वाचू आनंदे…


इसवीसनपूर्व काळात गुगल बझ्झवर, मी एक धागा सुरु केला होता. त्यात तुम्ही वाचलेल्या पुस्तकांमधली  आवडलेली वाक्ये, उतारे याचा संग्रह करायचे ठरले होते. खूप प्रसिद्ध धागा होता तो आणि त्यामुळे अनेक नवीन-जुन्या पुस्तकांच्या आठवणीसुद्धा ताज्या होत होत्या. मग गुगल्याची बुद्धी फिरली आणि जी+ साठी बझ्झचा बळी दिला गेला, तो धागा बंद झाला…पण त्यात असलेली एक एक कमेंट मनात घर करून होती. आज शेवटी न राहवून तो धागा इथे ब्लॉगवर एक स्वतंत्र पानावर टाकतोय. सगळ्या जुन्या कमेंट्स कॉपी-पेस्टवतोय इथे. तुम्हाला त्यात भर टाकायची असेल तर प्रतिक्रियांमध्ये नोंद करावी. पुस्तके शक्यतो मराठी-हिंदी-इंग्रजी भाषिक असावी आणि पोस्ट करताना पुस्तकाचे/लेखकाचे नाव सुद्धा द्यावे ही विनंती…..  – सुझे !!!  🙂 

—    “It’s this: That at a certain point in our lives, we lose control of what’s happening to us, and our lives become controlled by fate.”   – The Alchemist

——————————————

—   कर्णा, या जीवनात साऱ्या इच्छा-आकांक्षा यांच हेच होतं. त्यांची स्वप्नं उराशी बाळगून सुबक देव्हारे आपण मनात तयार करीत राहतो; पण त्या इच्छा-आकांक्षा साकार होतात, तेव्हा त्यांनी वेगळाच आकार धारण केलेला असतो. त्यांच्यासाठी मनात कोरलेले देव्हारे पार अपुरे ठरतात आणि त्या देव्हाऱ्यांना शेवटी अडगळीचंच स्वरूप येतं..   – राधेय

——————————————

—   जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोप्प नाही.  – ययाति

——————————————

—   Wide acceptance of an idea is not proof of its validity   – Dan Brown (The Lost Symbol)

—  निरोप कधीही मंद गतीने घेऊ नये. त्यानं दु:ख वाढतं. निरोप शक्य तेवढ्या लवकर संपवावा…. – राधेय

——————————————

—  Everything is possible. The impossible just takes longer.”   – Digital Fortress…

——————————————

—  पुढे कधीतरी मी नास्तिक होत गेले आणि पक्की नास्तिक झाल्यावर त्याचा अभिमानही बाळगू लागले. आजही मी नास्तिकच आहे, अगदी पक्की. पण आज वाटते, नास्तिक्य ही अभिमान वाटण्यासारखी गोष्ट असली तरी त्यात मनःशांती मात्र नसते. आस्तिक्य हे बिनबुडाचे असते खरे, पण त्या अज्ञानात सुख नक्कीच असते. इथे सुखाचा अर्थ स्थैर्य, आधार, शांती असाही असेल. त्यामुळे मला माझ्या नास्तिक्याचा अभिमान असला तरी आस्तिकांचा हेवा वाटतो. आणि दुर्दैवी गोष्ट अशी की आस्तिक माणूस हा विचारान्ती पुढे नास्तिक होऊ शकतो, पण खरा नास्तिक हा आस्तिक कधीच होऊ शकत नाही.  – सुनिताबाई (आहे मनोहर तरी)

——————————————

—   As you write more and more personal it becomes more and more universal – पार्टनर

——————————————

—  “आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे हाच नरक…!!” – पार्टनर

——————————————

—   प्रतिष्ठेचा आकार लहान-मोठा नसतो. फक्त तेजस्वी असावा लागतो.. – राधेय

——————————————

—   घराघरांच्या भिंती बोलू लागल्या आणि मानवी जीवनातले अव्यक्त ते व्यक्त होऊ लागलं….
‘केवळ काटकोनात आपल्याला उभं केलंय म्हणून आपल्याला भिंत म्हणतात. आपली माती एकच आहे. अंतरंग आणि बहिरंग ह्यात फरक नाही आपण कुणाचही विभाजन करीत नाही. माणसांनी त्यांच्या सोयीसाठी खोल्या केल्या. आपण त्यांना साथ दिली. माणसंही माणसांना एवढी साथ देत नाहीत. माणसामाणसांमधले हे व्यवहारच कळत नाहीत…अहंकार नात्यानात्यांत गैरसमज निर्माण करतो. तुमची मैत्री जीवापाड असेल तर गैरसमज निर्माण होण्याचे काहीच कारण नाही. मैत्रीतच सुरक्षितता वाटली पाहिजे. भिंतीमध्ये ओल आली म्हणजे माणसं आर्किटेक्ट, इंजीनियर सगळ्यांचे सल्ले घेतात. जगातला कुठलाही इंजीनियर ठराविक ठिकाणी ओल का येते, हे सांगू शकणार नाही. कारण ते असतात भिंतीचे अश्रू !!!!’  –  व. पु. काळे.

