जोगवा…रीटा नंतर मी बघितलेला मराठी चित्रपट. खूप दिवसापासून जायचा जायचा म्हणत शेवटी आज मुहूर्त मिळाला मला. पण म्हणतात ना देर आए दुरुस्त आए. जोगवाची एकूणच कथा मन हेलावून टाकणारी.
सूलीच्या (मुक्ता बर्वे) केसात जट सापडली म्हणून तिला येलामा देवीच्या चरणी अर्पण करून जोगविण म्हणून आयुष्या जगावा लागता अशी प्रथा. तसेच तय्यापा (ऊपेन्द्र लिमये) ह्याला ही देवीला अर्पण करून जन्मभर लुगड घालून जोगवता म्हणून घेणारी प्रथा. खूप मन हेलावून गेला काही दृष्य बघताना.. सगळयांचा अभिनय उत्तम झालाय. बॅकग्राउंड स्कोर चा काम अजय-अतुल या दुकलिने नावाला साजेसच केला आहे. अतिशय प्रभावी गाणी, संगीत, संवाद, दिग्दर्शन, अभिनय असा सगळ्याच फ्रंट वर हा चित्रपट उजवा ठरतो.
हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट Oscar ची official एंट्री म्हणून निवडला गेला तेव्हा त्याची स्पर्धा जोगवा सोबत होती., मला माहीत नाही की “हरिश्चंद्राची फॅक्टरी” कसा असेल पण जोगवा एकदा बघायला हवाच. मी अभिनंदन करतो पूर्ण जोगावाच्या टीम चा.
एक झलक जोगवाची….
Actually a nice movie….but its too good….i did find it too hard to digest ,felt as if watching a marathi movie directed by anurag kashyap.
निव्वळ अप्रतिम सिनेमा आहे!!! प्रत्येकाने पाहयलाच हवा!!!
हो अश्या अंधश्रद्धा असतात आणि त्या कश्या निरर्थक आहे हे कळेल सगळ्याना…बघायलाच हवा
ATISHAY UTKRUSHT CHITRAPAT AAHE “JOGAVA”
PRATYEKANE JARUR PAHAVA .. ASACH CHITRAPAT AAHE
“DEVDASI” PRATHA KITI GHATAK AAHE HE UTTAMRITYA PATVOON DENYAT AALE AAHE
…. ANTARMUKH KARAYALA LAVNARA CHITRAPAT “JOGVA” … JARUR PAHAVA
‘हरिश्चंद्राची वारी’ नाय वो, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हाय नाव शिनिमाचं. आणि जोगवा आवडला मलाही. मस्तच आहे.
ओह्ह्ह टाइपो झाला 🙂 पण एक वर्षा आधीची चुक उकरुन दुरुस्त करण्यास सांगितलीस …धन्यवाद