दसरा झाला की पाठोपाठ
हजेरी लावते ही दिवाळी
आनंदाची मुक्तहस्तपणे
उधळण करते ही दिवाळी
आप्तजणांच्या गाठीभेटी
घडवून आणते ही दिवाळी
सुंदर सुंदर आकाशदिव्यानी
प्रकाशमय करते ही दिवाळी
लहानांसाठी मजाच मजा
घेऊन येते ही दिवाळी
खमंग फराळाचा आस्वाद
घ्यायला देते ही दिवाळी
भेटवस्तू आणि भेटकार्डांची
देवाणघेवाण घडवते ही दिवाळी
अशी सर्वांचा आनंद
द्विगुणीत करते ही दिवाळी
तेव्हा माझ्याकडून सुद्धा
तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा….!!