——————————————

—  जे रणांगणावर लढतात, ते कधी त्याबद्दल बोलत नाही; आणि ज्यांनी रणांगण पाहिलेलं नसतं, ते सदैव रणांगणाच्या कथा सांगण्यात रमतात, म्हणून तर त्या कथांना एवढा रंग चढतो. रणांगणाचा रंग कधी गुलाबी नसतो. तो थिजल्या रक्ताचा गर्द तांबडा रंग असतो. विजयाबरोबर तिथे हास्य प्रगटत नाही. घायाळ वीरांच्या वेदनांनी ती रणभूमी आक्रोशत असते. विजयानंतरही त्या भूमीवर तो मृत्यू घोटाळत असतो, त्याच्या शांत पावलांचा आवाज फक्त विजयी वीरालाच ऐकू येत असतो…  – राधेय

——————————————

— १३ फेब्रुवारी १९८८ ची थंडगार धुकेरी सकाळ. समुद्र आज फारच खुशीत दिसतो आहे. धुक्याने आणि पांढुरक्या ढगांनी आकाश खाली आले आहे. समुद्र आणि आकाशातले अंतर कमी झाले आहे. बघता बघता त्या देखाव्याची झाली एक सुंदर शिंपली. वरचा भाग आकाशाचा नि खालचा समुद्राचा. क्षितिजापाशी तिचा सांधा होता नि ते पांढरे पाणपक्षी मोत्याच्या दाण्यासारखे भासत होते. आज त्या शिंपलीत आनंदाचे मोती पहुडले होते नि तो आनंद मला स्पर्शत होता. खूप तलम जागृती नि अभंग तंद्री त्या आनंदमय भानात भरली होती. क्षणभर मी जन्माची तृप्त झाले. होय! मी जन्म पहात होते प्रत्यक्ष आनंदाचा, सावळा समुद्र नि धूसर आकाशाच्या अर्धोन्मीलित शिंपलीतील श्यामल आनंदाचा.. – दुपानी – दुर्गा भागवत

——————————————

— “When someone makes a decision, he is really diving into a strong current that will carry him to places he had never dreamed of when he first made the decision.“  – The Alchemist

——————————————

— It was nice to be alone, not to have to smile and look pleased; a relief to stare dejectedly out the window at the sheeting rain and let just a few tears escape.  Bella – Twilight

——————————————

— प्रत्येक माणूस फार फार एकटा असतो…, त्याच्या स्मृती आणि त्यानं जतन केलेल्या आठवणी त्याच्या श्वासोच्छवासा इतक्या त्याच्या एकट्याच्या असतात. जशा आठवणी त्याच्या एकट्याच्या, तशाच त्याच्या चिंताहि आणि चिताही…. – व.पु.

——————————————

— किल्ल्यावर जावंच कशाला?

या प्रश्नाला उत्तर एकच, “किल्ले आहेत म्हणुन तेथे जावं.” पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजेआपल्या भुगोलाला पुढील अनेक पिढ्यांनी गौरवानं-अभिमानानं सांगावं असा इतिहास जिथंघडला तिथं जाणं अगत्याचं आहे, प्रत्येक महाराष्ट्रीकाचं ते आद्य कर्तव्य आहे. पण तिथंजाताना तिथल्या इतिहासाची आपल्याला जाणीव हवी. नाहीतर आज तिथं दिसतीलढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, पडलेली तटबंदी अन ओहोरलेली टाकी. पण हीच ती ठीकाणे जिथे इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले आहेत. जगण्यातला अर्थत्यांच्या मरणाने आपल्याला मिळाला आहे. उत्तरेकडचे किल्ले धड उभे आहेत. त्यांच्यादगडादगडावर कोरीव काम आहे अन आतल्या भिंती, वाडे, दालने शाबुत आहेत. पण त्याची किंमत..? अर भयानक किंमत देऊन हे सारं टिकवलं गेलं आहे! आपल्यामुलीबाळी परधर्मीय जुलमी सत्ताधिशांच्या घरी लोटाव्या लागल्या. नावांत सिंह अनकिताबाने राजे असणारे या किल्ल्याचे माल्क आपली धनदौलत, अब्रु आणि मुख्यम्हणजे स्वातंत्र्य त्या सत्तांध – धर्मांध सुलतानांकडे गहाण टाकुन आले होते. म्हणुन हे असे राहिले! शोकेसमध्ये ठेवलेल्या या नटव्या बाहुल्याच. पण महाराष्ट्रातल्या या रांगड्या किल्ल्यांच तसं नाही. इथले भग्नावशेष हीच या किल्ल्यांची महावीर अन परमवीर चक्रं आहेत.

ज्याला आपण दुषण देतो तीच त्यांची भुषणं आहेत. आपल्या लढाऊ परंपरेची ही जिवंत स्मारकं आहेत. अगदी १९१८ च्या शेवटच्या इंग्लिश-मराठे युध्दातही सिंहगड, वासोटा, रायगडचे किल्ले भांडवल केले गेले. त्यात त्यांच नुकसानझालं. एकावर एक दगड ठेवुन हे किल्ले बांधले नाही गेले. मानसांची मने त्यांशी जखडली गेली होती. हे सारं दुर होण्यासाठी डिकीन्सन आणि एतरांनी बुध्द्याच हे किल्ले ढासळवुन टाकावेत, किल्ल्यावर जाण्याचे मार्गच तोडावेत व स्वातंत्र्याची कारंजी मुळात नष्ट करावीत असे मनी धरुन मोहिम मांडुन हे उध्वस्तीकरण केले. काही प्रमाणात इंग्लिशांना त्यात यशही आले. पण घामाचा पाऊसपाडुन अन रक्ताचा सडा शिंपुन ही दुर्गपुष्पे इये देशी वाढवली गेली-टिकवली गेली हे विसरुन चालणार नाही !  – साद सह्याद्रीची… भटकंती किल्ल्यांची — श्री. प्र. के. घाणेकर

——————————————

—   सारी भूमिती मी इंच-इंच लढवत शिकलो. कंपासमध्ये डिव्हायडर नावाची एक वस्तू असे.
माझ्या आणि गणिताच्या शिक्षणात फूट पाडण्यापलिकडे या डिव्हायडरने काहिही साधले नाही. – पु. लं. चा ‘बिगरी’ ते ‘मॅट्रिक’ प्रवास

——————————————

— What we think of as our sensitivity is only the higher evolution of terror in a poor dumb beast. We suffer for nothing. Our own death wish is our only real tragedy.  – Mario Puzo  (Godfather)

——————————————

— Patriotism is your conviction that this country is superior to all others because you were born in it.  – George Bernard Shaw

——————————————

—  When you have eliminated the impossible, whatever remains, however improbable, must be the truth’  – Sherlock Holmes

