आज १३ ओक्टॉबर राज्यातल्या विधानसभेच्या निवडणूकीचा दिवस. सगळे राजकारणी देव पाण्यात सोडून मतदार राजाचा कौल आपल्या बाजूने लागावा अशी प्रार्थना करत आहेत. तशी म्हणावी तर ही निवडणूक आपल्या सारख्या मतदारला एक संधी मिळाली आहे ५ वर्षानंतर. त्या संधीचा सगळ्यानी लाभ घ्यावा आणि आपल्या विभागातील योग्य उमेदवारला निवडून द्यावे ही विनंती.
मी आतच मतदान करून आलो.मी राहतो त्या चारकोप मतदार संघात शिवसेनेच वर्चस्व होत, पण राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खूप मोठा आव्हान सेना-भा.ज.प समोर उभे केलाय मागच्या निवडणुकीत. त्यामुळे यंदा काहीच भाकित करता येणार नाहीत. बघुया काय होताय ते. जर आज संधी मिळून पण काही झाला नाही तर ५ वर्ष बघतच बसायचाय आपल्या सगळ्याना..पण सगळ्या मतदरांकडुन एकच छोटी अपेक्षा आहे, की तुमच्या दृष्टीने योग्य अश्या उमेदवारालाच निवडून द्या. एमोशनल होऊन किवा मी आज पर्यंत यांनाच मत दिलय म्हणून परत त्यानाच असा विचार करू नका. एखादा ब्रँड जर नाव मोठा लक्षण खोटा म्हणून निघाला तर आपण चेंज करतो ना? मग उमेदवार का नाही निवडत त्याची लोकोपयोगी काम बघुनच?
आता शेवटचे दोन तास मतदानचे. मग दिवाळी आणि मग निकालानंतर जिंकलेला पक्ष दिवाळी साजरी करेल, विरोधी पक्ष मतदान कमी झाल म्हणतील आणि निवडणुकीचे आत्म्:चिंतन करत बसतील. परत ये रे माझ्या मागल्या. जर ते तसा नाही झाला तर उत्तमच पण ते जरा स्वपनवतच दिसतय.
आता निकालाची (फाइनल ची) वाट बघा जर चांगला आलाच तर छान नाही लागला तर काय ५ वर्ष वाट बघा की..अजुन काय?
lokshahi ek natak ahe kasli sandhi ani kasle 5 varshe ithe roj vicharanche ani tatvache khun hotat !