“मराठी जनतेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला” – माननीय हिन्दुह्रुदय सम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे.
सामना मधील संपादकीय मधून मांडलेला कालचा अग्रलेख वरील शीर्षकाखाली प्रकाशित झाला. हे वाचून हसू की रडू असा झाला. शिवसेनेचा दारुण पराभव झाला निवडणुकीत. असा पराभव गेल्या २० वर्षात कधी झाला नसेल. त्याच चिंतन करायचे सोडून म.न.से. लाच आपल्या पराभवाचा कारण सांगत आपला पराभव हा मराठी माणसाचा आहे असा सांगत आहेत. काय म्हणायचा याला? बाळासाहेब सारखा एक मातब्बर राजकारणी नेते असा आरोप (?) कसे करू शकतात. उद्धवने ह्या निवडणुकीत चांगला प्रचार केला होता अगदी अनपेक्षित, पण कुठे तरी शिवसैनिक, सामान्य मतदार, आणि शिवसेनेचे नेते मंडळी ह्यात एक दरी निर्माण झाली. आणि ती दरी ते भरून काढण्यात ते अपयशी झाले. निवडणुकी साठी चिक्कार विषय आरोप होते त्याना सरकारवर करायला, पण ऐन निवडणुकीत त्यांच बोट फक्ता राजकडेच..बस. राज फॅक्टर हा महत्वाचा होता आणि आता राहिलाच हे शिवसेनेने लक्षात ठेवायला हवा.
युती सरकारने आता राज ठाकरे पेक्षा सरकारवर लक्षा केंद्रित केलेला बर. त्याना सलग तिसर्यांदा विरोधीपक्षाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. भाजप ने तर दोन जागा जास्त निवडून आणल्या शिवसेने पेक्षा ही अधिक लाजीर्वाणी गोष्टा झाली. आधी मराठी, मग हिंदुत्व , मग परत मराठी (राज मुळे) असे मुद्दे बदलत राहून शिवसेनेत एक प्रकारचा गोंधळ झालाय. शिवेसेना हा मराठी माणसाचाच पक्ष आहे पण त्याना थोडा काळानुसार राजकारण करावा लागेल. बाळासाहेब हे मराठी जनतेचे नेहमीच आदर्श राहतील, पण आता नवीन पिढी तेच बाळासाहेब राज ठाकरे मध्ये शोधू लागले आहेत. उद्धव ह्यांच काम खूप चांगला होताय दिवसेंदिवस, पण त्याना थोडी आक्रमकता आणायला हवी. राज ह्यानी तीन वर्षात जो करिश्मा करून दाखवाला त्याला तोड नाही. शिवसेनेला आता अधिक आक्रमक व्हाव लागेल, कारण राज हे तरुण पिढीचे बाळासाहेब झालेत आणि शिवसेनेच्या मूळ मुद्द्या वर म.न.से. प्रभावी आक्रमण केलय. कॉंग्रेस ला एक हाती सत्ता मिळाली आणि पुढची ५ वर्ष सोनियाच्या पायाशी हे राजकारण पायघड्या पाडणार… आता वेळ चिंतनची सगळ्यांसाठीच.