——————————————

—  Nobody is indispensable . Cemetery is full of such people, those who thought themselves indispensable – पार्टनर

——————————————

—  औरंगजेब -: वजीर – ए – आजम , तुम्हाला ठाउक आहे या मरगठ्ठ्यांच्या जाती किती??
वजीर – ए – आजम -: माहित नाही जहापनाह असतिल ९६-९८

औरंगजेब – : नाही, यांच्या जाती फक्त दोनच. एक ते जे वतनासाठी आणि स्वःताच्या स्वार्थासाठी सवःताच्या आईशीही गद्दारी करतिल आणि दुसरी ही या शिवबा आणि संभासारखी जी मातीची अब्रु वाचविण्यासाठी स्वःताचं रक्त वाहतिल.  – संभाजी

——————————————

— आपल्यासाठी दुसर्‍याच्या डोळ्यात आलेले अश्रु पाहण्यात अपूर्व आनंद असतो. नुसता आनंदच नाही मोठा धीर असतो त्या अश्रुत. – ययाति

——————————————

— भोगाची आसक्ती म्हणजे जीवन. भोगांचा त्याग म्हणजे मृत्यू !! – राधेय

——————————————

— आपल्याबद्दल एखाद्याला विश्वास वाटतो ही सुखावणारी भावना;आणि अस्वस्थता वाटते कारण तो विश्वास सार्थ ठरवण्याच्या जबाबदारीची जाणीव …. वपुर्झा

——————————————

— खर्च झाल्याचे दु:ख नसतं… हिशोब लागला नाही की त्रास होतो. – वपुर्झा

——————————————

— दु:खानेच प्रीतीची वाढ व्हावी असा मानवजातीला शापच आहे का? –  दोन मने ( वि.स. खांडेकर )

——————————————

—  वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते तेव्हाच ती अमृतवेल होते. – अमृतवेल

——————————————

— प्रत्येक माणूस आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो पण तो दुसरयाला लागलेल्या ठेचांनी नव्हें तर स्वताला झालेल्या जख्मांनी…. – ययाति

——————————————

— धर्म, पांडित्य हे दुसरयाना सांगायला सोप्प ;पण ते स्वत: आचरण भारी क्लेशकारक होत …. – राधेय

——————————————

— Behind great fortune there is a crime.- Mario Puzo (The Godfather)

——————————————

—  एखादा माणुस ‘वाईट का वागतोय’ याचं कारण आपण कधीच शोधायला जात नाही. पण तोच माणुस चांगला वागायला लागला तर तो ‘असं का करतोय’ हे कळेपर्यंत जीवात जीव येत नाही. – धुंद रवी 

——————————————

— If you guys were the inventors of Facebook, you’d have invented Facebook.  – Mark Zuckerberg (The Social Network)

——————————————

— “When one person suffers from a delusion, it is called insanity. When many people suffer from a delusion it is called a Religion.” – Robert M. Pirsig (Zen and the Art of Motorcycle Maintenanc)

——————————————

—  अखिल हिंदी लोकांचे जे ध्येय त्याच ध्येयासाठी जर आम्ही हातात शस्त्र घेतले तर आम्ही अत्याचारी झालो? तुमच्यासाठी जे लोक फासावर गेले त्यांना तुम्ही अत्याचारी व माथेफिरु म्हणता? आमचा माथा फिरला म्हणून तर हा देश फिरला आहे !  – समग्र सावरकर वाङ्मय

——————————————

— दररोज- दर घटकेला- क्रौंचपक्ष्याचे जोडपे हे जगातल्या निष्पाप जीवांचे प्रतीक आहे. जगात क्षणाक्षणाला लाखो निरपराध जीवांची हत्या चालली आहे. पक्ष्यांच्या सुखी जोडप्याला दु:खी करणारा पारधी आणि आजच्या जगातील सत्तांध नेते हे दोघे सारखेच क्रूर आहेत. बुद्धी आणि सत्ता एकत्र आल्याने माणसाच्या सहृदयतेची हत्या झाली आहे. बुद्धीबरोबर माणूस भावनेचा विचार करु लागेल तर हा क्रौंचवध नक्कीच थांबेल.- क्रौंचवध (वि. स. खांडेकर)

——————————————

—   विदूषकाचं दु:ख हीदेखील हसण्यावारी नेण्याची गोष्ट असते… – शिरीष कणेकर

——————————————

—  I cannot think of a better way to spread the faith. No thundering from a pulpit, no condemnation from bad churches, no peer pressure, just a book of scripture quietly waiting to say hello, as gentle and powerful as a little girl’s kiss on your cheek. – Life of Pi

——————————————

—   या देशाचे दुर्दैव आहे कि विवेकाच्या आधारावर उभी राहिलेली कोणतीही चळवळ येथे यशस्वी होत नाही. एखादी चळवळ यशस्वी व्हायला यांत्रिक प्रदर्शन, उदा. पायी चालणे, लंगोटी नेसणे, केस वाढविणे, उपोषण करणे, खाण्यापिण्याचे विलक्षण नियम पाळणे असाह युक्त्यांनी येथे व्यक्तिमत्व निर्माण होते – उपेक्षित योगी (मधुसूदन गोखले )

——————————————

— Truth is a bully we all pretend to like – Shantaram

——————————————

—  When you want something, all the universe conspires in helping you to achieve it.. – The Alchemist 

