेक ऑप्शन्स दिसतील तुला त्यात. त्यांतून योग्य शब्द निवडता ये‍ईल.

    1. अरे तेव्हा ते वापरायचो जेव्हा ब्लॉगिंग सुरू केला होता पण आता बाराह किवा क्विलपॅड वापरतो…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.