——————————————

—  तुकारामबुवांनी हजारो ओळी लिहिल्या असतील; पण ‘आलिया भोगासी असावे सादर’ ह्याला तोड नाही. अभंग वगैरेमुळे भलता ‘पब्लिक’ होऊन गेलेला साहित्यिक. आता त्या काळच्या समीक्षकांनी त्यांची कविता नुसतीच ‘पॉल्युलर’ कविता आहे असे म्हणून त्याला साहित्यिक समीक्षेच्या कसोटीला न उतरणारा अभंगलेखक ठरवला असला तरी देवळादेवळांतून, जत्रेच्या फडांत वगैरे ‘कवी, संगीतदिग्दर्शक तुकाराम देहूकर’ अशीच जाहिरात होत असणार. अशा रीतीने पॉप्युलर झाल्यावर तुकोबाच्या नशिबी पब्लिक माणसाचे सारे भोग आल्याशिवाय कसे राहतील ? तरी बरे, त्या काळी रेडिओ नव्हता. वर्तमानपत्र नव्हते. नाही तर ‘देहूसमाचार’च्या प्रतिनिधीने ‘शिवाजीमहाराजांच्या अष्टप्रधानांच्या नेमणुकीबद्द्ल आपले काय मत आहे ?” येथपासून “महाराष्ट्रातल्या किराणा-भुसाराच्या व्यापारात ( आपण पडलात तसेच ) पडावे का ?” येथपर्यंत नाना प्रश्न विचारले असते. ‘दिवाळी अंकासाठी नवे अभंग लिहावे. पांडुरंग वगैरे पुष्कळ झाले….’ अशी पत्रे आली असती. तुकारामाच्या आवलीची महिलांच्या मासिकात ‘आमचे हे : एक ध्यान’ ह्या विषयावर मुलाखात छापून आली असती. साहित्यिक तुकोबांच्या काळात हे ‘भोग’ नव्हते. तरीही ‘आलिया भोगासी असावे सादर’ ही ओळ त्यांनी लिहिली. – अघळपघळ (पु. ल. देशपांडे)

——————————————

— “Everything tells me that I am about to make a wrong decision, but making mistakes is just part of life. What does the world want of me? Does it want me to take no risks, to go back to where I came from because I didn’t have the courage to say “yes” to life?” – Paulo Coelho (Eleven Minutes)

——————————————

—  ‘हवे ते मिळवीन, पराकाष्ठेचे परिश्रम करीन, परिस्थितीसमोर पाय रोवून उभा राहीन, विरोध करतील त्यांच्याशी निकराचे भांडण करीन, वाकणार नाही, मोडणार तर मुळीच नाही. आजूबाजूला कर्ती माणसे जमवीन, त्यांना ध्येय देईन, तिथे पोहोचायला उद्दुक्त करीन आणि एक उत्तम विजय मिळवीन. जे जे माझ्याबरोबर असतील, त्यांच्या जीवनाचे सार्थक करीन…’ – माझी कॉर्पोरेट यात्रा (रमेश जोशी)

——————————————

— नेत्रांतून अश्रू सांडले म्हणजे माणसाचं दुःख वाहून थोडचं जात असतं?? अश्रू सांडल्यामुळे मनातल्या मनात दुःखाला वाट मोकळी होते एव्हढचं !!!  – हसरे दुःख – भा.द. खेर.

——————————————

—   स्पर्श न करताही आधार देता येतो हे ज्याला कळतं त्यालाच पालक शब्द समजला… – वपु 

——————————————

—  नकार देणे ही कला असेल.. पण, होकार देऊन काहीच न करणे , ही त्याहून मोठी कला आहे. ” – वपु

——————————————

— उथळ विचारांची माणसं देवावर आणि दैवावर विश्वास ठेवतात, शहाणी आणि समर्थ माणसं कार्यकारणभावावर विश्वास ठेवतात.. अस्थिर माणसं जशी बारमधे सापडतात तशी सिद्धिविनायकाच्या रांगेतही..अर्थहीन श्रध्दा ही व्यसनासारखीच…. वपु

——————————————

— स्वत:चा पराभव जेव्हा स्वत:जवळ मान्य करावसा वाटत नाही तेव्हा डोळ्यांतुन  येणार पाणी पापणीच्या आत जिरवायचं असत.” …. वपु

—  “It is not to be forgotten that what we call rational grounds for our beliefs are often extremely irrational attempts to justify our instincts.”….. Thomas Huxley

——————————————

—  If the facts don’t fit the theory, change the facts !! -Edison

——————————————

— खरा संसार हा एकाच दिवसाचा आणि एकाच रात्रीचा असावा. बाकी पुनरावृत्ती असते. माणूस खरं तर सहज सुखी होऊ शकेल. सुखी होणं हे एवढं दुर्मिळ नाही. अहंकार सोडावा, आणि जगातल्या चांगुलपणावर नितांत श्रध्दा ठेवावी. सुख दाराशी हात जोडून उभं राहील. पण तसं होत नाही. माणसं खळखळून मोकळी होत नाहीत. गप्प राहतात. सहन करतात. ही माणसं, ह्या व्यक्ती काय गमावतात, काय मिळवतात हे फक्त त्यांनाच माहीत. मोहावर जेव्हा ही मंडळी मात करतात तेव्हा त्यांच्या त्या यशाला सत्काराचे हार नाहीत आणि पराभवाच्या दु:खाला सांत्वनाचा स्पर्श नाही.”  – वपु

——————————————

— तेरे जाने का असर कुछ ऐसा हुआ मुझपे, तुझे ढुंढते ढुंढते, मैने खुद को पा लिया…अनामिक  – I Too had a love story

——————————————

— “What this power is I cannot say; all I know is that it exists and it becomes available only when a man is in that state of mind in which he knows exactly what he wants and is fully determined not to quit until he finds it.” -Alexander Graham Bell

——————————————

— The gods throw the dice, and they don’t ask whether we want to be in the game or not. They don’t care if when you go, you leave behind a lover, a home, a career, or a dream. The gods don’t care whether you have it all, whether it seems that your every desire can be met through hard work and persistence. The gods don’t want to know about your plans and your hopes. Somewhere they’re throwing the dice – and you are chosen. From then on, winning or losing is only a question of luck.  – Paulo Coelho.

——————————————

— There were few successes in the treatment of disseminated cancer……It was usually a matter of watching the tumor get bigger, and patient, progressively smaller. – The Emperor of all Maladies A biography of cancer —-by Siddhartha Mukherjee 

——————————————

— “होय. त्या ‘महाराजा’ आगबोटीवर जन्मठेप्याचे चढणे म्हणजे प्रेताच्या तिरडीवर जिवंतपणीच बांधले जाणे होते. आजपर्यंत जे शेकडो हजारो जन्मठेपी अपराधी त्या भयंकर बोटीवर चढून काळेपाण्याकडे गेले त्यातून हजारी दहाही जिवंतपणी देशास परत येऊ शकले नाहीत. १८-२० वर्षाची चढत्या तारूण्याची पोरे त्या जहाजावर पाय टाकताच ८० वर्षाच्या म्हातार्‍यासारखी प्रेतकळा आलेली दिसू लागत. मनुष्य एकदा तिरडीवर बांधला गेला म्हणजे, जसे त्याचे आप्तेष्ट तो या जगातून कायमचा जात आहे म्हणून समजतात आणि त्या भावनेने दुःखित, विस्मित वा स्तिमित होऊन शून्यपणे, त्याच्या त्या प्रेतयात्रेकडे पाहतात, त्याचप्रमाणे काळेपाण्यास जाणार्‍या त्या बोटीवरील जन्मठेपी चढू लागले, म्हणजे लोक ते स्वदेशास मेले असे समजून त्यांच्याकडे शून्यपणे पाहत उभे राहात, तसेच माझ्याकडेही ते पाहत होते. मी या जगतास मेलो, अशी भावना त्यांच्या मुद्रेवर स्पष्ट उमटलेली होती आणि ती खरी होती. मी खरोखरच तिरडीवर चढवला जात होतो. फरक इतकाच की मी तिरडीवर बांधला जात आहे आणि माझी प्रेतयात्रा निघत आहे हे मला कळत होते. हे ही कळत होते की, जे शेकडो लोक मजकडे पाहत आहेत यात बहुतेक निर्ममत्व व उदासीनपणेच पाहणारे आहेत. जसे मार्गावरून चालता चालता आकस्मिक कोणाचे तरी प्रेत जाताना आपण क्षणभर “मेला वाटते कोणी तरी” असे म्हणत पहात पहात उभे राहून पुढे चालते होतो ! आणि त्या वेळेस मी प्रेत होत आहे या कळण्यापेक्षा हजारो देशबांधव ‘आ’ करून मजकडे नुसते पाहत उभे आहेत या कळण्याचेच मला अधिक दुःख वाटले. त्यातील एक तरी मनुष्य मला असे सांगता, ” जा, बंधो जा ! तुझ्यामागे मी आणि आम्ही तुझ्या व्रताचे पारणे फेडून या आपल्या हिंदुस्थानास……………” तर माझ्या तिरडीची तेथल्या तेथेच फुलांची सेज झाली असती !” – माझी जन्मठेप (स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर)

——————————————

— तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified. My dear boy, whose deaths are justifiable? ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे. – (पुस्तकातलं नाहीय, पु.लं.च पत्र आहे)

——————————————

— माणसं चुकतात, चुकांविषयी ऐकतात, शिकत मात्र काही नाही….. ययाती

——————————————

— नीट विचार कर बाळ. विश्वाच्या या विराट चक्रात तू आणि मी कोण आहे? या चक्राच्या कुठल्यातरी अरुंद पट्टीवर क्षणभर आसरा मिळालेले दोन जीव! दोन दवांचे थेंब, दोन धुळीचे कण! स्वत:च्या तंद्रीत अखंड भ्रमण करणारे हे अनादी, अनंत चक्र तुझ्यामाझ्या सुखदु:खाची कशी कदर करू शकेल??? – अमृतवेल (वि.स.खांडेकर)

——————————————

— एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे. कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही, तसचं कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्म राहीलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला ‘बाळपणीचा काळ सुखाचा’ स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याला कळलचं नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटीदांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही.

त्या उडणा~या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत.  – वपुर्झा

——————————————

— नाइन्थ फील्ड कंपनीत मिनूचं काम होतं की नाहि ते माहित नाहि. मात्र तेथुन पुढं डिटॅचमेंट थ्रीला तो विश्वनाथला सोडायला आला. कालचीच ओळख पण अगदि पूर्वापार जानी दोस्ती असल्यासारखी. विश्वनाथ एकटाच राहणार आहे म्हणुन त्यानं उंची व्हिस्किची छोटि बाटली आणलेली.

“दोस्त, हि जागा मोठि सुरेख आहे.” खोलीची पहाणी करत मिनू म्हणाला. तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या ह्या खोलीत त्याला काय छान दिसलं ह्याचा विश्वनाथला अंदाज येईना. त्यानं विचारल तसं मिनू हसुन म्हणाला “हनीमूनला अशी जागा शोधुन सापडणार नाहि. हा इथला एकांत, नि:शब्द शांतता, दूरवर दिसणारा किन्नोर कैलास, एका बाजुला रारंग ढांग….आणि खालुन वाहत जाणारी सतलज. निळ्या निळ्या आकाशाखाली, खुल्या निसर्गाच्या सान्निध्यात नुकतं लग्न झालेली पण अद्याप प्रियकर आणि प्रेयसी असलेली फक्त दोघं जण! आलीच तर पावसची एखादि सर! उफ, अश्या भिजलेल्या ओल्या ओठांच तू कधी चुंबन घेतलं आहेस? – नाहिऽऽ?? अरे दोस्ता, त्याइतकं सौदर्याच दुसरं ऍप्रिसिएशन नाहि. प्रेमाला दिलेलं दुसरा इतका मोठा कॉंम्ल्पिमेंट नाहि!!”

विश्वनाथ नुसता हसला. विव्हल होत मिनू म्हणाला “दोस्ता, हसु नकोस. चुंबना बाबत आपण बोलतो आहोत. काहि जणी चुंबन घेतलं कि लाजुन लाल होतात, काहि रागावतात, काहि चावतात, काहि मारतातहि. ह्या सर्व परवडल्या. पण तुम्हि भावनेच्या आवेगात, भान हरपुन चुंबन घेतलत कि काही चक्क हसत सुटतात. ह्या इतकि दारुण फजिती दुसरी कोणती असेल? तेव्हा तु तरी हसु नकोस.” – रारंग ढांग (प्रभाकर पेंढारकर)

——————————————

—  सर्व खटाटोप करणं सार्थकि लागलं असं वाटाण्या जोगी हि नारळांची आणि तांदळाच्या पिठाची चीज बनली होती. पुटुची चव अफलातुन जमली होती.
तोंडात घातलेला मोठा तुकडा खात विश्वनाथनं विचारलं,
“तुम्हांला कशी काय हि केरळातली चीज माहित?”
केरळ…लॅंड ऑफ लगुन्स….लॅंड ऑफ गोल्डन पाम…ऍंन्ड लॅंड ऑफ कथकली – एवढचं वर्णन टूरीस्ट गाईडमध्ये केरळच दिलं असतं. अत्यंत अरसिक, कल्पकताशून्य लोक सरकारी नोकरी धरतात आणि वर चढतात. त्यांनी लिहिलेलं वर्णन हे त्यांच्यासारखच रुक्ष आणि साचेबंद.”
“तुम्हाला कसा दिसला केरळ?” विश्वनाथनं विचारलं.
“केरळ – माझ्या डोळ्यातुन पहायचा आहे तुला? केरळ लॅंड ऑफ पुटु ऍंड दि लॅंड ऑफ मुंडु!”
“मुंडु? हे काय प्रकरण आहे?”
“दॅट्स इट! ह्या वर्णनाबरोबर उत्सुकता जागी झाली पाहिजे. हा काय पदार्थ आहे? पहायचा? ऐकायचा? खायचा कि अनुभवायचा? पुटु तुला खायला इथे मिळाला पण मुंडु साठि तुला केरळलाच गेलं पाहिजे. mundu has made Keral the land of beauties!”
मिनू हवेत तरंगल्यागत बोलू लागला. त्याचे पाय जमिनीवरुन सुटले होते हे खरं, पण ते केरळच्या आठवणीमुळे कि त्यानं नुकत्याच रिकाम्या केलेल्या रमच्या चवथ्या ग्लासमुळे, विश्वनाथला समजेना.
“सुकुमारन नायर…. ह्या विशुला सांग… what is mundu..? mundu in chirikal!”
“नाहि. मी चिरीकलला कधी गेलो नाहि.”
“अरेरे सुकू, मग तु कसला केरळचा? फुकट फुकट घालवलस तू आजवरचं आयुष्य! दोस्ता ग्लास भर जरा….ह्या चिरीकलीच्या आठवणीनं नशा आला, त्यात थोडि इथली रम मिसळु दे. चिरीकल….एक छोटसं खेडं. समुद्रकिनारी वसलेलं! तिथल्या मोपला मुली. संध्याकाळाची वेळ. नदिवरुन परतत आहेत. कमरेवर भरलेली घागर….अंगात लांब हातांचा ब्लाऊज. चिटाच्या कापडाचा, मोठ्या डिझाइनचा. डोक्यावर सफेद रुमाल आणि खाली लुंगी…केरळच्या भाषेत ’मुंडू’!”

विश्वनाथ थक्क झाला. मुंडू म्हणजे लुंगी हे त्याला कल्पनेतही वाटलं नव्हतं. केरळच्या खेड्यात हरवलेला मिनू पुढं सांगु लागला,
“ह्या लुंगीच्या दोन्हि कडा समोर आलेल्या. ह्या कडा चालताना उघड्या पडतात; कधी कधी पाय पुढं लुंगी मागुन येते. हात कमरेवरची घागर सावरण्यात गुंतलेले. कधी जोराचं वार येतं. लुंगी उडते, गोरे गोरे पाय, नाजुक पण भरलेल्या पोटर्‍या….असच जोरदार वारं येईल तर… नजरेत सगळी उत्सुकता दाटते. पण दोस्त. झंझावात आला तरी मुंडू तिथच. वर सरकतच नाहि. This far & no further! म्हणुनच त्या मुंडूच आकर्षण कधी कमी होत नाहि. मिनी मॉड स्कर्ट आले आणि गेले…पण मुंडू तो मुंडूच!”
बोलता बोलतामिनू विश्वनाथ जवळ आला. खांद्यावर हात ठेवत त्यानं विचारलं, “विशू, दोस्त, चल येतोस केरळला?”
“चला…”
मिनू खुर्चीवर बसला. रमचा ग्लास उचलत तो म्हणाला, “पण येऊन काय करणार तु? ह्या रारंग ढांगाच ओझ तुझ्या डोक्यावर! आणि त्यापलीकडं स्वत:च्या सात्विकतेचं, सज्जनपणाचं ओझ! ते विसरायला जमायच नाहि तुला!”
मिनूनं ग्लास अर्धाधिक रीकामा केला. धुंद डोळ्यांनी विश्वनाथकडे पाहत त्यानं विचारलं –
“दोस्ता, खर सांग, कधी वडिल माणासांचा डोळाअ चुकवुन सिगरेट ओढलीस?”
“नाहि!”
एकदा तरी ड्रिंक घेतलस, किमान बिअर तरी?”
“नाहि.”
“कुणाच्या मिठीत, काळ्याभोर केसांच्या धुंद वासात स्वत:ला हरवुन गेलायस?”
“नाहि.”
“लाल-गुलाबी, नाजुक ओलसर ओठांचा हलकेच मुका घेतलायस?….नाहि? बर, निदान कधी कुणावर तुझ्यासारख्या पथ्यकारक प्रकृतिला मानवेल असं प्लॅटॅनिक प्रेम तरी केलयस?”
“अद्याप तरी नाहि.”
“मग शहाण्याऽऽ ती उमा कोण???”
ह्या एकदम अनपेक्षीत प्रश्नानं विश्वनाथ चक्रावलाच. आजच आलेलं उमाच पत्र त्याच्या शर्टाच्या खिशात होतं. ते पाहिलं कि काय ह्याने?
चाचरत त्यानं प्रश्न केला – “कोण उमा??”
“तुला माहित नाहि उमा कोण ते? ठिक आहे! मी सांगतो, जे. जे. स्कूल ऑफ आर्टची विद्यार्थीनी. गोरीपान, गुलाबी कांतीची, लाजर्‍या डोळ्यांची! माहित नाहि तुला?”
विश्वनाथ पार गडबडुन गेला. “खरच तुमची नी तिची ओळख आहे?”
मिनू हसला आणि म्हणाला “मुंबईतली कोणती मुलगी आहे, जी दिसायला सुरेख आले आणि मला माहित नाहि?” बोल, आणखि तिची काय माहिती पाहिजे तुला?
ह्या प्लेबॉय पारश्याची आणि तिची ओळख कशी? हे कोडं विश्वनाथला सुटेना. मनात प्रश्न अनेक पण बाहेर एकहि येईना. त्याच्या मनातल बरोबर ओळखल्या सारख मिनू म्हणाला –
“तिची माझ्याशी ओळेख कुठे झाली, कशी झाली, ऐकायचय? – तिची माझी ओळख काल झाली. इथं हिमालयात झाली.”
“म्हणजे?”
“ए चक्कर, तुझ्या खोलीत त्या चित्राखाली ठणठणीत अक्षरात लिहिलय – ’उमा’.”
“म्हणजे गोरीपान, लाजरी……”
“ज्यांच्या प्रेमात तुझ्यासारखे भाबडे तरुण पडातात अशा नव्वद टक्के मुली गोर्‍यापान असतात, लाजर्‍या असतात, पण त्यांचे डोळे मोठे बोलके असतात. आणि ह्यापैकी काहिही नसल्या तरी तुझ्या सारख्यांना निदान त्या तशा वाटतात. हे तसं वाटण म्हणाजे प्रेमाच पहिलं लक्षण आहे.”
“पण मी कुठ सांगितलं कि मी तिच्या प्रेमात पडलो आहे?”
“पडला नसलास अद्याप तर मग पड! आणि काय रे? तिच्या प्रेमात पडला नसतास तर ते समुद्राच चित्र कशाला आणालस? सत्यसाईबाबाचं आणायच होतस!”
“ते चित्र चांगल आहे!”
त्यापेक्षा ते तिने काढलय हे खर कारण आहे. तुला पटायच नाहि. अस कर उठ इथुन. ती क्वीन्सची बाटली घेऊन ये. अख्खी पाजतो तुला ती पोटात गेली कि तुझ्या तोंडुन जे मनाच्या तळाशी असेल ते बाहेर येईल ते तुला ऐकवतो. तुझा स्वत:चाच तुला परीचय होईल!”
मिनू नशेतहि फार मोहक मिस्किल हसला.
“तू असं कर त्या क्वीन्स च्या बाटलीतली दारु बाहेर ओतुन टाक. स्वच्छ पाणी भर आणि त्यात मनी प्लॅंट किंवा एखादं फुलझाड लाव.अन त्या हिरव्या पानाकडं किंवा एखद्या कळी कडे कौतुकान बघत बैस. तेव्हढच तुला झेपेल. कारण प्रेमाला सामोर जायला मोठ धैर्य लागतं. प्रीतीची बेहोशी अनुभवायला दिल लागतो दोस्त! तो असता तर तर पहिल्या रात्री मी सांगितल होतं ना, डिटॅचमेंट थ्री मधली तुझी खोली हि मधुचंद्र साजरा करायला योग्य जागा आहे हे तु उमाला लिहिल असतस आणि विचारलं असतस “येतेस का? मी वाट पाहतो आहे!” दोस्त तुझ्या त्या दोन ओळींच्या पत्रावर तिनं आयुष्य झुगारुन दिलं असतं.”  – रारंग ढांग (प्रभाकर पेंढारकर)

——————————————

—  अंधारात आपणच अंधार होऊ शकत नाही – कोसला (भालचंद नेमाडे)

——————————————

33 thoughts on “वाचू आनंदे…

  1. बेस्टच.. खजिना आहे हा तर !

    रच्याक, माझ्याही डोक्यात आलं होतं काल की आपला मटाचा बझ ब्लॉगवर टाकून ठेवला पाहिजे म्हणून 🙂 बघू टाकतो लवकरच.

    1. धन्स रे हेरंब….

      मी तुला मागेच बोललो होतो, तो बझ्झ ब्लॉगवर कायमस्वरूपी टाकून ठेव. थोर बझ्झ आहे तो 🙂 🙂

  2. प्रत्येक वेळेला रडणाऱ्याचे सांत्वन करता येत नाही…अर्थात रडणाऱ्याला त्याची जाणीव नसते…केव्हाही आपले डोळे कोरडे करायला आपली आवडती व्यक्ती जवळ यावी असं तिला वाटत….पण काही वेळेला रडणाऱ्या माणसापेक्षा सांत्वन करणाऱ्या माणसावरच जास्त पण पडतो…………ज्योतीपेक्षा समई जास्त तापत नाही का…???

    – वपु

  3. जीवन इतके अनंतरुप आहे की अगदी संपूर्णपणे माझ्यासारखेच आयुष्य असलेला माणूस पूर्वी कधी झाला नाही व पुन्हा कधी होणार नाही. त्या दृष्टीने प्रत्येक सामान्य माणूस देखील अद्वितीय असतो.

    – जी.ए.कुलकर्णी (“कुसुमगुंजा”तून “निरोप”)

  4. ‘या जगात जपावे तेवढे थोडेच. ठायी ठायी मोहक मोह आहेत. कोसळावयास कडे आहेत. शक्यतोवर जपावे, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावे, आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते. सदैव सावध राहिले पाहिजे.’

    — साने गुरुजी (श्यामची आई )

  5. निष्काम कर्मयोगाचं उदाहरण म्हणजे घर बांधणारा गवंडी…इतरांसाठी वास्तू उभी करायची आणि ती जेव्हा सच्च्या अर्थानं राहण्यासारखी होते, तेव्हा मागे वळूनही न पाहता ती सोडून जायचं……

    – व.पु.

  6. सौ रोहिणी माने

    समुद्र शिंपल्यात घालून कधी कुणाला दाखविता येईल का ? फुलाचे चित्र काढून कधी त्याचा सुगंध घेता येईल का ? प्रीतीची अनुभूती सुद्धा अशीच आहे. – ययाती

  7. सौ रोहिणी माने

    जग माणसाच्या दयेवर चालत नाही ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालत माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही तो इतरांचा पराभव करून जगतो. मनुष्य जी या जगात धडपड करतो ती भोगासाठी! – ययाती

  8. सौ रोहिणी माने

    मरण हाच जन्माचा शेवट असेल तर मनुष्य जन्माला येतोच कशाला ? – ययाती

  9. अँब्युलेन्सवरील अक्षरे उलटी असतात कारण प्रत्येक जीविताचा प्रवास हा जीवनाकडून मरणाकडे चालू असतो, फक्त अँब्युलेन्समधील व्यक्तीचा प्रवास हा उलटा मरणाकडून जीवनाकडे चालु असतो….

    – वपु

  10. चरित्रकाराला शिवाजीचे शत्रू उभे करता आले नाहीत तर शिवाजी निम्मा कोसळतो.
    -नरहर कुरुंदकर (श्रीमानयोगीची प्रस्तावना)

  11. तनुजा

    खूप छान आहे.अजून पण नवीन वाक्यांच्या प्रतीक्षेत

  12. एक माणूस दूसर्‍या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादेपर्यंतच विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो. एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसाने पडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये. दुसर्‍याचे प्रश्न सोडवताना तुम्ही त्याची बुध्दी वापरून, त्या समस्येकडे बघू शकत नाही. तुम्ही तुमचाच तराजू वापरता.

    – वपु

  13. भाषण व वर्तन यांतील परस्पर विरोध, हा आमच्या लोकांचा राष्ट्रीय दोष आहे.

    – गोपाळ गणेश आगरकर

  14. अमोल कदम

    एखाद्या अज्ञानी निरक्षर माणसाचे रक्त सर्वौच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशाचे प्राण वाचवू शकते मात्र रक्तगट जुळला पाहिजे. म्हणून तो निरक्षर माणूस न्यायाधिशाच्या जागेवर बसू शकत नाही व म्हणू शकत नाही की तुमच्या शरीरात माझेच रक्त आहे. रक्तात जरी बरेच काही असले तरी रक्ताबाहेरही बरेच काही शिल्लक असते. आपल्यात भरपूर शक्ती असली तरी आपल्याबाहेरही भरपूर शक्ती असते म्हणून कुठलीही वस्तू अथवा व्यक्ती किती लहान असली तरी ती उपयुक्त असते. स्वतःला व इतरांना कमी लेखू नका
    ओशो रजनिश

  15. मनुष्य सुखाने जगू शकतो, तो धुंदीत. मग ती धुंदी कसलीही असो!

    अमृतवेल (वि.स. खांडेकर)

  16. वि.स.पुढे आम्हि काय बोलणार, पण 1 सांगतो,भक्ति हि सुद्धा एक धुंदि असते,ति सुद्धा परमोच्च सुखाकङे नेउ शकते

  17. मध्यरात्रीनंतर कधी तरी जाग आली तेव्हा बाहेर पावसाने जोर धरला होता. एकसंथ लयीत त्याने वरचा “सा” लावलेला. मिट्ट काळोख, गुहेत शिरलेला चुकार काजवा, थकलेल्या सवंगड्यांचे या कुशीवरुन त्या कुशीवर वळण्याचे खुसफूस आवाज, बाहेर गळणार्‍या पागोळ्यांच्या धारा हे सगळे एक होऊन एक मधुर संगीताची मैफिल जमून आली होती. थंडगार पहाटवार्‍यात बाहेर साल्हेर उभा होता, आम्हांस कुशीत घेऊन, एखाद्या तपस्वी ऋषीसारखा !

    –मीच एका ब्लॉगपोस्टवर लिहिलेलं. आणि मीच आजवर हजारवेळा माझी पाठ थोपटून घेतलीय या ओळींसाठी

  18. You have two choices. you can keep running and hiding and blaming the world for your problems, or you can stand up for yourself and decide to be somebody important.

    You know, it’s not fair. Women are judged inferior until we prove ourselves, and men are judged superior until they prove what assholes they are.

    – By Sidney Sheldon (Nothing Lasts Forever)

  19. केवळ चांगलं पोहता येत असल्यामुळे पोहता न येण्याची एक्टिंग करू शकलो. नाहीतर नाकातोंडात पाणी जाणे, गटांगळ्या खाणे, बुडून पुन्हा वर येणे हे दाखवणे कसे जमले असते? मी लहानपणी पाहिलेल्या सर्कशींमध्ये उंचावर असलेल्या झुल्यावर गोंधळ घालणारा, धडपडणारा , नेसतं वस्त्र सुटून लाज घालवणारा, विदूषक हा उत्तम ट्रॅपीझ आर्टिस्ट असायचा !

    नियंत्रण नसल्याचा अभिनयसुद्धा नियंत्रण असल्याशिवाय नाही करता येत.

    एका खेळियाने – दिलीप प्रभावळकर

  20. स्त्रीच्या डोळ्यात काजळ दिसलं की ओळखावं, हा तिच्या अतिसुखाचा क्षण आहे–अथवा अतिवैराचा!

    काजळमाया – जी.ए. कुलकर्णी

Leave a Reply to सुहास Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.